Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव मालेगाव रोडवरील हॉटेलजवळ चाळीसगावकडून मालेगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृतांची ओळख पटलेली नाही. ही घटना शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. घटना घडताच पिकअप वाहनचालक वाहनासह पळून जात असताना पोलिस व नागरिकांनी त्याचा पाठलाग करीत बेलगंगा साखर कारखान्याजवळ पकडले. मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास पिकअप वाहनचालकाने भरधाव वेगाने मालेगावकडून चाळीसगावकडे येत असताना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेलसमोर चाळीसगावकडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास जोराने धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्यास जबर मार लागून तो जागीच ठार…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत. मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (१६, दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (१४, रा. रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता; तो दोन दिवसांपूर्वीच मालेगावहून पारोळा येथे आला होता. सविस्तर वृत्त असे कि, बडा मोहल्ला भागातील मुले शनिवारी दुपारी भोकरबारी धरणाकडे गेले होते. तिथे…

Read More

मेष राशी प्रेमी युगुलांमधील गैरसमज दूर होतील. दूरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबांपासून थोडा काळ दूर राहावं लागणार आहे. नव्या योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्याची अंमलबजावणी आतापासूनच करा. जमीन जुमल्याशी संबंधित व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज कामाचा व्याप असेल. सकारात्मक भूमिका, आत्मविश्वास यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. वृषभ राशी प्रेमीयुगुलांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. लग्नाची बोलणी करण्यासाठी अनुकूल दिवस. आज तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तुम्ही नेहमीच पर्यटनाच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असता. आजपासून तुमच्या या रोजनिशीला सुरुवात होणार आहे. व्यवसायात आज मोठी देवाणघेवाण होईल. आज तुम्ही जे काम कराल ते यशस्वी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी गावा- खेड्यांसह शहरांतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. त्यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यांत प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक रुपया जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा केवळ तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबाबत कोणत्याही प्रकारचा गैरसमज बाळगू नका, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या ट्विटर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून “धर्मवीर – २” चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली असून आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून “धर्मवीर – २” ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष कौतुकहीं करण्यात आले होते. सध्याची परिस्थिती ही नियंत्रणात असून अजून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला “धर्मवीर २” हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली. प्रदर्शनाची तारीख पुढे गेल्यावर चित्रपटगृहांकडून विचारणा होत…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पुणे येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीस यांनी देखील पलटवार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते अत्यंत वैफल्यग्रस्त झाले आहे. या वैफल्यातूनच ते अशा प्रकारचे शब्द वापरत आहे. त्यावर काय उत्तर देणार? अशा शब्दात त्यांनी ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, एक तर तू राहशील किंवा मी राहिल, असे आवाहन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुण्यात दरोडा टाकून पसार झालेल्या जितेंद्र उर्फ जितू प्रदिप वाघ वय ३२, रा. वाघनगर, भूषण गोकुळ कोळी वय २७, रा. समता नगर व चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख वय २३, रा. महाबळ या तिघ संशयितांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कानळदा येथून मुसक्या आवळल्या. सविस्तर वृत्त असे कि, पुणे येथील चतृः श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेले संशयित हे कानळदा गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोकॉ रविंद्र कापडणे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी पथक तयार करुन रवाना केले. या पथकाने सापळा रचून कानळदा ते भोकर रस्त्यावर गावाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशाच्या वादातून एका तरुणावर तीन जणांनी पोटावर व छातीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील जखमी झालेल्या तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या वय २८, रा जोशी कॉलनी जळगाव असे जखमी झालेल्या तरुणाचे या नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील शासकीय वस्तीगृहाजवळ पैशावरून झालेल्या वादातून एक अविनाश किशोर जोशी उर्फ लिंबू चाट्या या तरुणावर अज्ञात तीन जणांनी धारदार शास्त्राने छातीवर व पोटावर वार करून गंभीर दुखापत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असताना विजेचा धक्का लागून संजय बापू पाटील (४२, रा. धानवड, ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२ ऑगस्ट) उमाळा शिवारातील शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धानवड येथील शेतकरी संजय पाटील यांचे उमाळा शिवारात शेत आहे. शुक्रवारी सकाळी ते पत्नी, भावजयी व पुतणीसह शेतातील पाणी काढण्यासाठी गेले होते. यासाठी मोटार सुरु करण्यासाठी पाटील हे गेले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मजुरांच्या मदतीने पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील जयेश वासुदेव महाजन (माळी) (२०) हे त्यांची मालवाहू वाहन घेऊन जळगावात आले होते. त्यांनी दाणाबाजार परिसरात त्यांचे उभे केले. त्या वेळी चालकाच्या सीटच्या मागील पाकिटामध्ये २५ हजार रुपये ठेवलेले होते. चोरट्याने ही रक्कम लांबविले. महाजन पैसे घेण्यासाठी गेले त्या वेळी ही चोरी लक्षात आली. त्यांनी शोधाशोध केला, मात्र रक्कम सापडली नाही. या प्रकरणी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों किशोर निकुंभ करीत आहेत.

Read More