Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात धाडसी चोरी : रोकडसह दागिने लंपास !
    क्राईम

    धरणगावात धाडसी चोरी : रोकडसह दागिने लंपास !

    editor deskBy editor deskJuly 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    शहरातील जैन गल्लीत धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जैन गल्लीतील रहिवासी किशोर गुलाबदास जैन यांच्या घरात दि.१ जुलै सोमवारच्या रात्री जैन गल्लीतील हि धाडसी चोरी करण्यात आली आहे. श्री.किशोर जैन व त्यांचा मुलगा आयुष जैन रात्री झोपले असता चोरांनी मागील बाजूने लहान गल्लीतून वर चढून दार उघडले व आत शिरले. खाली आल्यावर त्यांनी घरातून रु.४५००० रोख व २ तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. त्यामुळे जैन गल्लीत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या घटनेस्थळी सकाळी जैन समाजाचे अध्यक्ष श्री.राहुल जैन,उपाध्यक्ष श्री.प्रतीक जैन यांनी भेट दिली व पोलीस प्रशासनास कळवून प्रकरणाची माहिती दिली. व लवकरात लवकर तपास करावा व धरणगाव शहरात सतत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून रात्री पेट्रोलिंग करावी,अशी मागणी करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026

    कन्नड घाटात वळणावर कार घसरली; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.