Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुर्देवी : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
    क्राईम

    दुर्देवी : ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

    editor deskBy editor deskMay 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील चिनावल येथे ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडणीचे काम करीत असताना ट्रॅक्टर मागे आले. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव यशवंत हेमचंद्र धांडे (५७) असे आहे. चिनावल येथे कुटुंबासह राहत होते. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी नांगरणी, रोटा करण्याचे काम सुरू जाते. रात्री शेतात रोटा करण्यासाठी जायचे असल्याने रविवारी सायंकाळी ते खळ्यात ट्रॅक्टरला जोडणी करीत होते. दरम्यान, ट्रॅक्टर सुरू असल्याने ते मागे आले. ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने यशवंत धांडे गंभीर जखमी झाले. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यांना फैजपूर येथे खासगी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी एकच आक्रोशही केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.