मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे त्यापूर्वी अनेक नेते विविध पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी सुरु असतांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी वंचितने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नसल्याची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अटक केली जाणार नाही. गायरान व शासकीय जमिनीवरील घरे हटवण्याच्या नोटीसना स्थगिती द्यावी, अशा मागण्या वंचितकडून करण्यात आल्या होत्या. दरम्यान, दीक्षाभूमी आंदोलन प्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्याला…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षेप्रमाणे यश आले नसल्याने राज्यातील महायुतीमधून राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याची सध्या जोरदार रंगू लागली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. पण या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गत काही दिवसांतील विधानांमुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची हाराकिरी झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हाराकिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले. लोकसभा…
मुंबई : वृत्तसंस्था ‘सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरचा थरारक झेल घेत असताना मी श्वास रोखून बघत होतो. मला वाटलं, जर हा झेल सुटला, तर संघाचे विश्वविजेतेपदही निसटेल. पण, भारताचे हे विश्वविजेतेपद भाग्यामध्ये लिहून ठेवले होते. सूर्याचा तो ड्रोल अप्रतिम होता,’ असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले. बार्बाडोस येथे धडकलेल्या बेरिल चक्रीवादळामुळे भारतीय संघ दोन दिवस तिथेच अडकला होता. अखेर हे वादळ शमल्यानंतर एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुंबईमध्ये भारतीय संघाची विजयी यात्रा निघाली. यावेळी, लाखो क्रिकेट चाहत्यांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करत आपल्या विश्वविजेत्यांचे थाटात स्वागत केले. त्यानंतर वानखेडे…
जळगाव : प्रतिनिधी आजाराला कंटाळून रमेश काशिनाथ पाटील (वय ५८, रा. असोदा, ता. जळगाव) या शेतमजूराने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना दि. ४ जुलै रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास असोदा ते सुजदे रस्त्यावर घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, गावात रमेश पाटील हे आपल्या पत्न ी व मुलासोबत वास्तव्याला होते. बकऱ्या चारणे व दुसऱ्यांची शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दुर्धर आजाराने त्रस्त होते. गुरूवार दि. ४ जुन रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते पत्न ीला बाहेर जात असल्याचे सांगून दुचाकी घेवून निघाले. आसोदा ते सुजदे…
भुसावळ : प्रतीनिशी येथील दुहेरी हत्याकांडातील संशयीत बंटी पथरोड वापरत असलेल्या दोन महागड्या कार अज्ञातांनी मध्यरात्री पेटवून दिल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेली माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडात संशयित बंटी पथरोड याचे ही नाव असून तो सध्या पसार आहे. संशयित राहत असलेल्या जामनेर रोडवरील वाल्मीक नगर परिसरात झायलो व इको वाहन पार्क केलेले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी या वाहनांना ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. प्रभारी निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दगडी (मनवेल) येथील एका ४० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दगडी येथील प्रकाश विक्रम कोळी (वय ४०) हे २ जुलै रोजी नियमितपणे जेवण करून आपल्या घरात झोपले. सकाळी कुटूंबीय त्यांना कामासाठी उठवण्यासाठी गेले असता प्रकाश कोळी यांनी घराच्या छतावरील सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच युवकाला तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणीत करुन प्रकाश कोळी यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात पोलीस पाटील जिवन कोळी यांच्या माहितीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी जवळपास पावणेतीन लाखांची रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सायबर क्राईम व चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चौगाव येथील बापूराव आधार पाटील (वय ४७) यांच्या चोपडा येथील बंधन बँकेच्या खात्यातून २ लाख ८१ हजार ४२१ रुपये सायबर चोरट्यांनी २७ जूनला दुपारी २ वाजेच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ही रक्कम एकाच वेळेस न काढता ४ ते ५ वेळेस काढली आहे. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजनंतर बापूराव पाटील यांनी बँकेत संपर्क केला असता त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे लक्षात…
मेष राशी मेष राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल. तुम्हाला एखाद्या जवळच्या मित्राकडून मौल्यवान भेट मिळू शकते. धार्मिक कार्यातून आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होईल. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ होईल. याशिवाय प्रेमप्रकरणात गोडवा वाढेल. जवळच्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. तुम्हाला कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल. जंगम आणि जंगम मालमत्ता वादाचे कारण बनू शकते. अनावश्यक ताण टाळा. कुटुंबातील मतभेद वरिष्ठ नातेवाईकांच्या मध्यस्थीने मिटतील. वृषभ राशी आवश्यकतेनुसार पैसे न मिळाल्याने मनात निराशेची भावना राहील. व्यवसायात नुकसान होऊ शकते. काही मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. व्यवसायातील नवीन सहकाऱ्यांमुळे तणाव निर्माण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ४३ वर्षीय व्यक्तीने महिलेची छेड काढल्याच्या विषयावरून मारहाणीत त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना असोदा या गावात घडली आहे. हि घटना दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असल्याने असोदा गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भास्कर दगडू भंगाळे (वय ४३) यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर जळगाव तालुका पोलीस गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात भास्कर भंगाळे हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून गुरुवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आसोदा गावातील गोकुळ नगर येथे तो गेला होता. त्यावेळेला मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील जैन गल्लीत धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जैन गल्लीतील रहिवासी किशोर गुलाबदास जैन यांच्या घरात दि.१ जुलै सोमवारच्या रात्री जैन गल्लीतील हि धाडसी चोरी करण्यात आली आहे. श्री.किशोर जैन व त्यांचा मुलगा आयुष जैन रात्री झोपले असता चोरांनी मागील बाजूने लहान गल्लीतून वर चढून दार उघडले व आत शिरले. खाली आल्यावर त्यांनी घरातून रु.४५००० रोख व २ तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. त्यामुळे जैन गल्लीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेस्थळी सकाळी जैन समाजाचे अध्यक्ष श्री.राहुल जैन,उपाध्यक्ष श्री.प्रतीक जैन यांनी…

