नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकत्ता येथील घटना ताजी असतांना नुकतेच आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता ही बातमी समजताच महाविद्यालयात खळबळ उडाली. कॅमेऱ्यांद्वारे विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. जे नंतर लीक करून काही विद्यार्थिनींना विकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीक झालेल्या फोटो आणि व्हिडिओंची संख्या 300 च्या आसपास आहे. याप्रकरणी पोलिसांनी विजय कुमार याला अटक केली आहे, जो गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गुडीवाडा येथील बी.टेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याचा फोन आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आठवडाभरापूर्वी याची माहिती देण्यात आली…
Author: editor desk
जळगाव : प्रातिनिधी शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील जुना खेडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शनीपेठ पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळील जुना खेडी रोड वर एक अल्पवयीन मुलगा हा हातात गावठी पिस्तून घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरीष्ठ पोलीसांच्या आदेशानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोहेकॉ विजय खैरे, विक्की इंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील जिल्हा कारागृह नेहमीच कुठल्याना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतांना नुकतेच येथे बंदिवान कायद्यांच्या दोन गटात गटांमध्ये तुफान दगडफेक होऊन हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी १० वाजेच्या सुमारास घडली आहे यात एक जण गंभीर जखमी तर इतर किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बंदी वाहनांसाठी कॅन्टीनच्या सामानावरून कारागृहातील जिल्हा बॅरिकेट क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ येथे वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात दाखल असलेले कैदी यांच्यात जुना वाद उफाळून आल्याने दोन गटात सुरुवातीला किरकोळ वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर दोन गटात हाणामारी होऊन तुफान दगडफेक करण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था जनतेही जर बँकेत कामे असतील तर ती लवकर पूर्ण करून घ्या कारण काही दिवसातच सप्टेंबर महिना लागणार आहे.. या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या आहेत.. म्हणून सुट्ट्यांची यादी वाचूनच बँकेत जा , जेणेकरून तुमची फेरी वाया जाणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रविवार 1 सप्टेंबर 2024 रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील बँक शाखा बंद राहतील. याशिवाय या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मोठे सण आहेत, त्यामुळे संबंधित राज्यांमध्ये बँक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपला गणेश चतुर्थीचा सण आहे. RBI च्या हॉलिडे कॅलेंडर 2024 नुसार, भारतातील विविध क्षेत्रांमधील खाजगी आणि सार्वजनिक…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अयोध्या नगर येथील एका 45 वर्षीय डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मेडिकल समोर उभ्या तरुणांना शिवीगाळ करू नका अस डॉक्टर बोलल्याचा राग आल्याने आठ ते दहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या बेदम मारहाणीत डॉक्टर जखमी असून नाक आणि हाता पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या मारहाण करताचा व्हिडीओ समोर आला आहे. डॉक्टरला रक्त येईपर्यंत सात ते आठ जणांनी मारहाण केलीये. शुल्लक कारणावरून तिथे असलेल्या तरूणांनी डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टरांना मारहाण होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. आठ ते…
जळगाव : प्रतिनिधी दूध घेवून घरी परतणाऱ्या ९ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल कृत्य करुन १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने तीचा विनयभंग केला. ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आईविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ती मुलगी दुकानावरुन दूध घेवून घरी जात होती. यावेळी संशयित पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या आईने त्याला दिलेल्या चिथावणीवरुन त्याने घरी परतत असलेल्या मुलीसमोर अश्लिल चाळे केले. तसेच तिच्यासोबत अंगलट करीत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावरील दक्षिण बाजूस असलेल्या मुसाफिर खाण्यामध्ये लगेज स्कॅनर मशीन तपासणी केंद्राजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याची बॅग तपासण्यात आली. या बॅगेत तब्बल १ लाख ७० हजाराचा ९ पाकिटात गांजा आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूस असलेल्या मुसाफिर खाण्यामध्ये लगेज स्कॅनर मशीन तपासणी केंद्राजवळ बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाचे हेड कॉन्स्टेबल जोगिंदर नेरपगार व एमएसएफ कर्मचारी दीपक वसंत बाविस्कर यांना एका प्रवाशावर संशय आला. या वेळी त्याच्याजवळील असलेल्या २ बॅगाची तपासणी करताना संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा स्क्रीनवर आढळला. यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी संशयित व्यक्तीची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरात मुलेमुली लपंडाव खेळत असताना, एका ११ वर्षीय मुलीला घरात कोंडून ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शहरातील रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ६ वाजेच्या दरम्यान, रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी सिद्धार्थ वानखेडे (वय ४०) याच्या घराजवळ ११ वर्षाची मुलगी आणि काही मुले लपंडाव खेळत होती. मुलगी संशयित आरोपीच्या घरात लपायला गेली असता, सिद्धार्थ वानखेडे घरात आला. त्याने त्या मुलीला पाहिल्यानंतर घराचा…
मेष राशी तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते. त्यामुळे समाजात तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत अधीनस्थांशी चांगला समन्वय राहील. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. बौद्धिक कार्यात लोकांचे सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य व साहचर्य मिळेल. तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या मोहिमेत किंवा स्पर्धेत यश मिळेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासाशी संबंधित कामात अधिक व्यस्त राहतील. तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळेल. वृषभ राशी पालकांशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. जमीन, वास्तू, वाहनांच्या विक्रीत अडथळे येऊ शकतात. कामाच्या क्षेत्रात आराम आणि सोयी कमी होऊ शकतात. घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चोरी होण्याची शक्यता आहे. निरुपयोगी वाद टाळा. अन्यथा, गोष्टी आणखी वाढल्यास, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. काही महत्त्वाच्या कामात अडथळे…

