मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठी योजनांची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक खास व्हिडिओ जारी केला आहे. ताई तू काळजी करू नकोस म्हणत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. योजनेसाठी राज्यभरातील महिलांची वाढती गर्दी आणि प्रतिसाद पाहून सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यभरातील लाडक्या बहिणींना साद घातली आहे. शिंदे म्हणाले, ”ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील वावळदा रोडवर लक्झरी बस व डंपरच्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झाला त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. यापूर्वी याच ठिकाणी अपघात झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा – जळगाव रोडवरील पाचोरा रोड हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेताजवळ नागमोडी वळण आहे. वावडदेकडून जाणारी एल एच पाटील कन्स्ट्रक्शन ची डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व पाचोरा कडून येणारी लक्झरी बस क्रमांक एम एच…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील राजापेठ भागात सकाळच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने एका १७ वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करीत तिचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने मुख्य चौकात ही घटना घडत असताना एक ऑटोचालक आणि इतर नागरिकांनी धाव घेत तत्काळ तरुणीची सुटका केली आणि माथेफिरू तरुणाला बेदम बदडून काढीत पोलिसांच्या हवाली केले. सविस्तर वृत्त असे कि, बुधवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात मुलीचा गळा चिरल्याने तिच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल मुकुंद कळस्कर (२३, रा. राजापेठ, अमरावती) असे अटकेतील हल्लेखाराचे नाव…
चोपडा : प्रतिनिधी अवैधरित्या गाईंची वाहतूक करणाऱ्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील पाच जणांवर ३१ रोजी पहाटे चोपडा शहर पोलिसांनी कारवाई केली. यात दोन्ही मिळून १४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील अमोल शिवाजी सुरळकर (वय २२), गणेश रमेश राऊत (वय २६) व आकाश दादाराव राऊत (वय २१) व भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथील योगेश मिरचंद रिसवाल (वय २५) हे चौघे ३१ रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास दोन बोलेरो चारचाकी गाडी (एमएच १९सीवाय ६३०७ व एमएच- २०, इएल ८५५६) मधून अवैधरित्या…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाघोदे येथील ईश्वरलाल चिंधा पाटील (वय ४६) या शेतकऱ्याने शेतीमुळे झालेले कर्ज व यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घटना ३० रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरलाल पाटील यांनी २७ रोजी घरीच विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. होते. उपचारादरम्यान ३० रोजी तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असून घरातील कमावता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर विकास सोसायटी आणि सहकार सोसायटी तसेच इतर हात उसनवारीचे कर्ज होते. या कुटुंबास त्वरित शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मयत ईश्वरलाल पाटील…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघामध्ये मद्याच्या बाटल्या नेण्यास नकार दिल्याने दोन जणांनी सुपरवायझरशी वाद घालत योगेश भागवत निंबाळकर (४१, रा. जळगाव) या कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) दूध संघ परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दूध संघामध्ये चालक असलेले संजय छगनलाल पाटील, मोहन रुपवते हे दूध संघात मद्याच्या बाटल्या सोबत घेऊन आल्याने सुपरवायझर मुकेश निंबाळकर यांनी त्या दोघांना आत जाण्यास नकार दिला. त्यावेळी दोघे मुकेश यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांशी वाद घालून निघून गेले. संध्याकाळी वरील दोघे जण मद्यपान करून त्यांच्यासोबत तीन जण घेऊन आले. त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी पती कामावर तर मुले शाळेत गेलेली असताना राणी श्यामकांत देशमुख (४४, रा. ओम साईनगर) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी मुले शाळेतून घरी आली त्यावेळी समोर आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, कानळदा रोडवरील ओम साईनगरात राणी देशमुख या पती व दोन मुलांसह राहत होत्या. पती श्यामकांत देशमुख हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी (३० जुलै) दोन्ही मुले शाळेत तर पती कामावर गेले होते. त्यावेळी घरात कुणीही नसताना विवाहितेने घरात गळफास घेतला. संध्याकाळी दोन्ही मुले घरी आली त्यावेळी घराचा…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून घरी परतत असलेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक श्रद्धा महाजन यांच्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे त्या जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी (३० जुलै) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास समतानगरजवळ झाला. सविस्तर वृत्त असे कि, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक असलेल्या श्रद्धा महाजन या रायसोनीनगरकडे घरी जात होत्या. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांना दुखापत झाली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत सरपंचपदी मंजुळाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच उपसरपंचपदी गजानन पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण आणि गजानन बन्सीलाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासासाठी नूतन पदाधिकाऱ्यांना सर्वोतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे. धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द ग्रामपंचायत येथील सरपंच मनोज पाटील यांनी आज (दि. 31) रोजी सरपंच पदाचा राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदावर ना. गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले श्रीकांत चव्हाण यांच्या पत्नी मंजुळाबाई चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी…
मेष राशी मेष राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. ग्रहांचे संक्रमण नशिबाच्या विकासासाठी उपयुक्त आहे. योजना प्रत्यक्षात आणण्यात यश मिळेल. नोकरीच्या बाबतीत गाफील राहू नका. जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो. गुप्त शत्रूला मत्सर वाटेल. तुम्ही काही नवीन काम करू शकाल. शेतीच्या कामातून फायदा होईल. सहलीचा कार्यक्रम होईल. वेळेचे स्वरूप लक्षात घेऊन काम करा. व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात वर्चस्व प्रस्थापित होईल. वृषभ राशी नोकरीत तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. राजकीय प्रतिनिधीवरील तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध होईल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे तुमच्यासाठी घातक ठरेल. रस्त्यात एखाद्या प्राण्यामुळे अपघात होऊ शकतो. वरिष्ठ नातेवाईकामुळे कुटुंबात वाद होऊ…

