जळगाव : प्रतिनिधी तीन महिन्यांपासून दरोडा टाकून फरार असलेल्या सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर (वय २७, रा. दोडाईचा, ता. शिंदखेडा) हा शिरपुरकडे जात असतांना त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पाच हजार ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील सुलतान पिंजारी हा तीन महिन्यांपासून फरार होता. तो दोंडाईचाहून शिरपूरकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउनि गणेश वाघमारे, अनिल जाधव, पोहेकॉ विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने शिरपूर…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पत्नी माहेरी गेलेली असताना विजय काव्या पावरा (१९, रा. खळवाडी, जुने जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी (४ ऑगस्ट) साडेआठ वाजेच्या सुमारास वडील त्याला बोलविण्यास गेले त्यावेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळ चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेले पावरा कुटुंब सध्या जुने जळगाव परिसरात राहते. यातील विजय पावरा याची पत्नी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे विजय हा घरी एकटाच होता. त्याच्या खोलीच्या शेजारी त्याचे आई- वडील, भाऊ राहतात.
जळगाव : प्रतिनिधी पती चेन्नई येथे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी, तर पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या असताना चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे ग्रील कापून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात आठ तोळे सोने आहे. ही चोरी रविवारी (४ ऑगस्ट) दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड परिसरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे कांतीलाल कटारिया हे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी चेन्नई येथे गेले आहेत, तर त्यांच्या पत्नी शशिकला कांतीलाल कटारिया (६४) या सकाळी साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गणपतीनगरात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख एक लाख ५० हजार…
बोदवड : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रक आणि दूध वाहिनीचा येथे जोरदार अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेच्या सुमारास बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड शहरातील अमर डेअरीजवळ मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रकची (एमपी ०९- एचजी ८८९१) धडक वळण घेत असलेल्या दूध वाहिनीला बसली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात ट्रकच्या पुढील भागाचे तर दूध वाहिनीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दूध वाहिनीच्या आत असलेल्या मालाचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोणासही सुदैवाने फारशी इजा झाली नाही. याबाबत…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून आता पुणे, नाशिकमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. नाशिकला गाेदावरीला पूर आला असून, पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासलासह ४ धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे. नाशिकसह जायकवाडीच्या वरील भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात ३१ हजार २८० क्युसेक आवक होत आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजता धरणात १५ हजार १८५ क्युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे रविवारी साठ्यात १.२०% वाढ झाली, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधवसह गणेश खराडकर यांनी दिली. रविवारी पाणीसाठा ११.२० टक्क्यांवर होता. सध्याचा साठा बघता पुढील आठ महिने पिण्यासाठी व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे,…
मेष राशी आज आप अफवांवर लक्ष देऊ नका. निरर्थक पूर्वग्रहांपासून दूर रहा. आजूबाजूच्या लोकांवर लगेच विश्वास करण्याची सवय सोडा. वरिष्ठांच्या मदतीने आपल्या कार्यालयात आपली जागा टिकवून ठेवा. भौतिक सुविधा आणि साधनसंपत्ती वाढवा. तथ्यात्मक सौद्यांना आणि करारांना चालना द्या. आपल्या संपर्काचा व्यास वाढवा. आपल्या जवळच्या लोकांसोबत समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी आज तुम्ही सर्वांशी चांगला संवाद साधण्यात यशस्वी व्हाल. सकारात्मक बदल आणि सुधारणांना वेग मिळेल. सामाजिक प्रश्नांमध्ये तुम्ही प्रभावी राहाल. नातेवाईकांसोबत सुखकर वेळ घालवाल. तथ्यात्मक गोष्टींवर भर द्याल. तुमची बुद्धिमत्ता अधिक चांगली राहील. इतरांच्या बोलण्यात येणार नाही. जबाबदार लोकांशी भेट होईल. भेटवार्ता आणि प्रभाव कायम राहील. आत्मविश्वासाने पुढे जाणार. कला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात अपघाताची मालिका सुरु असतांना उत्तर प्रदेशातील इटावा येथील आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. लखनौहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस कारला धडकल्यानंतर नियंत्रणाबाहेर गेली आणि एक्स्प्रेस वेच्या खाली खड्ड्यात पडली. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इटावा एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी अपघाताची माहिती दिली. रायबरेलीहून दिल्लीला जाणारी डबल डेकर बस रात्री साडेबारा वाजता एका कारला धडकली. बसमध्ये ६० लोक होते, त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०-२५ जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचाही मृत्यू झाला.…
जळगाव : प्रतिनिधी उसनवारीच्या पैसे मागितल्याच्या कारणावरुन अविनाश किशोर जोशी वय २५, रा. संजय गांधी नगर, या तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घडली होती. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी विजय उर्फ भूरा मधुकर जोशी या संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांच्या मागावर पथक रवाना झाले आहे. सविस्तर वृत्त असे कि, संजय गांधी नगरात अविनाश जोशी हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळील विजय उर्फ भूरा जोशी याने अविनाश जोशी याच्याकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले होते.…
धरणगाव : प्रतिनिधी मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर एकाने अत्याचार केला, तर दोघांनी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिकेत जिजाबराव पाटील याने पीडितेसोबत मैत्री केली. दोघे जण फोनवर बोलत असत व सोशल मीडियावर मॅसेज करत असत. दरम्यान, पीडिताला घरी एकटी असताना जून २०२४ मध्ये तीनवेळा घरात येऊन जबरदस्तीने संबंध ठेवले, तसेच गावातील धीरज भाऊसाहेब पाटील, नीलेश ऊर्फ बाळा मनोहर पाटील, हिरालाल ऊर्फ बाळा शांताराम पाटील यांनी पीडिता घरात एकटी असताना घरात घुसून धमकी दिली. कोणास काही सांगितल्यास नवऱ्यास जिवे मारण्याची…
जळगाव : प्रतिनिधी आजाराला कंटाळून अश्विनी प्रकाश पाटील (१८, रा. कासमवाडी) या विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (३ ऑगस्ट) उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अश्विनी पाटील ही कासमवाडी परिसरात आई, वडील, दोन भावांसह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खासगी वाहनांवर चालक आहे. काही दिवसांपासून तिला आजार होता. त्यामुळे ती तणावात होती. शनिवारी (३ ऑगस्ट) घरी कोणी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला जीएमसीता दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

