Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात एकाच दुकानातून लाख रुपयाचा पानमसाला जप्त
    क्राईम

    जळगावात एकाच दुकानातून लाख रुपयाचा पानमसाला जप्त

    editor deskBy editor deskMay 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गुटखा, पानमसाला विक्रीस बंदी असतानाही किराणा दुकानात त्याची विक्री केली जात असताना एमआयडीसी पोलिसांनी तेथून तब्बल एक हजार ३० पानमसाला, तंबाखूचे पाऊच जप्त केले. यासोबतच तंबाखूचे १५ डबे असा एकूण एक लाख ३० हजार ९८५ रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवार, ५ मे रोजी संतोषी माता चौक परिसरात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजनवर करण्यात आली. या प्रकरणी दुकान मालक दीपक रमेशचंद गंगराळे (४०, रा. रामेश्वर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील संतोषी माता चौकाजवळ असलेल्या दुकानात प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सपोनि ए. सी. मनोरे, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोकों हेमंत पाटील, कविता गवई, छगन तायडे यांना सदर दुकानावर रवाना केले. पथकाने संतोषी माता चौक परिसरात असलेल्या श्री स्वामी कृपा प्रोव्हिजन या दुकानाची झडती घेतली असता तेथे वेगवेगळ्या कंपन्यांचे व लहान- मोठे पानमसाला, तंबाखूचे एकूण एक हजार ३० पाऊच आढळून आले. यासोबतच तंबाखूचे १५ डबे आढळून आले. हे पाऊच सील करण्यात येऊन हस्तगत केले. या प्रकरणी पोकॉ छगन तायडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दुकान मालक दीपक गंगराळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आसाराम मनोरे करीत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.