धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांची जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी नागपूर येथील पवन देसले यांची पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नागपूर नंतर पहिल्यांदाच पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पदभार घेऊन उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई. धुळे. नागपूर अँटी करप्शन विभाग, जळगाव जिल्ह्यातील, मेहूणबारे आणि नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना बढती देऊन धरणगाव येथे पोलीस ठाण्याचा प्रभारीपद…
Author: editor desk
मेष राशी या राशीच्या लोकांना आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या राशीवर शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. अचानक पैसा खर्च होईल. भावांशी संबंध चांगले ठेवा. त्यामुळे फायदा होईल. तुमचं रागावर नियंत्रण नसतं. तुमच्या रागामुळे नात्यात कटुता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला विचार करूनच बोलावं लागेल. लव्ह लाइफमध्ये तणाव होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज शेअर बाजारात गुंतवणूक करा. मात्र गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आज जास्त उतावळेपणा करू नका. नाही तर नुकसान होईल. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हीच दुखी व्हाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडथळे येतील. या महिन्यात अधिकचा खर्च…
जळगाव : प्रतिनिधी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी २ लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. किरण रवींद्र पाटील वय-४१ रा. भडगाव असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कवठळ येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. शरद खंडू पवार (वय ५७) रा. कवठळ ता. धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, शरद पवार हे आपल्या पत्न ी, दोन मुलं व सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतलेली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. दरम्यान…
जळगाव : प्रतिनिधी शिव कॉलनीतील काद्री पेट्रोल पंपावर कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून पेट्रोल भरणाऱ्या वृद्धाला शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना बुधवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलिसात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिव कॉलनी परिसरात काद्री पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर अय्यब शहा बबन शहा (वय-६७) रा. सलार नगर, जळगाव हे पेट्रोल भरण्याचे काम करतात. २४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता अय्यब शहा हे पेट्रोल पंपावर असताना मिलिंद सोनावणे नामक व्यक्ती हा कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला. दरम्यान कारमध्ये पेट्रोल भरल्यानंतर अय्यब शहा यांनी पैसे मागितले.…
जळगाव : प्रतिनिधी आकाशवाणी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १:३० वाजता घडली, या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख रऊफ शेख अब्दुल्ला (वय ६९, रा. अक्सानगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेख रऊफ हे जळगाव शहरात मक्तेदारीचा व्यवसाय करीत होते. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास महाबळकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कामानिमित्त जात होते. आकाशवाणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने, पुलावरून अजिंठा चौकाकडे जाणाऱ्या ट्रकसाठी महाबळकडून येणाऱ्या वाहनांना थांबविण्यात आले होते. पुन्हा ही वाहतूक सुरळीत केली जात असतानाच शेख रऊफ हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघायला…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या आठवड्यात एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. – आता दि. २४ रोजी सायंकाळी पोलिसांनी पुन्हा एकदा चारचाकी वाहनातून २२ लाख ३८ हजार ५० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई खामखेडा स्मशानभूमीजवळ करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, दि. २४ रोजी सायंकाळी ७:४० वाजता ब-हाणपूरहून शहराकडे येणारे चारचाकी वाहन क्रमांक (एम.एच.२७ – डीएल २४९६) पोलिसांनी रोखले. वाहनाची तपासणी केली. त्यात प्रतिबंधित तंबाखू होती. त्याची किंमत २२,३८,०५० रुपये आहे. पोलिसांनी हे वाहन जप्त केले. आणि गुटखा ताब्यात घेतला. याप्रकरणी अजीज शेख बाबू (वय ३६) रा. झाशी नगर, रिसोड, जि. वाशिम याला ताब्यात…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील किराणा दुकानातून साखरेची तीन पोती चोरीस गेली होती. यात दुकानात हमाली काम करणाऱ्यासह दोन जणांना अटक झाली आहे. पहूर गावात इतर ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली चोरट्यांनी दिल्याने चोरी करणारे रॅकेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख ऐनद्दीन शेख जैनुद्दीन (२६) आणि शेख अमजद शेख अब्दुल (३६, दोघे रा. खाँजानगर, पहूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर प्रवीण सुवालाल लोढा यांचे होलसेल किराणा दुकान आहे. शनिवार २० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या गोडावूनमधून साखरेचे तीन पोती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यापूर्वीही अशाच घटना घडल्या होत्या. याबाबत अनोळखी व्यक्तींविरुद्ध पहूर…
मेष राशी आजचा दिवस तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या कामात तुम्ही प्रचंड व्यस्त राहाल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पण तुमचा खर्चही प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. तुमच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नवा पाहुणा आल्याने घरच्यांच्या आनंदाचा पारावार उरणार नाही. अचानक मोठा खर्च उद्भवेल. त्यामुळे बचतीतील पैसा खर्च होईल. तुमच्या सहकाऱ्याला मनातील गोष्ट सांगाल. वृषभ राशी आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. घरच्यांची तुमच्यावर जबाबदारी असल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करावी लागणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. नाही तर पोटदुखी, गॅस, अपचन आदी समस्या निर्माण होऊ शकतात.…

