चोपडा : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला आहे. गुन्ह्यातील आरोपीस चोपडा शहर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारातील १० वर्षीय मुलीचा आरोपी सलमान खान अख्तर खान (२८, हमीदनगर, चोपडा) याने सोमवारी राहत्या घरात घुसून विनयभंग केला. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण, तसेच अनु. जाती- जमाती अत्याचार कायदा, पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता, आरोपीस न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे करीत आहेत.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी अभ्यास करीत नसल्याने वडिलांनी रागावले म्हणून अल्पवयीन मुलाने घर सोडले व थेट पुणे गाठले. मात्र आईच्या आठवणीने घरी येत असताना मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कार्यवाही पूर्ण करून कुटुंबाच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागामधील अल्पवयीन मुलगा ६ ऑगस्टच्या रात्री ११ वाजेपासून ते ७ ऑगस्टच्या पहाटे चार वाजेदरम्यान घरातून निघून गेला होता. त्याच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याप्रकरणी दि. ७ ऑगस्ट रोजी गुन्हाही दाखल झाला. पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. गणेश सायकर हे तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही शोध सुरू केला. या मुलाजवळ…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर अंतर्गत असलेल्या खाँजानगर भागातील बर्फ कारखान्यात अमोनिया गॅसचा स्फोट मंगळवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास झाला. मदतीसाठी गेलेल्या पहूरपेठचे सरपंच अबू तडवी यांना श्वसन आणि उलट्या होण्याचा त्रास सुरू झाल्याने जळगाव येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री येथील बर्फ कारखान्यात अमोनिया गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे गॅस काही वेळातच वातावरणात पसरला. रात्रीची वेळ असल्याने कारखान्यात कुणीच नव्हते. गॅस वातावरणात पसरताच ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. ही वार्ता गावात पसरताच लोक सैरावरा घर सोडून पळू लागले. दरम्यान, या ठिकाणी मदतीसाठी गेलेल्या सरपंच अबू तडवी यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले…
मेष राशी महत्त्वाच्या कामात वाद होऊ शकतो. सामाजिक कार्यात संयमाने वागा. विरोधी पक्ष तुम्हाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करूनही चांगले परिणाम मिळणार नाहीत. व्यवसायाच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीला बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये फायदेशीर संधी मिळतील. सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कोणाचीही दिशाभूल करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. धीर धरा. वृषभ राशी प्रशासनाशी निगडीत कामात यश मिळेल. तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढती होईल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळेल. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना रोजगार मिळेल. व्यवसायात मनापासून काम करा. यश मिळेल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेची कमान मिळू शकते. कार्यक्षेत्रात…
पुणे : वृत्तसंस्था आज सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहिण योजनेवरुन महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला. पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं. दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा काढा. 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहिण योजना थांबवू, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. योजनांसाठी वाटायला पैसा आहे, मग मोबदला देण्यासाठी का नाही? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, अंस कोर्टाने म्हटलं आहे. बी.आर. गवई आणि केजी विश्वनाथन या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमुर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुण्यात जमीन अधिग्रहणानंतर राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नाही, म्हणून याचिकाकर्त्यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी ५ वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विविध महत्त्वाचे ८ निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील शासकीय,…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यातील अजित पवार गट व शरद पवार गटाच्या महिला नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहे. यात अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यामध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे. आमच्याकडे सीडी आहे, असे म्हणत एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला होता. मात्र त्यांची सीडी अद्यापही बाहेर आली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य आहेत ते देखील आता शरद पवार यांचा पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचे कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवले, अशांना माझ्यावर टीका…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राजकीय विशेष एरंडोल तालुक्याला फार मोठा राजकीय वारसा आहे. परंतु 2009 च्या विधानसभा रचनेनुसार एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर एरंडोल तालुक्याला अवकाळा आले आहे. एरंडोल तालुक्यातील सहकाराचे नेतृत्व याच गद्दारांनी संपवले आहे. जिल्हा बँकेत दहा वर्षांपूर्वी राजपूत समाजाचे नेते हे संचालक होते त्या अगोदर मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते हे संचालक होते परंतु गेल्या दहा वर्षात घरातच सहकाराचे महत्वपूर्ण पद ठेवले आहे. एरंडोल तालुक्यात सहकाराचे नेतृत्व करणारे दुसरे कोणी नव्हते का असा प्रश्न एरंडोल तालुक्यातील जनतेला पडला आहे. अनेक सहकारी संस्था देखील यांनी वाट लावली आहे. आता तर खोक्यांच्या भरोसे अनेकांना विकत घेण्याची भाषा सुरू आहे. याच…
जळगाव : प्रतीनिधी जशी जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसे तसे सर्वच पक्षांनी सर्व सुरू केले आहे. जळगाव शहरासाठी पुन्हा उमेदवार रिपीट केला तर धोका होण्याची शक्यता अनुलोप या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व माहिती पुढे आले असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून समजते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपाला ताब्यात ठेवणे गरजेचे आहे महापालिका क्षेत्र असल्यामुळे शहरी मतदार हा भाजपाच्या बाजूने आहे परंतु उमेदवाराच्या बाबतीत निगेटिव्ह सेट झाला असल्याने नकारात्मकता मामा विषयी वाढत चाललेली आहे. शहरातील रस्त्यांना मामा जबाबदार अशा पद्धतीने मांडणी विशेषता पक्षांतर्गतच होत आहे. भाजपामध्ये दोन गट असल्याने मामा विषयी प्रचंड नाराज निर्माण झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत मोठा…
जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानासह अद्यावत राहून स्वतामध्ये तसे बदल करून घेणे गरजेचे आहे.मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून शाळेचा नावलौकिक वाढवावा. यशस्वी शाळांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ’ स्पर्धेमुळे समाजाचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ – सुंदर शाळा” पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. डायटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी सांगितले की, कुठल्याही व्यवस्थेच्या कामगिरीसाठी क्षमता आणि बांधिलकी या दोन गोष्टी शिक्षकांमध्ये असणे महत्त्वाचे आहे तर ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’…

