मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले असून, माझ्या नादी कुणी लागले तर मी सोडत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी अनिल देशमुखांना बुधवारी दिला. तसेच शाम मानव हे सुपारीबाजांच्या नादी लागलेत का हे तपासावे लागेल, असे प्रत्युत्तर मानव यांना त्यांनी दिले आहे. अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी 300 कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केली, अनिल परब यांनी सत्तेचा गैरवापर केला, अशी चार…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शिफारसीवरून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाल ता. रावेर येथे नव्याने सुरु करायच्या प्रस्तावित नवीन कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या तपासणी समितीचा येथे पाहणी दौरा बुधवार, 24 जुलै रोजी झाला. समितीच्या बैठकीत सातपुडा विकास मंडळाचे मा. अध्यक्ष व विद्यमान सदस्य आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या आदिवासी भागाच्या या कर्मभूमीला कृषी शिक्षणाच्या माध्यमातून अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी यापुढे झोकून काम करणार कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. रावेर – यावल तालुक्यात कृषी व ग्रामविकास विभागाचे विकासापूरक निरनिराळे उपक्रम राबवणार असतांना आमच्या सातपुडा विकास मंडळाची नियोजित दोन्ही महाविद्यालये राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन्ही उत्तम…
जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हाफकिन अजिंठा फार्म- सुटिकल्स कंपनीतून १७ किलो तांब्याचे पाईप चोरणाऱ्या ज्ञानेश्वर रतन सोनार (वय २५) व विनोद गोपाळ मोरे (वय २२) यांना अटक केली होती. ते पाईत विकत घेणाऱ्या शेख सईद रफिक शहा (वय ५३, रा. रजा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीतून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाल्याची घटना दि. २० जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रायपूर येथे किराणा दुकानाजवळ बोलत उभ्या असलेल्या सचिन दिनेश यादव (२२, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) याला जवळ बोलावून त्याच्याशी वाद घालत चॉपरने वार केला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. मंगळवारी (२३ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात रायपूर कुसुंबा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सचिन यादव हा रायपूर कुसुंबा येथे कुटुंबासह राहतो. गावातील एक जण त्याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करायचा, मात्र पैसे न दिल्याने धमकी द्यायचा. २२ रोजी, सचिनची आई घरी येत असताना तिला त्या तरुणाने शिवीगाळ केली. त्यानंतर सचिन किराणा दुकानाजवळ एका जणासोबत बोलत असताना सचिनच्या आईला शिवीगाळ करणाऱ्यासह…
जळगाव : प्रतिनिधी कासमवाडी परिसरात दोन झाडे मालवाहू रिक्षावर पडल्याने तिचा चक्काचूर झाला. तसेच घराची भिंत पडण्यासह वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ही घटना बुधवारी (२४ जुलै) दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका, कासमवाडी परिसरातील भाजीपाला विक्रेते निशिकांत माळी यांनी त्यांच्या मालकीची मालवाहू रिक्षा (एमएच १९, बीएस १७७८) बुधवारी घरासमोर उभी केली होती. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर घरासमोर असलेली दोन झाडे या रिक्षावर तसेच त्यांच्या शेजारील घराच्या भिंतीवर पडली. यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, भिंतही पडली. झाडे पडल्याने वीजवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेत माळी यांचे नुकसान…
जळगाव : प्रतिनिधी रात्री घरातून गेलेल्या सोनू राजू बनसोडे (२७, रा. समतानगर) या तरुणाचा मृतदेह समता नगरातील एका विहिरीत आढळून आला. पाण्यावर चपला तरंगताना दिसल्याने बुधवारी (२४ जुलै) सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, आई व बहिणीसह समतानगरात राहणारा सोनू बनसोडे हा तरुण मंगळवारी (२३ जुलै) रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. बुधवारी (२४ जुलै) सकाळी ७ वाजता समता नगरातील विहिरीत चपला तरंगताना दिसल्या. त्यामुळे या ठिकाणी काही जणांनी गर्दी केली होती. या चपला सोनूच्याच असल्याचे त्याच्या आईने ओळखले.…
धुळे : प्रतिनिधी शहरातील फागणे गावाजवळ १८ जुलै रोजी सायंकाळी धरणगाव येथील व्यावसायिक आणि त्यांच्या मित्रांची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी धुळ्यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित फरार आहे. सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी एमएच १९ बीई १८०७ क्रमांकाच्या दुचाकीने किशोर पंढरीनाथ पाटील (रा. धरणगाव, जि. जळगाव) हे व्यावसायिक त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा यांच्यासह धरणगावला जात होते. त्यांच्याकडे सोयाबीन विक्रीची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड होती. ते फागणे गावाजवळ पोहोचले असता त्यांना दोन अनोळखी तरुणांनी अडविले…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन (वय २३) यांचे २४ रोजी मालपूरजवळ अपघातात निधन झाले. सविस्तर वृत्त असे कि, वाडे येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते ते एका महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते. सुटी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्यासाठी कामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूरजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली. समाधान सखाराम महाजन हे ४० आरआरजेएनके, पुच्छ येथे कार्यरत होते. समाधान यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. ते सखाराम आनंदा महाजन यांचे एकुलते एक पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, असा परिवार आहे. या घटनेची माहिती…
मेष राशी आजचा दिवस तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. आज तुम्हाला एकाचवेळी अनेक कामे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यस्त व्हाल. तुमचा रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. आज तुमच्या समोर काही आव्हाने उभे ठाकतील. पण घाबरून जाऊ नका. त्यावर मात करा. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. घरात लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असेल. त्यामुळे घरातील सर्व सदस्य त्यात व्यस्त होतील. कोणत्याही कामाची घाई करू नका. चांगलं काम केल्यास अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. समाजात तुम्हाला नवीन ओळख…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु होता त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. सलाईन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही. समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे. आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे, असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 5…

