Author: editor desk

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातील इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने खळबळजनक आरोप तर सर्वच आपबीती देखील सांगितली आहे. आम्ही आळंदीला पळून जाऊन विवाह केला. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. मी आणि अमित ९ जूनला पोलिस ठाण्यात आलो होतो. पुण्यात असताना आम्हाला मदत करणाऱ्या मित्रांच्या माध्यमातून ‘सैराट’ करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांतही लेखी तक्रार केली होती. तरीही माझ्या चुलत भावाने माझ्या नवऱ्यावर चाकूने सात वार करून संपवले, असे मृत अमितची पत्नी विद्या साळुंके हिने सांगितले आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद शहरातील पिंजारी हॉल जवळ बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्ता उललाह अमान उल्लाह शाह (वय २९ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, उत्ता उल्लाह अमान उल्लाह शहा हा तरूण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रिपरिप पावसाची हजेरी सुरु असल्याने गेल्या सात दिवसांपासुन जिल्ह्यात सुर्यदर्शन नसल्यामुळे बळीराजा मेटाकूटीस आला आहे. तर शहरात देखील या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महिना अखेर सह ऑगस्टचा पहिला आठवडा देखील ढगाळ वातावरणासह पावसाचाच असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. रविवार दि. २१ पासून जिल्ह्यात मध्यम व दमदार पावसाची हजेरी कायम आहे. दररोज दिवसभर पावसाची रिपरिप व ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. या पावसामुळे आरोग्याच्या समस्या, ज्येष्ठांसह बालकांना उद्भवू लागल्या आहेत. भिजपावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतांमध्ये तण वाढले असून फावरणी करण्यासाठी…

Read More

यावल : प्रतिनिधी यावल फैजपुर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ एका सेल्समनचे वाहन अडवून त्यास मारहाण करीत दोघांनी ३९ हजार ७०० रूपयांची रोकडे हिसकावली व दुचाकीवरून ते दोघे फरार झाले होते. हि घटना २५ जुलै रोजी रात्री १० वाजेला घडली होती. तेव्हा याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना यावल पोलिसांच्या मदतीने शहरातील आयेशा नगरामधून दोघांना ताब्यात घेतले आहे. व त्यांनी चोरी केलेली रोख रक्कम देखील पोलिसांना काढून दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल फैजपूर रस्त्यावर २५ जुलै च्या रात्री दहा वाजता चेतन गोपाल दरेकर हे सेल्समन आपले वाहन क्रमांक एम. एच. १९…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडित साबळे उर्फ चोर बाप्या आणि दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीएमधून सुटून आलेला रितेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास करीत असताना जालना येथून चोरलेली दुचाकी देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या प्रेमलता लाड यांची मुलगी सासरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी बंद घरातून रोख १५ हजार रुपये व चांदीच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे व रितेश शिंदे या दोघांनी केल्याची…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनीताबाई अरूण देशमुख (४८, रा. माळीवाडा, एरंडोल) या जागीच ठार झाल्या. ही घटना रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास एरंडोल-जवखेडा रस्त्यावर पाटाजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, दुचाकीस्वार दुर्गेश अरूण देशमुख हा या अपघातात जखमी झाला. दुर्गेश हा दुचाकी क्रमांक (एमएच १९, डीसी ८४१५) ने त्याची आई सुनीताबाई देशमुख यांना घेऊन शेतीकामासाठी जात होता. दुर्गेश दुचाकी चालवत होता व त्याची आई दुचाकीवर मागे बसली होती. जवखेड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून कट मारला. त्यात सुनीताबाई यांच्या डोक्याला मार लागल्याने…

Read More

मेष या राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. लोकांची तुमच्यावर मर्जी बसेल. मित्रांचा गोतावळा वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना अधिक फायदा होणार आहे. संध्याकाळी घरातील एखाद्या व्यक्तीचं दुखणं बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही परेशान होण्याची शक्यता आहे. परंतु, रात्री सर्वकाही ठिक होईल. प्रवासाचा योग आहे. वाहने जपून चालवा. वृषभ आज तुमची सर्व अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील. ते लोक तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अत्यंत हुशारीने या सर्वांचा बंदोबस्त कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. मुलाच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. मुलीच्या करिअरकडे अधिक लक्ष द्या. लव्ह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे याचा तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना २३ मे रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाठलाग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते मालवण पोलीसांनी अटक केली आहे. निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (वय ३०, रा. श्रीराम नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काल मध्यरात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून याबद्दलचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली. यानुसार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या…

Read More

पारोळा : प्रतिनिधी महामार्गावर सायंकाळी सुमारास ट्रक- पिकअप वाहन यांच्यात अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विचखेडे शिवाराजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एमएच१५/ जीव्ही ७८२७) हा भरधाव वेगाने चालत असताना धुळ्याकडून पारोळ्याकडे येणाऱ्या पिकअपने (एमएच१९/ सीवाय५०७६) ला जोरदार धडक दिली. त्यावरील चालक रफिक अहमद शरीफ अहमद (४०, धुळे), पूजा राजेश बागुल (२५, सिद्धार्थ नगर, पारोळा), अखिल अहमद अब्दुल सत्तार (धुळे) हे जखमी झाले तर रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) यांचा जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू…

Read More