Author: editor desk

मेष आजचा दिवस मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे. पण आज तुम्हाला तुमची ऊर्जा आणि योजना योग्य दिशेने न्याव्या लागणार आहेत. संभ्रमित होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचे विचार स्पष्ट ठेवा. तुम्हाला आज मोठा भाऊ आणि वडिलांकडून लाभ होईल. तुमचा बजेट संतुलित ठेवाल. त्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील. तुमची आर्थिक बाजूही संतुलित राहील. जीवनसाथीसोबत एखाद्या गोष्टीवरून खटके उडतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. वृषभ आज तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घ्याल. ज्यांना आज मालमत्तेत गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुम्हाला आज व्यापारात लाभ मिळेल. पूर्वानुभव आणि अपार कष्टाचं फळ मिळेल. कोर्ट कचेरीचं एखादं प्रकरण सुरू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष सज्ज झाले असून मनोज जरांगे पाटील देखील निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. मराठा समाजाचे उमेदवार उभे करणार ते निवडून आणणार आणि ते मंत्री देखील होणार. मात्र, आकडा 29 ऑगस्टला सांगू असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. गरजवंत मराठा विरुद्ध प्रस्थापित मराठा अशी लढाई पाहायला मिळेल का? या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिले. राजकीय पक्षांकडे देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला नाही तर ते देखील आमच्याकडे येतील. ते आमची वाट पाहत आहेत आणि आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांना एकालाच उमेदवारी द्यायची आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नाराज…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना घेवून जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात एक महिला जागीच ठार तर इतर ७ महिला व चालक गंभीर जखमी झालेत. जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीजवळून चारचाकी वाहन शेतमजूर महिलांना शेतात कामासाठी घेवून जात होते. मंगळवारी ३० जुलै रोजी सकाळी ९ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितच्या पुढे रस्त्यावर अचानक कार पलटी झाली. या अपघातात वाहनात बसलेले बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच दिल्लीत जाऊन मोदींची सपत्नीक भेट घेतली. त्यामुळे भाजपची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे सोपवली जाणार का, अशी चर्चा सुरु झाली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालेले नाही. मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या. भाजपच्या जागा 23 वरुन 9 वर आल्या. याची जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देऊ केला होता. पण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक शहरातून दुचाकी चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच पोलिसांनी १५ चोरीच्या दुचाकीचा उलगडा केला आहे. पाचोरा तालुक्यातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चोरीच्या १५ दुचाकींसह पाचोरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी दुपारी १ वाजता दिलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागातून विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अवैधपणे दुचाकीवरून गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस आणि लोखंडी कोयता सोबत घेऊन दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. मोहम्मद लतीफ शेख सलीम वय-२४ आणि इमरान खान अयुब खान वय-२३ दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील छात्रसेन…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३० जुलैपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ने एक्स अकाऊंटवरून दिली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने (RRB) भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये कनिष्ठ अभियंता आणि इतर तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक (संशोधन) यासह ७,९५१ पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असल्याने पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी निघाले असतांना त्यांनी आज पुणे येथे पाहणी केली असता सत्ताधारयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणाले कि, राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक, असाच कार्यक्रम सध्या चालू आहे. पुणे शहर हे एक शहर राहिले नाही तर ते…

Read More

सातारा : वृत्तसंस्था सातारा बसस्थानकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका तरुणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चौकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरुण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणांना त्यांनी हटकल्यानंतर तेथून दंगा करणारे तरुण निघून गेले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर मोपेड दुचाकीवरून चौघेजण पुन्हा त्या ठिकाणी आले आणि पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी…

Read More

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर मारहाण व अत्याचार होण्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे 70 हजाराचा ऐवज लुटल्याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सर्वांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, निलजी येथे शुक्रवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिरून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवत महिलेस मारहाण केली. मंगळसूत्र, पैंजण, मोबाईल व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 70 हजाराचा ऐवज लुटला. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चारही चोरटे अंधारात पसार झाले. रविवारी पोलिस उपाधीक्षक…

Read More