Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाल्मीक नगरात राहणाऱ्या एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की करून लोखंडीपट्टीने वार करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार दि. २४ जून रोजी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी मंगळवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाल्मिक नगरात राहुल गोकुळ कोळी (वय २८) हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून फुले मार्केट परिसरात घड्याळ विक्रीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. दरम्यान सोमवार दि. २४ जून रोजी रात्री ११ वाजता तो त्याच्या घरी असताना गावात राहणारा गोलू दिलीप सोनवणे (वय २०, रा. वाल्मिक नगर) याने त्याला अश्विल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसरातील गुरुदेवनगरातील पान मसाला, सुगंधित सुपारी साठवून ठेवलेल्या मे. संतोष ट्रेडर्स नावाच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी (२४ जून) छापा टाकला. राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे २१ लाख ९ हजार ६५० रुपयांचा पान मसाला, सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. गोदाम मालक अरुण पाटील याच्याविरूद्ध मंगळवारी (२५ जून) एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार, भरारी पथकातील नागपूर येथील सहायक आयुक्त रो. रा. शहा, अन्न सुरक्षा अधिकारी ल. प्र. सोयाम, आर. बी. यादव, जी. बी. मोरे, आर. एस. वाकडे, आर. डी. सोळंके, एमआयडीसी पोलिस ठाण्यातील…

Read More

यावल : प्रतिनिधी आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास बसस्थानकासमोर दोन गटात वाद होऊ तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटाकडील प्रत्येकी एकजण जखमी झाले आहेत. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दाखल केली असून एका गटातील अठरा आरोपींविरुद्ध तर दुसऱ्या गटातील ११ जणांविरुद्ध अशा २९ जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश मधुकर बिन्हाडे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. या विवाहास पत्नीच्या कुटुंबाकडून प्रचंड विरोध आहे. आंतरजातीय विवाह केल्याने पत्नीच्या नातेवाइकाकडून रस्त्याने जाता येता शिवीगाळ व जीवे ठार मारण्याचे धमक्या दिल्या जात होत्या. २६ जून रोजी सकाळी १०:४५ च्या सुमारास…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी एके ४७ रायफलमध्ये वापरली जाणारी जिवंत काडतुसे वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून बाहेर नेताना एक उपअभियंता बुधवारी रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याविरुद्ध फॅक्ट्ररी प्रशासनाच्या वतीने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश जयसिंग इंगळे (५२) असे संशयिताचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेला सतीश जयसिंग इंगळे हा उपअभियंता बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेवणासाठी फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्या दुचाकीच्या (एम.एच. १९ ए.टी. १५०४) हेडलाइटच्या कव्हर खाली सुरक्षारक्षक सी. व्ही. भारंबे यांना पाच जिवंत काडतुसे आढळून आली. त्यांनी तत्काळ सुरक्षा अधिकारी हेमंत चौधरी यांना ही माहिती कळविली आणि वरणगाव पोलिस ठाण्याचे एपीआय भरत…

Read More

मेष : अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची गरज भासेल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. वृषभ : जीवनसाथी सोबत पैश्याने जोडलेल्या कुठल्या मुद्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. तुमच्यावर प्रेम करणाºया…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येथील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ असलेल्या मोठ्या नाल्यात ऋषिकेश विलास राठोड (वय १५ वर्ष ) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरपटत नेऊन ठार केल्याची घटना आज (बुधवार) सकाळी निदर्शनास आली. सविस्तर वृत्त असे कि, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्‍या आहेत. त्या मंगळवार रोजी ऋषिकेश यांच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री साडेसात वाजता जेवन करुन ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईला सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. महाराज नेहमी प्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे आईने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज तडवी यांनी जिवाची बाजी लावून रेल्वे रूळावर पडलेल्या एका चिमुकलीचा जीव वाचवल्याची घटना नुकतीच घडली. याबद्दल श्री.तडवी यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील त्यांची भेट त्यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या घटनेची माहिती समजली असता त्यांनी लागलीच श्री.तडवी यांच्या कामगिरीचे कौतुक केले असून त्यांचा दुसऱ्या दिवशी सत्कार करून कौतुक देखील केले.

Read More

हिंगोली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक तरुणांना आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच हिंगोलीतील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने भगव्या फेट्याने गळफास घेतला आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. नापीकी व मराठा आरक्षणासाठी जीवन संपवत असल्याचे यात लिहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील तरुण शेतकरी गजानन काशीनाथ बोखारे यांचे पळसगाव शिवारात शेत आहे. या ठिकाणी असलेल्या चार एकर शेतावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. घरी वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकारचे पावसाळी अधिवेश सुरु होत असून आता यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते पदवीधर निवडणुकीचे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. विरोधी पक्षाला संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी यांनी वापर केला. पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्रासारख्या राज्यांतील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात डांबले. कारण ते भाजपाविरोधी होते. विरोधी पक्षाचा आवाज जपला पाहिजे, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे, असा साक्षात्कार गेल्या दहा वर्षांत मोदी यांना झाला नाही, असे ठाकरे पक्षाने सुनावले आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी आणि त्यांच्या गुजराती ईस्ट इंडिया कंपनीने देश चालविण्याच्या नावाखाली उत्सव, इव्हेंट, नाटकेच…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात वेश्या व्यवसाय खुलेआम सुरु आहे तर काही ठिकाणी लपून छपून सुरु आहे. नुकतेच विजापूर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्‍या शाहूपुरी तिसर्‍या गल्ली येथील वेलनेस स्पावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या सेंटरचा चालक नागेश रमेश बेळन्नावर (वय 32, मूळ रा. हिप्पगिरी, जि. विजापूर) याला अटक केली. जागा मालक दत्तात्रय गणपती शिंदे (रा. शाहूपुरी, 3 री गल्ली) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, शाहूपुरी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सोमवारी रात्री छापा टाकून झडती…

Read More