Author: editor desk

रावेर : प्रतिनिधी रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी ढाब्यावर पोलिसांनी गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह एका संशयित आरोपीला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, फैजपूर विभाग कार्यालय आणि रावेर पोलिस स्टेशनच्या पथकाने पाल ते रावेर रोडवर पंजाबी ढाब्यावर छापा टाकला. या छाप्यात इसम इरफान नबाब तडवी (वय -३६, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) याला अवैधरीत्या गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला अटक…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते. काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ११ वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे ६ प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला ५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड) यांच्याविरोधात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाहनाच्या धडकेत निलेश दिलीप ताकुळदे (वय २८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. २२ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काशिनाथ चौकात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुसुंब तरुण वास्तव्यास आहे. दि. २२ जुलै रोजी तो एमएच १९ बीझेड ८११० क्रमांकाच्या वाहनाने जात होता. यावेळी काशिनाथ चौकात मागून येणाऱ्या एमएच ४१ जी ७६५५ वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश ताकळदे हा तरुण गंभीर जखमी णाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, तरुणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन बाहरचालकाविरुद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद जवळील एका गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. २१ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत असे कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील दाम्पत्य नशिराबाद जवळील एका गावात राहण्यासाठी आले होते. दि. २१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्या दाम्पत्याच्या पंधरा वधींच मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उमाळे गावाजळील पाझर तलावानजीक मंगळवारी (२४ जुलै) सकाळी अनिल कमलाकर जाधव (३५, रा. उमाळे, ता. जळगाव) हे मृतावस्थेत आढळून आले. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. सविस्तर वृत्त असे कि, शेतमजुरी करणारे अनिल जाधव हे आई-वडिलांसह उमाळे येथे राहत होते. सोमवारी (२२ जुलै) रात्री ते घरातून बाहेर गेले होते. मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सात वाजता उमाळे गावापासून जवळच असलेल्या एका पाझर तलावाजवळ ते पडलेले आढळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. अनिल जाधव हे अविवाहित होते. काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. मयताच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या शास्त्रीनगरातील कुटुंब कुलदेवताला राजस्थानमध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड रक्कम असा ४ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी दुपारी २:३० वाजता अनिकेत रमेश भावसार व त्यांचे कुटुंब कुलदैवत आंबाजी माता अबुरोड राजस्थान येथे दर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दि. २२ रोजी सकाळी पावणेआठच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या समोर राहणारे सचिन चौधरी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने फोनवरून सांगितले. व्हिडीओ कॉलवर त्यांना बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ते घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील खोलचर येथे मुलास मारहाण केल्याप्रकरणी वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तिघांनी बाप-लेकास मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खोलचर येथे दि. २१ रोजी रामचंद्र भट्टू हटकर यांच्या मुलास काही कारण नसताना गावातील शिवाजी सजन हटकर, अरुण शिवाजी हटकर, भुरा शिवाजी हटकर (सर्व खोलचर, ता. पारोळा) यांनी मारहाण केली होती. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. याचे वाईट वाटल्याने मंगळवारी सकाळी ९ वाजता पुन्हा या तीन जणांनी रामचंद्र हटकर यांना लाकडी दांड्याने मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी खरंच नेता असावा तर गुलाबराव पाटील यांच्या सारखा.. ज्यांना शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग, वारकरी, वयोवृद्ध, सर्वांची काळजी आहे. जनता त्यांना उगाचच ‘आपला गुलाबभाऊ म्हणत नाही. गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत इलेक्ट्रिक सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा गोड सोहळा आज सायंकाळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील भोकर गावात संपन्न झाला. भोकर गावात दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्प्यात ४ तर आज दुसऱ्या टप्प्यात ७ इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आल्यात. त्यात १) अनिल अशोक पवार २) रघुनाथ एकनाथ वाघ ३) ज्ञानेश्वर भगवान बाविस्कर ४) राकेश प्रभाकर सोनवणे ५) अनिल सुकदेव भोई ६) दिलीप नाना पाटील,…

Read More

मेष राशी आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या स्त्रोतावर लक्ष द्याल. शेजाऱ्यांसोबत वाद घालू नका. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचं मन एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असेल. घरात एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करताना मित्रांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आजचा दिवस तुम्हाला प्रसन्न करेल. तुम्हाला तुमच्या कामांबाबत सचेत राहावं लागणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार आहे. वडिलांनी एखादा सल्ला दिल्यास त्याची अंमलबजावणी करा. विनाकारण कोणतीही रिस्क घेऊ नका. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना दिलासा देणारी…

Read More