जळगाव : प्रतिनिधी अवैधपणे दुचाकीवरून गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस आणि लोखंडी कोयता सोबत घेऊन दुचाकीने जात असलेल्या दोन जणांना चोपडा ग्रामीण पोलिसांनी शनिवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, लोखंडी कोयता आणि दुचाकी असा एकुण २ लाख ६ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी २९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत दिली. मोहम्मद लतीफ शेख सलीम वय-२४ आणि इमरान खान अयुब खान वय-२३ दोन्ही रा. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील छात्रसेन…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३० जुलैपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना २९ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ने एक्स अकाऊंटवरून दिली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने (RRB) भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये कनिष्ठ अभियंता आणि इतर तांत्रिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक (संशोधन) यासह ७,९५१ पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असल्याने पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी निघाले असतांना त्यांनी आज पुणे येथे पाहणी केली असता सत्ताधारयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणाले कि, राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक, असाच कार्यक्रम सध्या चालू आहे. पुणे शहर हे एक शहर राहिले नाही तर ते…
सातारा : वृत्तसंस्था सातारा बसस्थानकाबाहेर आरडाओरड करत दंगा करणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका तरुणाने हवालदार दत्ता पवार यांच्या काखेत कोयत्याने वार केले. यामध्ये पवार जखमी झाले असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार दत्ता पवार हे सातारा बसस्थानकातील चौकीत रात्री ड्यूटीवर होते. त्यावेळी बसस्थानकाबाहेरील रिक्षा थांब्याजवळ काही तरुण दारूच्या नशेत आरडाओरड करत असल्याचे त्यांना प्रवाशांनी सांगितले. त्यानंतर संबंधित तरुणांना त्यांनी हटकल्यानंतर तेथून दंगा करणारे तरुण निघून गेले. सुमारे पंधरा मिनिटांनंतर मोपेड दुचाकीवरून चौघेजण पुन्हा त्या ठिकाणी आले आणि पवार यांना काही कळायच्या आत मोपेडवर अगदी…
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर मारहाण व अत्याचार होण्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे 70 हजाराचा ऐवज लुटल्याप्रकरणी ग्रामिण पोलिसांनी चार संशयिताना ताब्यात घेतले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सर्वांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, निलजी येथे शुक्रवारी मध्यरात्री चार चोरट्यांनी कर्नाटकातील मजूर कुटुंबाच्या घरात शिरून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवत महिलेस मारहाण केली. मंगळसूत्र, पैंजण, मोबाईल व चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 70 हजाराचा ऐवज लुटला. त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर चारही चोरटे अंधारात पसार झाले. रविवारी पोलिस उपाधीक्षक…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातील इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने खळबळजनक आरोप तर सर्वच आपबीती देखील सांगितली आहे. आम्ही आळंदीला पळून जाऊन विवाह केला. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. मी आणि अमित ९ जूनला पोलिस ठाण्यात आलो होतो. पुण्यात असताना आम्हाला मदत करणाऱ्या मित्रांच्या माध्यमातून ‘सैराट’ करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांतही लेखी तक्रार केली होती. तरीही माझ्या चुलत भावाने माझ्या नवऱ्यावर चाकूने सात वार करून संपवले, असे मृत अमितची पत्नी विद्या साळुंके हिने सांगितले आहे. आंतरधर्मीय विवाह केल्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद शहरातील पिंजारी हॉल जवळ बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्ता उललाह अमान उल्लाह शाह (वय २९ रा. मोमीन मोहल्ला, नशिराबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, उत्ता उल्लाह अमान उल्लाह शहा हा तरूण बेकायदेशीररित्या हातात तलवार घेवून दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक शहरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात रिपरिप पावसाची हजेरी सुरु असल्याने गेल्या सात दिवसांपासुन जिल्ह्यात सुर्यदर्शन नसल्यामुळे बळीराजा मेटाकूटीस आला आहे. तर शहरात देखील या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महिना अखेर सह ऑगस्टचा पहिला आठवडा देखील ढगाळ वातावरणासह पावसाचाच असेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. रविवार दि. २१ पासून जिल्ह्यात मध्यम व दमदार पावसाची हजेरी कायम आहे. दररोज दिवसभर पावसाची रिपरिप व ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. या पावसामुळे आरोग्याच्या समस्या, ज्येष्ठांसह बालकांना उद्भवू लागल्या आहेत. भिजपावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतांमध्ये तण वाढले असून फावरणी करण्यासाठी…
यावल : प्रतिनिधी यावल फैजपुर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ एका सेल्समनचे वाहन अडवून त्यास मारहाण करीत दोघांनी ३९ हजार ७०० रूपयांची रोकडे हिसकावली व दुचाकीवरून ते दोघे फरार झाले होते. हि घटना २५ जुलै रोजी रात्री १० वाजेला घडली होती. तेव्हा याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करतांना यावल पोलिसांच्या मदतीने शहरातील आयेशा नगरामधून दोघांना ताब्यात घेतले आहे. व त्यांनी चोरी केलेली रोख रक्कम देखील पोलिसांना काढून दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, यावल फैजपूर रस्त्यावर २५ जुलै च्या रात्री दहा वाजता चेतन गोपाल दरेकर हे सेल्समन आपले वाहन क्रमांक एम. एच. १९…
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत पंडित साबळे उर्फ चोर बाप्या आणि दोन महिन्यांपूर्वीच एमपीडीएमधून सुटून आलेला रितेश कृष्णा शिंदे उर्फ चिच्या या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घरफोडीचा तपास करीत असताना जालना येथून चोरलेली दुचाकी देखील पोलिसांच्या हाती लागली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या प्रेमलता लाड यांची मुलगी सासरी गेली आणि दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी बंद घरातून रोख १५ हजार रुपये व चांदीच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे व रितेश शिंदे या दोघांनी केल्याची…

