Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सहा दुचाकींसह दोन चोरटे अटकेत
    क्राईम

    सहा दुचाकींसह दोन चोरटे अटकेत

    editor deskBy editor deskOctober 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकींसह रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांनी जळगाव जिल्ह्यासह पुणे व मुंबई येथूनही दुचाकी चोरलेल्या असून त्या चार दुचाकींचा शोध सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना दिल्या. त्यांनी तयार केलेल्या पथकाला रवींद्र पाटील व दीपक पाटील हे दुचाकी चोरी करून वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन सहा दुचाकी हस्तगत केल्या.

    ही कारवाई पोउनि राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, रणजित जाधव, दीपक चौधरी यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.