Author: editor desk

भुसावळ : वृत्तसंस्था रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज आहे. रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई-नागपुर आणि नागपूर – पुणे दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे.. लोकमान्य तिलक टर्मिनस मुंबई-नागपुर विशेष (2 सेवा) ०२१३९ विशेष दि. १५.०८.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपुर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. (१ सेवा) ०२१४० विशेष दि. १६.०८.२०२४ रोजी नागपुर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (१ सेवा) थांबे -: ठाणे, कल्याण, नासिक, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव आणि…

Read More

भडगाव : प्रतिनिधी खळ्यात झोपलेल्या विठ्ठल आनंदा पाटील (वय ४८, रा. पिचर्डे, ता. भडगाव) या लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून केला. ही घटना पिचर्डे गावात सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित अभिमान आनंदा पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात विठ्ठल पाटील हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचा मोठा भाऊ अभिमन हा शेतजमिनीचा हिस्सास पाळट करून द्या असे विठ्ठल आनंदा पाटील यांना वारंवार सांगत होते. दरम्यान, विठ्ठल पाटील हे त्यांची वडीलोपार्जीत असलेली जमिनी प्रत्येकाच्या नावावर करुन द्या असे त्यांना सांगत असल्याने अभिमान पाटील यांना त्याचा…

Read More

चाळीसगाव : प्रातिनिधी मालमत्तेच्या वादावरून शेख नफिस शेख मोहम्मद याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून दोघेजण फरार झाले. ही घटना १२ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान कन्नड घाटात घडली. यात तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी त्या दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी शेख नफिस शेख मोहम्मद (सलाटर हाउस, पवार वाडी, मालेगाव) यास त्याचा भाऊ शेख रईस शेख मोहम्मद व त्याचा मित्र सोमीन मोहम्मद उमर फजल मोहम्मद (दोन्ही मालेगाव) यांनी फिरण्याच्या उद्देशाने कन्नड घाटात दुचाकीने आणले. घाटातच मालमत्तेमधील हिश्श्याच्या कारणावरून त्यास जाब विचारत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथील कानुबाईच्या मातेच्या विसर्जन मिरवणुकीत सोमवारी एका युवकाचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे या विसर्जन मिरवणुकीच्या आनंदावर विरजण पडले. मिळालेल्या माहितीनुसार, बांभोरी बुद्रुक येथील मयूर राजेंद्र पाटील (२३) हा गावातील विहिरीत कानुबाई मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना विसर्जन मिरवणुकीत सामील झाला होता. तो विहिरीत खाली डोकावून पाहत होता. त्याचवेळी त्याचा पाय सरकल्याने तो विहिरीच्या पाण्यात पडला. लोकांनी त्यास विहिरीतून त्वरित बाहेर काढले. पुढील उपचाराकरिता धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सुधाकर नथू पाटील यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार प्रमोद पाटील तरीन भाटेत

Read More

जळगाव ; प्रतिनिधी तुम्ही बाजारात जाऊन या, असे सांगत पैसे देऊन आई-वडिलांना बाहेर पाठविल्यानंतर मुकेश नारायणसिंग ठाकूर (३२, सुप्रीम कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (१२ ऑगस्ट) दुपारी २ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे मुकेश ठाकूर हे आई, वडील, भावासह सुप्रीम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी दोघं मुलांसह माहेरी गेलेली असताना या तरुणाने आई- वडिलांना बाजारात जाऊन या, असे सांगून त्यासाठी पैसेही दिले. त्यामुळे आई-वडील सुभाष चौकात गेले होते. त्यानंतर घरी कोणीही नसताना मुकेश यांनी गळफास घेतला. दुपारी २ वाजेच्या सुमारास आई-वडील घरी आले, त्या वेळी त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र,…

Read More

रावेर: प्रतिनिधी मध्य प्रदेशातील एक गावठी कट्टे विक्रीसाठी आला असता पोलिसांनी त्याला शनिवारी रात्री ९ वाजता अटक केली. तोफसिंग चावला असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पाल-खरगोन रस्त्यावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशाच्या सीमेवर एक जण गावठी कट्टा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत तोफसिंग चतरसिंग चावला (वय २७, रा. धसली, ता. झिरण्या, जि. खरगोन) याच्याकडून दोन देशी कट्टे आणि दोन काडतुसे जप्त केली आहे. फौजदार तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने पाल खरगोन रस्त्यावरील हॉटेलजवळ सापळा रचला आणि आरोपी चावला याला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन पिस्तुले,…

Read More

मेष राशी बिघडलेली कामे सुरळीत होतील. वाहनांची खरेदी-विक्री करण्याची संधी मिळेल. लांबचा प्रवास अनुकूल असेल. नवनिर्माण योजना आकार घेईल. कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी आनंददायी असेल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळ असण्याचा लाभ मिळेल. तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प सांभाळण्याची संधी मिळू शकते. सरकारकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. एखाद्या नयनरम्य ठिकाणी सहलीला जाल. कुटुंबातील तणाव संपुष्टात येईल. वृषभ राशी व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत अधीनस्थांशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. तुम्हाला नको असलेल्या प्रवासासाठी जावे लागेल. राजकारणात जनतेचा पाठिंबा मिळेल. तुमचे धोरण विचारपूर्वक ठरवा. अन्यथा मोठी चूक होऊ शकते. चोरीची भीती सतावेल. दुसऱ्याच्या कामाची जबाबदारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महायुतीमध्ये देखील जागा वाटपाच्या बैठकी सुरु झाल्या असून महाराष्ट्र राज्य भाजपमधील देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षाचा कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती भाजपचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच आगामी निवडणुकीचे किंग मेकर असतील. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 2.30 वाजता सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. त्यांचं मराठ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पुन्हा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. छगन भुजबळांनी पुन्हा आपल्या ओबीसी एल्गार सभा सुरू केल्या असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाहीच, असं सांगलीतील सभेतून छगन भुजभळ म्हणालेत. यालाच पलटवार म्हणून जरांगेंनी सुपडा साफ करण्याचा इशारा दिला…

Read More