Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ….‘आमचा सैराट होऊ शकतो..’; अमितच्या पत्नीचा खळबळजनक दावा
    क्राईम

    ….‘आमचा सैराट होऊ शकतो..’; अमितच्या पत्नीचा खळबळजनक दावा

    editor deskBy editor deskJuly 29, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    राज्यातील छत्रपती संभाजी नगरातील इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने खळबळजनक आरोप तर सर्वच आपबीती देखील सांगितली आहे.

    आम्ही आळंदीला पळून जाऊन विवाह केला. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. मी आणि अमित ९ जूनला पोलिस ठाण्यात आलो होतो. पुण्यात असताना आम्हाला मदत करणाऱ्या मित्रांच्या माध्यमातून ‘सैराट’ करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांतही लेखी तक्रार केली होती. तरीही माझ्या चुलत भावाने माझ्या नवऱ्यावर चाकूने सात वार करून संपवले, असे मृत अमितची पत्नी विद्या साळुंके हिने सांगितले आहे.

    आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने वार केले होते. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. बालपणीची मैत्रीण विद्याशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. पुढे अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने २ मे रोजी ते घरी परतलेे. विद्याच्या कुटुंबीयांना त्यांना स्वीकारले नव्हते. पोलिसांनी शनिवारी विद्याचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही याला अटक केली होती. रविवारी जवाहरनगर पोलिसांनी अमितचा सासरा गीताराम कीर्तिशाही व त्याला साथ देणाऱ्या स्वप्निल पट्टेकर याला पोलिसांनी जालन्यातून अटक केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.