Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वरणगाव पोलीसांनी झडप घालून दोघाना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळील दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुस असे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत दोघास अटक करण्यात आली. या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे की, तालुक्यातील टहाकळी फाटा जवळ सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची वरणगाव पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच सह पो निरिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जितेंद्र जैन व पो कॉ योगेश पाटील यांनी टाहकळी फाट्यावर रविवारी २३ जून रोजी रात्री ११:३० वाजता सापळा रचून टाहकळी फाट्यावर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा मोठा वाद पेटला आहे. त्यात एकमेकाविरोधात आरोप प्रत्यारोप होत असतांना आता ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील हे नेमकी काय मागणी करतात, हे अजून मला कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच अतिरिक्त कधीच होणार नाही अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलत जा म्हणावं. मनोज जरांगेंना एक काडीचा देखील अभ्यास नाही. अशी टीका त्यांनी केली आहे. हाके म्हणाले की, एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या संतोष जगन्नाथ धीवर (वय ४९) याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी २५ रोजी दुपारी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संतोष धीवर याच्याविरुद्ध कलम ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आरोपी संतोष धीवर हा पीडितीला वारंवार घराच्या छतावर बोलून तिचा विनयभंग करत होता. तसेच तुझे फोटो इतरांना दाखवून, बदनामी करेल, नाहीतर तुला मारून टाकेल, अशी धमकी ही देत होता. या जाचाला कंटाळून अल्पवयीन पीडित फिर्यादीने २५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास या घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केलेल्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या न जमावाने २० रोजी रात्री अचानक पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणातील २२ संशयित आरोपींना २५ रोजी ३ दुपारी ३ वाजता मुख्य न्यायाधीश डी. एन. चामले यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चारही बाजूने पोलिसांचेकडे करून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्यापासून ते न्यायालयापर्यंत सर्व संशयित आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. या वेळी आरोपींच्या नातेवाईकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या बापू जंगलू कुंभार (वय ३८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या विटभट्टीवरील मजूराला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान, घडली. मंगळवारी त्या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात बापू कुंभार हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होता. विटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. सोमवार दि. २४ जून रोजी बापू हा सायंकाळी दुचाकीने धरणगावकडून जळगावकडे येण्यासाठी निघाले होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास मुसळी ते वराड गावादरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कढोली येथील आनंदा रमेश अहिरे (वय ३५) या तरुणाने गावाशेजारी असलेल्या खळ्यातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपविले. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच जळगाव येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या तरुणाची परिस्थिती हलाखीची होती. हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करीत होता. त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, तीन विवाहित बहिणी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते ग्रामपंचायत सदस्य भीमराव अहिरे यांचे थोरले बंधू होत.

Read More

मेष : तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमी विषयी कुठले ही मत मांडू नका. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु, सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की, जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा. वृषभ : संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलीला घेण्यासाठी शाळेत गेलेल्या विवाहितेला अज्ञात महिलेने गुंगवून शिरसोली येथे नेत तिला विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी २५ जून रोजी सकाळी उघडकीला आला आहे. सुदैवाने विवाहिता जिवंत असून तिला ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू असून पोलीस कर्मचारी कसून चौकशी करत आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरूनगर परिसरातील दीपिका दीपक पाटील (वय २६) असे सदर महिलेचे नाव आहे. दिपीका ह्या नेहरूनगर येथे पती, मुलांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २४ जून रोजी दुपारी एक वाजेनंतर त्या मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना रस्त्यावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आसोदा या गावात ईलेक्ट्रीक मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगिता मश्चिंद्र कुंभार वय ४० रा. आसोदा ता. जि. जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे असोदा गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगिता कुंभार या महिला आपले पती व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील आसोदा गावात वास्तव्याला होत्या. मंगळवारी २५ जून रोजी सकाळी गावात नळाला पाणी आलेले होते. त्यांनी ईलेक्ट्रीक मोटार चालु केली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कंगना रनौत विजयी झाल्या असून त्यांनी नुकतेच महाराष्ट्र सदनमध्ये जाऊन राहण्यासाठी विचारपूस केली. त्यांना प्रशासनाने नाही म्हटलं. त्या निघून गेल्या. यावर संजय राऊतला मिरच्या झोंबल्या. त्या निवडून गेलेल्या खासदार आहेत. तुमच्या सारख्या बँकडोअरने आलेल्या नाहीत, असा टोला भाजप आमदार नीतेश राणे यांनी राऊतांना लगावला आहे. तर हमाम मे सब नंगे है, उगाच बडबड करू नका असेही त्यांनी म्हटले आहे. नीतेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सचिन वाझे वर्षा बंगल्यावर तिकडे किती दिवस राहायचा? त्याच उत्तर कधी देणार,असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे. गजनी झालेल्या राऊतला माहित…

Read More