मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी व राज ठाकरे यांच्या मनसेत गेल्या दोन दिवसापासून मोठे राजकारण सुरु असतांना दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसून आणखी हा वाद वाढत आहे. नुकतेच आ.अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. आ.मिटकरी म्हणाले कि, जय मालोकर हा अजित पवार गटात प्रवेश करणार होता. त्यामुळेच त्यांच्यावर दबाव होता असा त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज ठाकरेंसह सर्वांची चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच अजून मी विधिमंडळाचा दोन वर्षी सदस्य आहे. एक एक प्रकरण काढू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचा…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या कामासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी भर पावसात खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. गुरुवारी सकाळी विवरा-रेंबोटा रस्त्याच्या डागडुजी संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. साहेब.. रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करा, आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी लागलीच दखल घेत मुरूम पाठवत रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली. रावेर-यावल परिसरातील अनेक गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे झाले असून काही ठिकाणी तर रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. नागरिकांचे हाल होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडक्या बहिणींना विधानसभेनंतर काही मिळणार नाही. ही त्यांची फसवणूकच आहे असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपाशासित राज्यात लोकशाही राहिली नाही असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेक मार्गावरील भीमभालीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ खोऱ्याशी संपर्क तुटला आहे. येथे सुमारे ४५० लोक अडकून पडले आहेत, तर केदारनाथ महामार्ग सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान वाहून गेला आहे. यामुळे चार धाम यात्रा ठप्प झाली आहे. केदारनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा थांबवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भिंबलीजवळील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. एनडीआरएफने सोनप्रयाग आणि…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढत असतांना राज्यातील देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी…
जामनेर : प्रतीनिधी तालुक्यातील पहूर कसबे येथील युवक गणेश ज्ञानेश्वर बनकर (२७) याचा बुधवारी नेरी, ता. जामनेर येथे जात असताना अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी पहूर गावात धडकली. घरातील कर्ता मुलगा व एका चिमुरड्याचे पितृछत्र हरपल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पहूर कसबेतील रहिवासी ज्ञानेश्वर बाळकृष्ण बनकर यांचा चिरंजीव गणेश ज्ञानेश्वर बनकर हा जळगाव येथे कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरून दुचाकीने जळगावला जाण्यासाठी तो निघाला. जळगाव-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर नेरी येथे श्वानामुळे दुचाकीला अपघात झाला. यात गणेश याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला.…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस अंमलदार व कर्मचारी हे गस्तीवर असताना त्यांनी इलेक्ट्रिक मोटारपंप चोरी करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ३० रोजी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, शेतमालाच्या होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालावा, असे आदेश पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे गस्तीच्या वेळी संशयित वाहनावर लक्ष ठेवून त्यांची तपासणी चाळीसगाव पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत होती. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनांप्रमाणे ३० रोजी पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हे.कॉ. रवी पाटील, दीपक पाटील, प्रवीण जाधव, अमोल भोसले, गणेश कुवर, गोपाल पाटील हे घाटरोड परिसरात गस्त घालत असताना ३…
मेष राशी क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुम्हाला विविध क्षेत्रांकडून अपेक्षित भेटवस्तू मिळतील. नोकरीत बढतीचे योग येतील. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसचा पाठिंबा आणि कंपनी मिळेल. व्यवसायात प्रगतीसह लाभ होईल. अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित केला जाईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचार ठेवा. तुमचे लक्ष इकडे तिकडे जाऊ देऊ नका. तुम्हाला काही मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. वृषभ राशी दिवसाची सुरुवात तणाव आणि अनावश्यक धावपळीने होईल. प्रेमसंबंधांमध्ये काही धोका असल्यास कोणताही धोका पत्करू नका. अन्यथा तुम्हाला मारहाण होऊन तुरुंगातही पाठवले जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात मन एकाग्र करा. व्यवसायात अज्ञात लोकांवर जास्त विश्वास ठेवणे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक हा हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन कार्यकर्त्यांचा समावेश होता. आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच पोलिसांची गाडी होती. मात्र हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला नंतर ते फरार झाले. जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा हल्लाबोल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. सविस्तर वृत्त असे कि, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे गटातील माजी खासदार राहुल शेवाळे यांची मानहानी केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना 2 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी ठाकरे आणि राऊत यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी 1 हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित 2 हजार रुपये असा…

