Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले १०० कोटी : आ.भोळेंचा पाठपुरावा यशस्वी !
    जळगाव

    जळगावच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले १०० कोटी : आ.भोळेंचा पाठपुरावा यशस्वी !

    editor deskBy editor deskAugust 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील रस्ते नवीन बनविण्यासाठी आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याला आता आम्ही मंजुरी देत आहोत. तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करीत असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर सांगितले.

    जळगाव शहरात “माझी लाडकी बहीण” योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती वेगवान होते. त्यामुळे (अर्थमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजितदादांकडे पाहून) आम्ही १०० कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत, असे ते म्हणाले.

    तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करून उद्योगमंत्र्याना सांगून आम्ही भगिनींना रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले. पारोळा नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनांबाबत आ. चिमणराव पाटील यांच्या प्रस्तावासाठी आम्ही जीआर काढलेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.