जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एम.आय.डी.सी. पोलीस स्थानकामधील पोलीस ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणाचे दिनांक २४ रोजी सायंकाळी उदघाटन पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले, सदर ठाणे अंमलदार कक्षाचे नुतणिकरणामध्ये फर्निचर व कलरिंग, इलेक्ट्रीक या संबधीचे कामे करण्यात आले असुन पावसाळयाचे गच्चीवर पडणारे पाणी हे पि.व्ही.सी. पाईप द्वारे शोषखडयात सोडण्याचे (रेन वॉटर हार्वेस्टींग) देखील काम करण्यात आले आहे. तसेच वृक्षरोपण करण्यात आलेले आहे. सदर उदघाटनाच्या वेळी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो., मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड सो., दुय्यम अधिकारी व अंमलदार असे हजर होते. सदर नुतणिकरणासाठी जैन एरिगेशन सिस्टीम लिमीटेड चे…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर आला असतांना एफसी रोडवरील एका हॉटेलमधील काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात या पार्टीमध्ये काही तरुण चक्क बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना दिसून येत आहे. हे प्रकरण ताजे असतांनाच आता नाशिकमधून गांजाचा मोठा साठा सापडला आहे. हा गांजाचा साठा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात सापडल्याची माहिती समोर येत आहे. मिळलेल्या माहितीनुसार,’शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या दुकानात आठ किलो गांजा सापडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या नांदगाव तालुका प्रमुखाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. राजस्थानच्या अलवर, चित्तोडगड, कोटा, पाली, बांसवाडा आणि कुचमन-दिडवाना येथील मौलासरमध्ये सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. चित्तोडगडमध्ये वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील 5 जण दगावले. बिहारमधील पाटणा, औरंगाबाद, जहानाबाद, रोहतास आणि बक्सरमध्येही काल पाऊस झाला. बक्सरच्या नवानगरमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर रोहतासच्या नोखा येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. सोमवारी हिमाचल प्रदेशातील सोलन…
जळगाव : प्रतिनिधी लग्नाच्या ठिकाणी कपडे बदलणाऱ्या चुलतबहिणीचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांनी विवाहित बहिणीवर अत्याचार केले. हा धक्कादायक प्रकार ४ डिसेंबर २०२२ ते ६ जून २०२४ दरम्यान महिलेच्या घरी, जंगलात व धुळे जिल्ह्यात घडला. या त्रासाला कंटाळून महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चुलतभावासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी २७ वर्षीय महिला नातेवाइकाकडे असलेल्या लग्नाच्या ठिकाणी गेली होती. त्या ठिकाणी ती कपडे बदलत असताना तिच्या चुलतभावाने तिचे फोटो काढण्यासह व्हिडिओदेखील तयार केला. त्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेच्या…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील केन्हाळे ते पिंपरी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरून आणलेल्या ट्रकचा अग्रक्रम लावण्यावरून दोन्ही ट्रकवरील मजुरांच्या झालेल्या भांडणात अहिरवाडी येथील केळी मजुराने भोकरी येथील केळी मजुराच्या मानेवर विळ्याने दोन वार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत अहिरवाडी येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना सोमवारी रावेर न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. आरोपी विकी यशवंत वाघ रा. अहिरवाडी याने रियाज रफीक तडवी (१८, रा, भोकरी) याच्यावर वार केले. तत्पूर्वी आरोपी विकी वाघ याचे साथीदार गणेश देवीदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जाम मोहल्ला येथे किरकोळ कारणावरून एका वृद्धाला लोखंडी वस्तूने मारहाण करण्यात आली. यामुळे या वृद्धाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना २१ जून रोजी रात्री ११ वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहनवाज खान रशिद खान (वय ६०) हे शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घरासमोर बसले असताना शेजारील घरासमोर पाणी फेकण्याच्या कारणावरून शेख जुनेद शेख शकील याने शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली.जखमी शाहनवाज यांना लगेच उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी २२ रोजी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सोपान पाटील हे करीत…
मेष राशी आज व्यवसायात बुद्धीचा वापर केल्याने, हुशारी दाखवल्याने तुमचे मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकते. व्यवसायात थोडी सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. बचतही वाढेल. आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे आहेत. संचित भांडवली संपत्तीत वाढ होईल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. अनावश्यक खर्च टाळा. वृषभ राशी आर्थिक बाबींमध्ये आज हुशारीने पैसे गुंतवा. शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेज इत्यादी क्षेत्रात चढ-उतार असतील. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्या. जुन्या मालमत्तेच्या विक्रीसाठी योजना तयार होईल. नवीन वाहन खरेदीची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसारच काम करा. मिथुन राशी…
मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुक संपली असून आता राज्यात विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महाविकास आघाडी व महायुती आता उमेदवारांची चाचपणी सुरु असतांना भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यांचा आज किंवा उद्या पक्षप्रवेश होईल असा दावा केला जात आहे. सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील. सूर्यकांता पाटील गत काही दिवसांपासून भाजपवर नाराज होत्या.…
चाळीसगाव : प्रतिनिधी येथे दि.२१ जून २०२४ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीचा नेता व अनेक गुन्हे दाखल असलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा किसन जोर्वेकर यानेदेखील प्रक्षोभक असे भाषण केले. त्यात त्याने चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना “माझ्या नादी लागशील तर पिस्तुल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीच्या निषेधार्थ चाळीसगाव येथे भाजपा महायुती तसेच चाळीसगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बारदान मध्ये बनवलेला…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले आहे, यात मनोज जरांगे पाटील व मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. राज्यात दंगली घडवण्याचा भुजबळ यांचा डाव आहे असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केला आहे. तसेच त्यांनी आता राज्यातील सर्व मराठा नेत्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले…

