Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार कडाडले
    चाळीसगाव

    केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार कडाडले

    editor deskBy editor deskMay 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    इंधनाचे भाव सतत वाढतच आहेत. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत. दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते; परंतु केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी चोपडा, मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे आयोजित सभेत केली.

    पवार म्हणाले की, हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत वर्षभर शेतकरी आंदोलन चालले; तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नाही. महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे. केंद्र सरकार हे मूठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे आहे, जनतेला आता बदल हवा आहे. असे हि ते म्हणाले.

    सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रावेर मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, रोहिणी खडसे, प्रतिभा शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावचा तिढा सुटल्याचा दावा अन् रेश्मा काळे नॉट रिचेबल; महायुतीत खळबळ

    June 12, 2026

    कर्जमाफीवर फडणवीसांचे स्पष्टीकरण; ४० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विनाअट लाभ, बँकिंग व्यवस्था टिकवण्यासाठीच एकमेव अट

    June 12, 2026

    सराफा दुकानात ग्राहक बनून प्रवेश; ६.४८ लाखांचे सोन्याचे पेंडल लंपास!

    June 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.