Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी १६ लाख रुपयांची सुपारी घेवून सुरत येथे दोन जणांचा गळा कापून खून करत फरार असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावातून अटक केली आहे. अफजल अब्दुल शेख (३८, रा. उमरपाडा, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (२६, रा. तरकुवा डुंगरी फलिया, वापी, गुजरात) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांनी खुनाची कबुली दिली असून एकावर खुनाचे पाच तर दुसऱ्यावर १५ वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील दुहेरी खून प्रकरणात अटक केलेल्या अफजल अब्दुल शेख व प्रज्ञेश दिलीप गामीत या दोघांनी कबुली देताना सांगितले की, सुरतचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी दिल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मंदिराच्या परिसरात धूम्रपानाला विरोध करण्याच्या कारणावरून सुऱ्याने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळील हनुमान मंदिराजवळ दि.२६ जून रोजी ज्ञानेश्वर सोनवणे हे बसलेले होते. त्यावेळी काहीजण धूम्रपान करीत होते. त्यास विरोध केल्याने अक्षय मुकेश अटवाल (२२, रा. शनिपेठ), मयूर धर्मदास सारवान (१९) व अन्य एका जणाने ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासह सुऱ्याने वार केला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी गुरुवारी रात्री तिघांना शनी पेठ परिसरातून अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ रवींद्र पाटील करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये गळफास घेतलेले वैद्यकीय प्रतिनिधी दिनेश धर्मा ठाकूर (४७, रा. गौरव पार्क, खोटे नगर) यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (२८ जून) रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) असलेले दिनेश ठाकूर हे पत्नी व दोन मुलांसह खोटे नगर परिसरात राहत होते. गुरुवारी (२७ जून) त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार त्यांची पत्नी व मुलगा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खासगी केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव रोडवरील धरणगाव महाविद्यालयासमोरील प्रवासी शेडमध्ये शुक्रवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणगाव महाविद्यालयासमोर असलेल्या प्रवासी निवारा शेडमध्ये काही विद्यार्थ्यांना हा अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. दरम्यान, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. मयत व्यक्ती याठिकाणी कसा आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.

Read More

मेष राशी संक्रमण तुमच्यासाठी शुभ, आनंददायी आणि लाभदायक असेल. कामात अडथळे येतील. समन्वय निर्माण करण्याची गरज असेल. राग टाळा. सर्व लोकांशी सुसंवादी वर्तन ठेवा. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील. वृषभ राशी ग्रहांचे संक्रमण तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेले असेल. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगू नका. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. खाजगी व्यवसाय करणाऱ्यांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर्स, लॉटरी इत्यादींमध्ये गुंतलेल्या लोकांना विचारपूर्वक पुढे जावे लागेल. विद्यार्थी शैक्षणिक…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी रात्री ३० वाजता घडली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सातवा फरार आरोपी सोनू रायसिंग पंडीत रा. वाल्मिक नगर, भुसावळ याला २७ जून रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजार सामिती आवारातून अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकमध्ये हावेरी जिल्ह्यात आज शुक्रवारी पहाटे भीषण रस्ते अपघातात देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि मिनी बसच्या भीषण अपघातात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे कर्नाटकमध्ये अपघाताची ही घटना घडली. हावेरी जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. हावेरी जिल्ह्यातील बागडी तालुक्यातील गुंडेनहल्ली क्रॉसजवळ ट्रक आणि मिनी बसची धडक झाली. या अपघातामध्ये बसमधील १३ भाविकांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण देवदर्शनावरून आपल्या गावाकडे जात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुक संपली असतांना आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आता जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती सुत्राकडून मिळत आहे. पंकजा मुंडे, अमित गोरखे,परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे , चित्रा वाघ, माधवी नाईक, जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या विधिमंडळात पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शिक्षण व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याच्या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात आशा वर्कर, कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात भरीव वाढ करण्याचीही घोषणा केली आहे. शैक्षणिक संस्थातून 11 लाख विद्यार्थी पदवी घेतात. डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थींची संख्या मोठी आहे. त्यांना औद्योगिक क्षेत्रात काम केल्यास त्यांना रोजगार मिळणार.…

Read More

धुळे : वृत्तसंस्था साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि.२७ रोजी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन घरी जात असताना आनंदखेडे गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेने पोलीस दलातून शोक व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी (36) हे धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास आहेत. ते साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने दररोज दुचाकीने आनंदखेडे ते साक्री अपडाऊन करायचे. काल रात्रीची ड्युटी असल्याने ते आज सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते.मात्र, आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जीजे 12/7447) ला मागाहून धडक दिली. या अपघातात पोकॉ.…

Read More