Author: editor desk

मेष राशी मेष राशीच्या लोकांना नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. वडिलांच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या मदतीने कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अधीनस्थांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात संयम आणि समर्पणाने काम करा. प्रगतीसोबत प्रगती होईल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी लांबचा प्रवास टाळावा अन्यथा प्रवासादरम्यान त्यांना दुखापत होऊ शकते. कार्यक्षेत्रातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्याकडून परत घेतली जाऊ शकते. मारामारीमुळे तुमची प्रतिमा खराब होईल. राजकारणामुळे तणाव आणि नैराश्य येऊ शकते. व्यवसायात अचानक नफा किंवा तोटा संभवतो. दारू पिऊन गाडी चालवू नका. मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी परिस्थितीनुसार काम केल्याने फायदा होईल. विरोधकांची…

Read More

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी भीषण आग व स्फोटाच्या घटना घडत असतांना नुकतेच जालना एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. गजकेसरी स्टील नावाच्या कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याने यात 20 कामगार जखमी झाले आहेत. तर यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने 20 जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. तर काही कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात आणण्यात आले. घटना घडताच कंपनीला बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी मविआकडून सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. यात उद्धव ठाकरेंकडून भर पावसात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर आंदोलनात आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे. FDC ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात. पॅरासिटामॉलवर बंदी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने Aceclofenac 50 mg + Paracetamol 125 mg टॅब्लेटवर औषधे म्हणून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्यातील महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. यासंबंधी दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत नियुक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन वर्षात या नियुक्त्या झाल्या नसून आताही त्या काही लगेच होणार नाहीत, असे म्हणत न्यायमूर्तींनी राज्य सरकारला धक्का दिला आहे. त्यामुळे आता या 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचे दिसून येत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना 12 आमदारांच्या नियुक्ती संबंधाची यादी दिली होती. मात्र कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळनजीकच्या वरणगाव परिसरातील भाविकांची बस शुक्रवारी नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वच भाविक भुसावळ तालुक्यातील रहिवासी आहेत. सदर भाविक पोखरा येथून काठमांडूला (क्र. यूपी ५३ एफटी ७६२३) जात होते. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीकाठी दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला. या बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच नेपाळच्या सीमेवर असलेल्या महाराजगंज (उत्तर प्रदेश) जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली…

Read More

मेष राशी या राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायी राहणार आहे. व्यापार करणारे आज संध्याकाळपर्यंत मोठी डील करतील. आज कार्यक्षेत्रात विशेष लाभ आणि सन्मान मिळणार आहे. कुटुंबासोबत लग्न सोहळ्याला जाल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. जुन्या गोष्टींमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग आहे. मात्र, गरज नसेल तर प्रवास करू नका. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज एकाद्या राजकीय आंदोलनात भाग घ्याल. ऑफिसचं वातावरण तुमच्या बाजूने राहील. सहकाऱ्यांचं कामात सहकार्य मिळेल. उद्योग व्यवसाय करणारे लोक आज नव्या योजनेवर काम करू शकतात. भविष्यात या योजनेचा फायदाच होणार आहे. एखादं कायदेशीर प्रकरण चालू असेल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी पारोळ्यात गद्दाराच्या मुलाच्या अंगात यायला सुरुवात झाली असून नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सभा आणि त्यातच एका गाव गुंडाला हाताशी धरून गद्दारच्या मुलाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु पारोळा पोलीस निरीक्षक व पोलिसांना सलाम करावा लागेल पद्धतशीरपणे परिस्थिती हाताळली आणि गद्दाराच्या मुलाचे डाव उधळून लावला. राजकारणाची परिसीमा गाठायला सुरुवात झाली असून आता खोके मजबूत झाल्यामुळे झोप लागत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डोक्यात सुपीक कल्पना येतात आणि त्यातूनच विनाशाची वाटचाल सुरू होते. पारोळा म्हटलं म्हणजे गद्दार आणि खोके हे समीकरण मोठे जुळले असून पारोळा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर लगत असलेल्या मोहाडी गावात मागील ५० वर्षापासून मोहाडी गावठाण व जिल्हा समाजातील नागरिक कायमस्वरूपी रहिवासी झाले होते. परंतु सदरील रहिवाशांना आपल्या घराचे पक्के उतारे मिळावे ही स्व. भिलाभाऊ सोनवणे यांचे स्वप्न जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ भिलाभाऊ सोनवणे यांनी पूर्ण केले आहे.यामुळे मोहाडी गावातील गावठाण व भिल्ल समाजाच्या वस्तीवरील जागेची व घरांचे सर्वे करून त्यांना देखील पक्के उतारे देण्यात आले आहे. स्व. भिलाभाऊंचे स्वप्न मा. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करत असल्याचा मनस्वी आनंद होत असून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांनाकित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला…

Read More

यावल  : प्रतिनिधी बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲड.नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दि.२१ रोजी यावल येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, महिला, मुलींची सुरक्षा करणार कोण?, सरकार करते काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत आंदोलकांनी रास्तारोको केला. टी पॉइंट चौकात…

Read More