Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात इतके दिवस बरसणार पाऊस !
    जळगाव

    जिल्ह्यात इतके दिवस बरसणार पाऊस !

    editor deskBy editor deskJuly 29, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राज्यातील अनेक शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रिपरिप पावसाची हजेरी सुरु असल्याने गेल्या सात दिवसांपासुन जिल्ह्यात सुर्यदर्शन नसल्यामुळे बळीराजा मेटाकूटीस आला आहे. तर शहरात देखील या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महिना अखेर सह ऑगस्टचा पहिला आठवडा देखील ढगाळ वातावरणासह पावसाचाच असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    रविवार दि. २१ पासून जिल्ह्यात मध्यम व दमदार पावसाची हजेरी कायम आहे. दररोज दिवसभर पावसाची रिपरिप व ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. या पावसामुळे आरोग्याच्या समस्या, ज्येष्ठांसह बालकांना उद्भवू लागल्या आहेत. भिजपावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतांमध्ये तण वाढले असून फावरणी करण्यासाठी देखील सात दिवसांपासुन सूर्य दर्शन नाही. हवामान विभागाकडून या पावसाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    आज दि.२९ व ३० रोजी जिल्हाभरात विविध ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून बुधवार दि. ३१ रोजी देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे आता पिके करपण्याची तसेच खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच १ ते ७ ऑगस्ट दरम्यान हलका व मध्यम पाऊस राहण्याची अथवा ढगाळ वातावरण राहील तसेच सुर्य दर्शन क्वचित होणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. दुषित पाण्यामुळे देखील आरोग्य धोक्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महिला आरक्षणावरून विरोधकांचा विश्वासघात; मुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात !

    April 20, 2026

    भरधाव क्रुझरची दुचाकीला जोरदार धडक; यावलमध्ये पोलीस कर्मचारी जखमी

    April 20, 2026

    अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर हल्ला? जळगाव तालुक्यात १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.