Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील खडका गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या पुतण्याचा रस्ता आडवून दोघांना बेदम मारहाण करून दुचाकीचे नुकसान केले. ही घटना रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील खडका परिसरात तुषार वासुदेव भोळे (वय ३२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक महिन्यापूर्वी तुषार भोळे याने प्रेमविवाह केलेला आहे. या रागातून रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तुषार भोळे दुकानावर बसलेला असताना गावात राहणारा सागर दगडू पाटील याने तुषारला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर तुषार…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना पाण्याच्या मोटरला धक्का लागल्याने एका ६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास डी. डी. नगर परिसरात घडली आहे.याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश सेनानी (६, मंडवाळी, बडवाणी) हा कुटुंबासह धुळे रोड परिसरात असणाऱ्या डी. डी. नगर भागात सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी मजुरी करण्यासाठी आला होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरांना पाणी मारण्यासाठी सुरू असलेल्या पाणी मोटारजवळ तो खेळता खेळता गेल्याने त्याला विजेचा धक्का बसला. त्याच्या पालकांनी त्याला लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत अमळनेर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात आज स्वातंत्र्याचा 78 वा स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असून देशभरात विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. देशाला 11 व्यांदा संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 60 वर्षांनंतर लागोपाठ तिसऱ्यांदा देशाची सेवा कऱण्याची संधी दिली. लोकांचे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येकाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची सेवा, प्रत्येक क्षेत्राची सेवा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचवण्याचा संदेश मिळाला आहे. या लाल किल्ल्यावरून मी देशवासियांना नमन करतो पंतप्रधान मोदी म्हणाले की, हम सबका साथ सबका विकास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांना गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. विशेष सेवा पदक मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस ठाण्याचे रंगनाथ धारबळे, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस मुख्यालयातील सपोनी नीलेश वाघ यांचा समावेश आहे. चोपडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ऑपरेशनदरम्यान केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. सोनवणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे २०१९ ते २०२१ यादरम्यान…

Read More

मेष राशी कामात अडथळे येतील. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे भान ठेवावे लागेल. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कार्यक्षेत्रात अधिक ज्ञान देण्याची गरज भासेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक दिशा द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक यश आणि लाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी व्यापारी लोकांची व्यापार परिस्थिती सामान्य राहील. उद्योग विस्ताराची योजना यशस्वी होईल. गायन क्षेत्राशी संबंधित लोकांना उच्च यश आणि सन्मान मिळेल. संपत्तीत वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांचा आशीर्वाद राहील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल. दूरच्या देशात सहलीला जाऊ शकता.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पारंपारिक शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी छात्रभारती जळगाव वतीने आज 14 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन करण्यात आली. कला, शास्त्र व वाणिज्य या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांना या योजनेतून वगळल्यामुळे 12 लाखांपेक्षा अधिक पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे व्यावसायिक शिक्षणासोबतच पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनाही शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रांताधिकारी यांच्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी छात्रभारतीचे जिल्हाध्यक्ष संदिप जाधव, तालुका उपाध्यक्ष भुषण पाटील, उपजिल्हाध्यक्ष ज्योती पाटिल. राहुल पाटिल.आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनसे व अजित पवार गटात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप संपलेला नाही. त्यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेले ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव होती, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख केला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील वातावरण आरोप प्रत्यारोपामुळे तापले असून दुसरीकडे कॉंग्रेसचे २ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. या दोन आमदारांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यापैकी एक मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांचा विश्वासू आहे हे विशेष. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर व जितेश अंतापूरकर यांनी मंगलवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे हे दोन आमदार लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेची कास धरतील असा अंदाज आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांनी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप आहे. त्यामुळे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप बुधवारी १३ ऑगस्ट नाशिकमध्ये झाला त्या वेळी ते बोलत होते. आपल्या ५६ मिनिटांच्या भाषणात त्यांनी फडणवीस आणि भुजबळांवरच घणाघाती प्रहार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा उल्लेखही केला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळू न देण्याची चूक फडणवीसांनी करू नये, अन्यथा विधानसभेला तुमच्यासह भाजपचे उमेदवार मुळासकट उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन नेते मनाेज जरांगे पाटील यांनी दिला. पक्ष, नेत्यापेक्षा समाजाला बाप माना. निर्णायक भूमिका घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीत पाडायचे की उभे करायचे याचा फैसला २९ तारखेला घेऊ. त्यासाठी नाशिकसह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रस्ते नवीन बनविण्यासाठी आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याला आता आम्ही मंजुरी देत आहोत. तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करीत असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर सांगितले. जळगाव शहरात “माझी लाडकी बहीण” योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या…

Read More