मुंबई : वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज डेटानुसार, मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स 0.21 टक्क्यांनी वाढले आणि आणखी एक विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता होती. पण मतमोजणी सुरु होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये जवळपास 1257 अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये 192 अंकांची घसरण झाली आहे. एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर निफ्टी इंडेक्स सोमवारी 3.25…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशातील प्रत्येक नागरिकांचे लक्ष लागून असून जिल्ह्यातील दोन्ही जागेवर देखील चुरस बघायला मिळाली आहे. आज सुरू झालेल्या मतमोजणीत रावेरमधून रक्षाताई निखील खडसे तर जळगावातून स्मिताताई वाघ यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा टपाली मते मोजण्यात आली. यानंतर ईव्हीएमची मते मोजण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आता सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचे कल समोर आले आहेत. दरम्यान, आज पहिल्या फेरीत रक्षा खडसे 10,666 मतांनी आघाडीवर त्यांना एकूण 28249 इतके मत मिळाले आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील 17583 यांना अनुक्रमे इतके मत मिळाले…
वाराणसी : वृत्तसंस्था देशातील सर्वात हॉट सीटवरील लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? लोकसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काय होणार? याकडे राजकीय विश्लेषकांची नजर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणावरुन तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी सामना झाला. स्वतंत्र्यानंतर रघुनाथ सिंह तीन वेळा या ठिकाणावरुन खासदार झाले. 1967 मध्ये सीपीएमचे एस. एन.सिंह यांनी त्यांना पराभूत केले. 1971 मध्ये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून जाहीर होणार आहे. आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही 642 दशलक्ष मतदारांचा जागतिक विक्रम केला आहे. ही आकडेवारी जी-7 देशांच्या मतदारांच्या १.५ पट आणि २७ युरोपियन युनियन देशांमधील मतदारांच्या 2.5 पट आहे. यावेळी राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत 31.2 कोटी महिलांसह 64.2 कोटी मतदारांच्या सहभागाने भारताने जागतिक विक्रम केला.जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 68,000 पेक्षा जास्त देखरेख टीम, 1.5 कोटी मतदान केंद्र आणि सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीसाठी सुमारे चार लाख…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून नियमित खुनाच्या घटना घडत असतांना आज देखील अशीच एक खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका कामगाराचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन नशिराबाद येथे दोन गटात दगडफेक झाल्याची घटना रविवार दि. २ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. छेड काढणाऱ्यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस ठाण्याबाहेर काही जण आक्रमक झाले होते. यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात छेडखानी करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याची घटना रविवारी २ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली. या घटनेनंतर जमावाने पोलीस ठाण्यासमोर गोंधळ…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळहून जळगावला येणाऱ्या बसमधून दोन प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली होती. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी बस स्थानकात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या मुजीबुर रहमान मोहम्मद इस्माईल (वय २५, रा. गुलशन नगर, मालेगाव, ता. नाशिक) याच्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडन चोरलेले दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विठ्ठलपेठेतील सुरज संजय बारी हे रेल्वेत हेल्पर म्हणून नोकरीस आहे. शनिवार दि. १ जून रोजी ते भुसावळ येथून जळगाव येथे बसने आले. नवीन बस स्थानक येथे ते बसमधून उतरले असता, त्यांना पॅन्टच्या खिशातून मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दरम्यान, याच बसमधील संतोष लक्ष्मण वानखेडे (वय ४३, रा.…
जळगाव : प्रतिनिधी जनता एक्सप्रेसमधून रेल्वेतील परप्रांतीय प्रवाशांचे तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ६० हजारांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. रविवारी दुपारच्या सुमारास शहरातील मेहरुण परिसरातून या टोळीतील चौघांना अटक करण्यात आली. संशयितांना पुढील कारवाईसाठी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील रोहित विमल यादव (वय २३) हे दोन मित्रांसोबत रविवार दि. २ जून रोजी मुंबईहून पटणा येथे जण्यासाठी निघाले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तिघेजण रेल्वेत झोपलेले असतांना तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला…
मेष राशी आज तुमचे वैवाहिक नाते मधुरतेने भरलेले असेल. सामाजिक क्षेत्रात तुमची क्रियाशीलता वाढेल. तुम्हाला काही कामात सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. या राशीच्या माध्यमांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला ताजेतवाने वाटेल. तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. गुरूंच्या मार्गदर्शनाने यशाचे नवे मार्ग खुले होतील. वृषभ राशी आज तुमचा एखाद्या विशेष कामात फायदा होईल. तुमच्या भावा-बहिणींशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याने प्रभावित होईल. व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून मदत मिळेल. काही नवीन कामे तुमच्या हातून घडतील, ज्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या दोन जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार अशोक कोळी याचे विरुध्द दारुबंदी कायदयाअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तयार करुन प्रस्ताव हाएलसीबी, जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार, जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अशोक बाळू कोळी (वय ३६ रा.साईबाबा मंदिर जवळ, समतानगर, जळगाव) याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे आहेत. संपूर्ण कामगिरी रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक…

