मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी विरोधकांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले होते. यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, ”आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन…
Author: editor desk
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारांची भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पोलीस प्रशासन देखील त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. नुकतेच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर शाही मिरवुक काढणे गुंडाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढल्याबद्दल पोलिसांकडून गुंडाला चांगलाच दणका देण्यात आला आहे. मिरवणुकीत चारचाकी गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे. शिवाय ती चारचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने शरणपूर भागात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला नाशिक पोलिसांनी दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद पाटणकर हा एमपीडीए अंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जेरबंद होता. त्याची नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली होती. हर्षदची सुटका होताच त्याच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असतांना नुकतेच नवी मुंबईच्या बेलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे 4.30 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्याचीमाहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली दोघे अडकले…
जळगाव : प्रतिनिधी देशी दारुच्या दुकानाची खिडकी तोडून चोरट्यांनी देशी दारुच्या तब्बल ७६८ बाटल्यांसह इतर साहित्य मिळून ६३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. ही चोरी २३ जुलै ते २४ जुलै दरम्यान तालुक्यातील नांद्रा येथे झाली. या प्रकरणी २५ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नांद्रा येथे मनीष लालचंद झवर (५३, रा. नवीपेठ, जळगाव) यांचे देशी दारूचे दुकान आहे. २३ जुलै रोजी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाची लोखंडी ग्रीलची खिडकी तोडून दुकानात प्रवेश केला. तेथून चोरट्यांनी ५३ हजार ७६० रुपये किमतीच्या देशी दारुच्या…
जळगाव : प्रतिनिधी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील निंबादेवी धरण शुक्रवारी ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागासाठी शेतकऱ्यांना एक वरदान ठरले आहे. २००५ साली हे धरण पूर्णत्वास आले आहे. धरणामुळे येथील निसर्ग सौदर्य खुलले आहे. येथील पर्यटकांचे आकर्षण लक्षात घेता निंबा देवी धरण हे पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी या परिसरातून होत आहे. यामुळे या परिसरातील लहान उद्योगांना चालना मिळू शकते. यावल तालुक्याच्या पश्चिम भाग हा आधी ड्रायझोन व डार्क झोन म्हणून घोषित होता. परंतु, आता आता या धरणामुळे चुंचाळे, सावखेडा सिम, नायगाव, दहिगाव, बोराळे, नावरे, गिरडगाव, वाघोदा, शिरसाड, साकळी, वढोदे या गावांमधील शेत शिवारात विहिरींना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांची जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आले असून त्यांच्या जागी नागपूर येथील पवन देसले यांची पोलीस निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांची नागपूर नंतर पहिल्यांदाच पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पदभार घेऊन उल्लेखनीय कार्य कामगिरी केलेली आहे. त्यांनी यापूर्वी मुंबई. धुळे. नागपूर अँटी करप्शन विभाग, जळगाव जिल्ह्यातील, मेहूणबारे आणि नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना बढती देऊन धरणगाव येथे पोलीस ठाण्याचा प्रभारीपद…
मेष राशी या राशीच्या लोकांना आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या राशीवर शनीची दृष्टी असल्याने तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. अचानक पैसा खर्च होईल. भावांशी संबंध चांगले ठेवा. त्यामुळे फायदा होईल. तुमचं रागावर नियंत्रण नसतं. तुमच्या रागामुळे नात्यात कटुता येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला विचार करूनच बोलावं लागेल. लव्ह लाइफमध्ये तणाव होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज शेअर बाजारात गुंतवणूक करा. मात्र गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आज जास्त उतावळेपणा करू नका. नाही तर नुकसान होईल. आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुम्हीच दुखी व्हाल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी काही अडथळे येतील. या महिन्यात अधिकचा खर्च…
जळगाव : प्रतिनिधी वाळू वाहतुकीचा व्यवसाय करताना कारवाई न करण्यासाठी २ लाख ६० हजारांची मागणी करत तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची लाच घेताना भडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला जळगाव येथील लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. किरण रवींद्र पाटील वय-४१ रा. भडगाव असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भडगाव शहरातील रहिवाशी आहे. त्यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. यापूर्वी तक्रारदारावर भडगाव पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत दोन गुन्हे दाखल आहे. दरम्यान तक्रार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी…
जळगाव : प्रतिनिधी पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कवठळ येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. शरद खंडू पवार (वय ५७) रा. कवठळ ता. धरणगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, शरद पवार हे आपल्या पत्न ी, दोन मुलं व सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतलेली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. दरम्यान…

