Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले. रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. पिंप्री मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून १-१ फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत सरासरी 11 मी उंची पर्यंतचे बांधकाम पुर्ण झालेले आहे. जानेवारी 2024 मध्ये एकूण प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालानुसार रु. 4890 कोटी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या मान्यतेनुसार सद्यस्थितीत टप्पा 1 अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून 10.4 TMC एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी 2024…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुढील ५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान आणि कोकण आणि गोव्यात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मध्य महाराष्ट्रात ३१ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सून ट्रफ सक्रिय आहे आणि ट्रफ समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. पुढील ३ दिवसांत तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू दक्षिणेकडे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महायुती देखील आता बैठका घेण्यासाठी सज्ज झाले असून आता जागावाटपा आधीच तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरु झाल्याचे दिसत आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निर्णयामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. सध्या अंधेरी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. ऋतुजा लटके या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत. अंधेरी पूर्वच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने निरीक्षक देखील नेमलाय. त्यातच समाजसेविका स्वीकृती शर्मा यांनी शिवसेना शिंदे गटात केला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या मोठ्या सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे २० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. मुंबईत ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आय. एस. चहल,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या चौघांनी फिर्यादी महिलेला फोनवरून शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. २६ रोजी दुपारी तीन वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आरएमएस कॉलनीत रेखा सुभाष पाटील या महिला वास्तव्यास आहे. त्यांनी सुवर्णा कृष्णा पाटील, कृष्णा पाटील (रा. संत मीराबाई नगर), वंदना अजय पाटील, अजय पाटील यांच्या विरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे दि. २६ रोजी दुपारी त्यांच्या मोबाईल वर कॉल करून त्यांना शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या नातेवाईक यांना भेटून आणि फोन वरून त्या महिलेविषयी वाईटसाईट सांगून त्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी अकोला-नाशिक बसमध्ये चढत असताना एका सेवानिवृत्त जवानाच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील नवीन बसस्थानक आवारात घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर माणिक पाटील (वय-४४) रा. रामकृष्ण नगर, धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ते सीआरपीएफ सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहे. दरम्यान सोमवारी २९ जुलै रोजी दुपारी ते जळगाव शहरात आलेले होते. काम आटोपून ते दुपारी २ वाजता अकोला- नाशिक बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ३८ हजार ९०० रुपयांची…

Read More

जळगाव  :  प्रतिनिधी आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात आहे, बेकायदेशीर अॅडव्हटायझिंग अँड हॅरेसिंग पोर्नोग्राफीविषयी तक्रारी दाखल आहे तसेच सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट पत्र पाठवून भुसावळ शहरातील गडकरी नगरात राहणारे ५३ वर्षीय व्यक्तीची सुमारे २२ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जुलै ते २६ जुलै दरम्यान घडला. या प्रकरणी सोमवारी २९ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गडकरी नगरात ५३ वर्षीय व्यक्ती हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला अहे. त्यांना १५ जुलै रोजी एक कॉल आला व आपल्या बँक खात्यावरून मनीलाँड्रींग केले जात…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील मोहराळा येथील २३ वर्षीय विवाहिता गावातीलच तिच्या २२ वर्षीय प्रियकर सोबत आपल्या एक वर्षीय बाळाला घेऊन पळून गेली होती. याच नैराश्यातून विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध तरूणास आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली होती. या दोघांची पोलिस कोठडी सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयाने आता १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील मोहराळा येथील तुषार गोपाळ पाटील (वय २८) या तरुणाची पत्नी वैष्णवी पाटील ही तिच्यासोबत एक वर्षीय बालक समर्थ याला सोबत घेऊन तिचा प्रियकर प्रशांत सहदेव पाटील (रा. मोहराळा)…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर-यावल परिसरासाठी वरदान असलेले गारबर्डी धरण यंदा देखील पूर्ण भरले आहे. वरुण राजाची कृपा राहिल्याने सुकी नदीला चांगले पाणी आले आल्याने सुकी धरण भरले. परिसरातील शेतकरी बांधव आनंदित झाले असून पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. धरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी आणि परिसरातील नागरिकांतर्फे जलपूजन करण्यात आले. आज मंगळवार दि.३० जुलै रोजी पाल परिसरातील गारबर्डी धरण येथे जलपूजन सोहळा प्रहार जनशक्ती पक्ष आणि अनिल चौधरी मित्र परिवार वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. रावेर-यावल तालुक्यावर यंदा वरुणराजाची कृपा राहिल्याने पाऊसपाणी चांगला आहे. यंदा धरण पूर्ण भरले असून ओसंडून…

Read More