Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी भरधाव डंपरने चारचाकीला धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनसगाव जवळ झाला. सविस्तर वृत्त असे कि, बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी वाहनाने शुक्रवारी (२ ऑगस्ट) सकाळी जळगाव येथे येत होते. त्यावेळी सुनसगाव नजीक त्यांच्या चारचाकी वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने धडक दिली. यामध्ये चारचाकीमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष बावस्कर (५२), कारकून रामदास मोरे (५०), प्रकाश सोनार (४०), चालक कैलास सुशीर (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना सुशीर (३१) यांना किरकोळ मार लागला आहे. अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटू न दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा (ता. मुक्ताईनगर) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. सोम रहिम पवार (१४) असे या आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चार ओळींची सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे. त्यात वरील उल्लेख केला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  जळगावनजीक वाघाची कातडी जप्त करण्यात आल्याची घटना २७ जुलै रोजी घडली होती. यात सहा जणांना वनविभागाने अटक केली होती. यात सोम याचे वडील रहिम रफीक पवार (४०) आणि आई तेवाबाई पवार (३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचाही समावेश होता. या गुन्ह्याच्या…

Read More

मेष राशी तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्यावर जळतील. पण खटपटी करूनही त्यांना तुमचं काहीच करता येणार नाही. कारण ते तुमच्या बाजूने असतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाल. त्यामुळे तुमचा सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. नोकरीत तुमच्यावर ताण असेल आणि तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थी नवीन कोर्सला प्रवेश घेण्याची शक्यता आहे. मनपसंत ठिकाणी फिरायला जाण्याचा बेत आखाल. वृषभ राशी आजचा दिवस शुभ राहणार आहे. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी दिवस घालवाल. तुम्हाला मनपसंत जेवणाचा आनंद घेता येईल. आज दुपारी तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते. तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. समाजात तुमचा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात विरोधकांनी चांगलेच रान पेटविले होते मात्र आता मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितले आहेत. गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांचे नाव बदलण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करणार नाही, राज्यांना नाव बदलण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती ह्रषिकेश रॉय आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे आणि महसूल विभागांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाने निर्णय घेतला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीत असलेले अजित पवारांची राष्ट्रवादी व राज ठाकरे यांच्या मनसेत गेल्या दोन दिवसापासून मोठे राजकारण सुरु असतांना दोन्ही पक्षातील नेते माघार घेण्यास तयार नसून आणखी हा वाद वाढत आहे. नुकतेच आ.अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा मनसेच्या नेत्यावर गंभीर आरोप केले आहे. आ.मिटकरी म्हणाले कि, जय मालोकर हा अजित पवार गटात प्रवेश करणार होता. त्यामुळेच त्यांच्यावर दबाव होता असा त्यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी राज ठाकरेंसह सर्वांची चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत. तसेच अजून मी विधिमंडळाचा दोन वर्षी सदस्य आहे. एक एक प्रकरण काढू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. जय मालोकरचा मृत्यू दबावातून झाला असल्याचा…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या कामासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे बुधवारी भर पावसात खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. गुरुवारी सकाळी विवरा-रेंबोटा रस्त्याच्या डागडुजी संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. साहेब.. रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करा, आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असे सांगितले. अधिकाऱ्यांनी लागलीच दखल घेत मुरूम पाठवत रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली. रावेर-यावल परिसरातील अनेक गावात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे झाले असून काही ठिकाणी तर रस्तेच शिल्लक राहिलेले नाही. नागरिकांचे हाल होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडक्या बहिणींना विधानसभेनंतर काही मिळणार नाही. ही त्यांची फसवणूकच आहे असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच भाजपाशासित राज्यात लोकशाही राहिली नाही असे म्हणत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, ”विधानसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. या लाडक्या बहि‍णींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडच्या काही भागांमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेक मार्गावरील भीमभालीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे केदारनाथ खोऱ्याशी संपर्क तुटला आहे. येथे सुमारे ४५० लोक अडकून पडले आहेत, तर केदारनाथ महामार्ग सोनप्रयाग आणि गौरीकुंड दरम्यान वाहून गेला आहे. यामुळे चार धाम यात्रा ठप्प झाली आहे. केदारनाथ मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा थांबवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. केदारनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे भिंबलीजवळील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. एनडीआरएफने सोनप्रयाग आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात पावसाचा जोर वाढत असतांना राज्यातील देखील काही जिल्ह्यात जोरदार पावसचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज शुक्रवारी कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी…

Read More