एरंडोल : प्रतिनिधी जवखेड्याकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात कारने दुचाकीला समोरून कट मारल्याने दुचाकी रस्त्यावर कोसळली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या सुनीताबाई अरूण देशमुख (४८, रा. माळीवाडा, एरंडोल) या जागीच ठार झाल्या. ही घटना रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास एरंडोल-जवखेडा रस्त्यावर पाटाजवळ घडली. सविस्तर वृत्त असे कि, दुचाकीस्वार दुर्गेश अरूण देशमुख हा या अपघातात जखमी झाला. दुर्गेश हा दुचाकी क्रमांक (एमएच १९, डीसी ८४१५) ने त्याची आई सुनीताबाई देशमुख यांना घेऊन शेतीकामासाठी जात होता. दुर्गेश दुचाकी चालवत होता व त्याची आई दुचाकीवर मागे बसली होती. जवखेड्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून कट मारला. त्यात सुनीताबाई यांच्या डोक्याला मार लागल्याने…
Author: editor desk
मेष या राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. लोकांची तुमच्यावर मर्जी बसेल. मित्रांचा गोतावळा वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना अधिक फायदा होणार आहे. संध्याकाळी घरातील एखाद्या व्यक्तीचं दुखणं बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही परेशान होण्याची शक्यता आहे. परंतु, रात्री सर्वकाही ठिक होईल. प्रवासाचा योग आहे. वाहने जपून चालवा. वृषभ आज तुमची सर्व अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील. ते लोक तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अत्यंत हुशारीने या सर्वांचा बंदोबस्त कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. मुलाच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. मुलीच्या करिअरकडे अधिक लक्ष द्या. लव्ह…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता मंदीर परिसरातील हॉटेल भानू येथे जुन्या वादातून किशोर सोनवणे याचा तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना २३ मे रोजी घडली होती. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना रविवारी २८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पाठलाग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते मालवण पोलीसांनी अटक केली आहे. निलेश युवराज सपकाळे (वय ३५, रा. शनिपेठ, जळगाव) आणि अमोल छगन सोनवणे (वय ३०, रा. श्रीराम नगर, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरात कालिका माता मंदिर परिसरात हॉटेल भानू…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झारखंडचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. काल मध्यरात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी विविध राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरा राष्ट्रपती भवनाकडून याबद्दलचे परिपत्रक जारी करण्यात आले. या परिपत्रकात नवीन राज्यपालांची नावे जाहीर करण्यात आली. यानुसार सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राधाकृष्णन हे रमेश बैस यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. सध्या ते झारखंडचे राज्यपाल आहेत. तर झारखंडच्या…
पारोळा : प्रतिनिधी महामार्गावर सायंकाळी सुमारास ट्रक- पिकअप वाहन यांच्यात अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे मयताचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विचखेडे शिवाराजवळ जळगावहून धुळ्याकडे जाणारा ट्रक (एमएच१५/ जीव्ही ७८२७) हा भरधाव वेगाने चालत असताना धुळ्याकडून पारोळ्याकडे येणाऱ्या पिकअपने (एमएच१९/ सीवाय५०७६) ला जोरदार धडक दिली. त्यावरील चालक रफिक अहमद शरीफ अहमद (४०, धुळे), पूजा राजेश बागुल (२५, सिद्धार्थ नगर, पारोळा), अखिल अहमद अब्दुल सत्तार (धुळे) हे जखमी झाले तर रवींद्र कौतिक बागुल (५०, नगरदेवळा, ता. पाचोरा) यांचा जोरदार मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील विष्णापूर येथील एका पत्रीशेड असलेल्या घरावर छापा टाकून ११ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. यात एकास अटक करण्यात आली. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. सायसिंग बरकत बारेला (३६, रा. विष्णापूर) असे या अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, विष्णापूर येथील सायसिंग बारेला हा गावातील शिवाजी पाडा परिसरातील एका पत्रीशेडमध्ये अवैध गांजा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून ११ लाख ५०० रुपये किमतीचा गांजा तसेच ६ हजार रुपये किमतीचा वजन काटा व मोटारसायकल जप्त केली आहे. पुढील तपास पोहेकॉ. अनवर तडवी हे…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद टोलनाका येथे सीमाशुल्क अधिकारी, पुणे व जळगाव यांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत वाघाची कातडी जप्त करण्यात आली. जळगाव वनविभागाने सहा आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, या आरोपींमध्ये अजवर सुजात भोसले (वय ३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर, ह. मु. चांगदेव), मोहमंद अतहर खान (५८ रा., भोपाळ), नदीम गयासुद्दीन शेख (२६, रा. अहमदनगर), कंगनाबाई अजवर भोसले (३०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), तेवाबाई रहीम पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर), रहीम रफिक पवार (४०, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाइल, दोन दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या…
मेष व्यवसायात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी अधिक समन्वय राखावा लागेल. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात लाभाचे संकेत मिळतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. छोट्या प्रवासाची शक्यता जास्त आहे. कला, अभिनय, संगीत इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ भाऊ-बहिणींचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. व्यवसायात केलेली मेहनत फायदेशीर ठरेल. नोकरीत नोकरदार, वाहन इत्यादींचा आनंद वाढेल. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला मिळेल. त्यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. इमारत बांधकामाशी संबंधित लोकांना काही अडथळे आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. मार्गात वाहन अचानक बिघडू शकते. राजकारणात विरोधक षडयंत्र…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांताधिकारी, तहसिल व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय हे चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून बरेच कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो व किरकोळ कामांसाठी देखील या कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते. ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची देखील गैरसोय होत होती. अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात देखील ती असावी अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरु असून त्यांनी आज पुन्हा एकदा सरकारसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, आता आरक्षण मिळवणे किंवा पाडापाडी करणे हेच उद्दिष्ट आहे. मराठा आरक्षणावरुन विरोधक आणि सत्ताधारी हे उल्लू बनवत आहेत. आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही सत्ता येऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये हा राजकीय लोकांचा डाव आहे. त्यांना मराठे मोठे व्हावेत असं वाटत नाही, असे ते म्हणालेत. यावेळी बोलतांना जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप केले आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी…

