पुणे : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे अनेक ठिकाणी मेळावे सुरु असून नुकतेच आज पुण्यात लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला. या सोहळ्यात फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेत अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी प्रयत्न झाले, पोर्टल बंद पाडण्यासाठी जंक डेटा टाकला असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. या कार्यक्रमासाठी पुण्याचेच निवड करण्यामागचे कारण फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सांगितले आहे. ते म्हणाले, ”आज खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकींचा कार्यक्रम आहे. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. लाडक्या बहिणीची ही औपचारिक सुरूवात झाली आहे. याची सुरूवात पुण्यातूनच का असे विचारण्यात आले.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा 16 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीने यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला पहिला धक्का बसण्याची शक्यता आहे. समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटील महाविकास आघाडीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कपिल पाटील हे उपस्थित नव्हते. मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि कपिल पाटील यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. तो दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत कपिल पाटील यांच्या उमेदवारासमोर ठाकरे गटाने उमेदवार दिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोलकातामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज (दि.१७) देशभरातील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात संपाची घोषणा केली आहे. या संपादरम्यान सर्व लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद राहणार आहे. मात्र, या काळात आपत्कालीन सेवा सुरू राहतील. कोलकातामधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करत निर्घृण हत्या केली. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने आज (दि.१७) देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. या संपादरम्यान सर्व लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कांचन नगरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फोटो व्हाट्सअप स्टेटसला लावून बदनामी केली तसेच पीडित मुलीच्या आईला अश्लील शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. याप्रकरणी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांचन नगरातील एका भागात अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारास वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी अक्षय पंढरीनाथ सपकाळे (वय-२७), रा. बांभोरी ता. धरणगाव याने पीडित मुली सोबतचे असलेले फोटो व्हाट्सअपच्या स्टेटसला लावून समाजात बदनामी केली. तसेच पीडित मुलीच्या आईला फोन करून अश्लील…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील वाकडी तालुक्यातील वाकडी शिवारात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षाच्या मुलाचा तुटलेल्या वीज तारेला नकळत स्पर्श झाल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर या वेळी सुर्दैवाने तेथे असलेले बालकाचे वडिल बालबाल बचावले. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा आ. मंगेश चव्हाण तेथेच होते. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांकडून पंचनामा करुन घेत बालकाचा मृतदेह रुग्णालयात नेला. तसेच पीडित कुटुंबीयांना धीर देत मदतीचे आश्वासन दिले. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील वाकडीच्या शिवारातील शेतात बकऱ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या चिमुकल्याचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा नकळत स्पर्श झाल्याने जागेवरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.…
जळगाव : प्रतिनिधी कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली मात्र अद्याप आरोपीचा शोध लागला नाही व त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. याचा निषेध म्हणून शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभर काळी रिबिन बांधून सर्व हॉस्पिटलमध्ये व क्लिनिक मध्ये सर्व डॉक्टर्स व सर्व स्टाफ यांनी निषेध नोदवावा आणि आय.एम.ए च्या भारत भरातील आंदोलनास सर्व डॉक्टर सेल तर्फे जाहीर पाठिंबा द्यावा असे सर्व डॉक्टर सेलच्या डॉक्टरांना जाहीर आव्हान करण्यात आले आहे की आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये व क्लिनिक मध्ये सर्व डॉक्टर्स व सर्व स्टाफने फक्त गंभिर रुग्णांना ऊपचार द्यावेत व आपले क्लिनीक बंद ठेऊन जाहीर निषेध नोंदवावा. असे आवाहन…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरयाणातील निवडणुकीच्या तारखांची शुक्रवारी घोषणा करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा मात्र केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक ही दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार या चर्चेला बळ मिळाले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन राज्यांची निवडणूक जाहीर केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रातील निवडणूक कधी घेणार, असा प्रश्न केला असता त्यांनी स्पष्ट केले की, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे घेण्यात आली होती. त्यावेळी जम्मू-काश्मीरची निवडणूक हा विषयच नव्हता. मात्र, आता आम्हाला पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक घ्यायची आहे. त्यातील जम्मू-काश्मीर, हरयाणाची निवडणूक आम्ही जाहीर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र, झारखंड या दोन…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये दोन गट पडले असून विद्यमान आमदाराविरुद्ध मोठा गट सक्रिय झाला आहे. गेल्या चार दिवसापूर्वीच शहरातील जीएम फौंडेशन येथे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांना भाजपाचे जळगाव शहरातील प्रमुख पदाधिकारी भेटले व मामा नको म्हणत भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महापालिकेत भाजपाला 57 नगरसेवकांचे यश मिळाले होते त्यातले 27 नगरसेवक दोन वर्षांपूर्वीच फुटले त्यानंतर उर्वरित 20 नगरसेवकांपैकी जवळपास 13 नगरसेवकांनी बंडाचा पवित्रा मामा विरुद्ध घेतला आहे. तसेच यात शहरातील प्रमुख पदाधिकारी देखील सहभागी आहेत. यामुळे चांगलेच अडचणीत मामा आले आहे. कापसे, सोनवणे, खडके, बेंडाळे, निकम, पाटील, श्रीपाद, कुलकर्णी आधी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…
जामनेर : प्रतिनिधी शहरातील १८ वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी या तरुणाच्या पालकांकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी हा तरुणा व्यवसायासाठी खेड्यावर गेला होतो. दुपारी भावाच्या व्हाट्स अॅपपर या तरुणाचा अपघाताचा मेसेज आला.. पण तिथे नातेवाईक गेले असता त्याची दुचाकी आढळून आली. यानंतर रात्री आठ वाजता तरुण हरवल्याची तक्रार जामनेर पोलिसात नोंदविण्यात आली.. यानंतर त्याच्या भावाला पुन्हा मेसेज आला की, तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. त्याला सोडवायचे असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील. दरम्यान, मोबाईल लोकेशनमध्ये हा तरुणा अजमेर येथे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना नुकतेच नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने चाळीसगावकडे परतणारे पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलनजीक शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. अविनाश विजयसिंग पाटील (५८) व मीनाबाई अविनाश पाटील (५२, रा. चाळीसगाव) असे ठार झालेल्या दाम्प्त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत असेलेले अविनाश पाटील हे दुचाकी (क्र. एम.एच.१९ इड़ ४७१७) ने पत्नी मीनाबाई पाटील यांच्यासह पिंपळकोठा (ता. एरंडोल) येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला आले होते. अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य घराकडे परत जात…

