• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जुना वाद ; दोघांना जबर मारहाण

editor desk by editor desk
July 4, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील रसलपूर येथील दोन गटांमध्ये २० ते २५ वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादाचा सोमवारी पुन्हा भडका उडाला. यावेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गटातर्फे मोटारसायकलला कट मारल्यानंतर रसलपूर ग्रामपंचायतसमोरील रस्त्यावर पुन्हा मोटारसायकल अडवून दमबाजी करीत दोन्ही चुलतभावांना मोटारसायकलच्या खाली ओढून दहाजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर दुसऱ्या चुलतभावाला लोखंडी पाइपने पायावर व कानावर मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

परवेझ खान अय्युब खान याने मोटारसायकलचा जबर कट मारल्याने शरीफ खान हा जखमी झाला, पायाला दुखापत झाल्याने शरीफ खान याने त्याचा चुलत भाऊ शोएब खान महेबूब खान यास बोलावले व ते सोबत मोटारसायकलवर बसून घराकडे जाण्यासाठी निघाले. तोच ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोटारसायकलला कट मारणारा परवेझ व त्याचा मित्र मौसीन बेग यांनी मोटारसायकल रस्त्यात अडवून शरीफ खान व शोएब खान यांना मोटारसायकलवरून खाली ओढून लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली. मोसीन व परवेझ यांच्या सांगण्यावरून जमलेल्या अयुब खान उस्मान खान, सलीम बेग गुल बेग असलम बेग गुल बेग, अमीन बेग सलीन बेग, वसीन बेग शरीफ बेग, आदौल खान अयुब खान, जुबेर बेग असलम बेग, अरशद खान अयुब खान अशांनी हाता चापटांनी व लाथाबुक्क्याने खाली पाडून जबर मारहाण केली. यातील मोसीन बेग याने लोखंडी पाइपने शोएब याच्या डाव्या पायाला तसेच उजव्या कानावर मारून गंभीर दुखापत करत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात रात्री शरीफ खान रुस्तम खान यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार घनश्याम तांबे करीत आहेत. दरम्यान, या दहाही आरोपींना नवीन बीएनएस कायद्यान्वये नोटीस बजावली आहे.

Previous Post

या राशीतील व्यक्तींच्या प्रेम प्रकरणात गोडवा राहणार !

Next Post

क्रिकेटच्या वादातून तरुणाला जबर मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

क्रिकेटच्या वादातून तरुणाला जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group