• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आता लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री देणार महिन्याला १० हजार रुपये

editor desk by editor desk
July 17, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
आता लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री देणार महिन्याला १० हजार रुपये

सोलापूर : वृत्तसंस्था

लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी स्टायपंड देण्याच्या योजनेची घोषणा केली. बारावी झालेल्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, पदवी (डिग्री) झालेल्या तरुणांना महिन्याला १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज बुधवारी (दि.१७) पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने बोलताना जाहीर केले. तो वर्षभर कारखान्यात अप्रेंटशिप करेल आणि त्याला तिथे नोकरी लागले. यामु‍ळे कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ उद्योजकांना मिळेल. पण अप्रेंटशिपचे पैसे सरकार भरेल, असे शिंदे यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे मागितल्याचे ते म्हणाले.

याआधी सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल, असे जाहीर केलेल्या सरकारने नंतर एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा केली. आता लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी घातले विठुरायाच्या चरणी साकडे !

Next Post

अजित पवार पक्षात येणार ? मंत्री भुजबळ भेटीला : शरद पवारांनी सर्वच केला खुलासा !

Next Post
अजित पवार पक्षात येणार ? मंत्री भुजबळ भेटीला : शरद पवारांनी सर्वच केला खुलासा !

अजित पवार पक्षात येणार ? मंत्री भुजबळ भेटीला : शरद पवारांनी सर्वच केला खुलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group