Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी शोधली असल्याचा उल्लेख केला होता. मात्र त्यांच्या या उल्लेखावरून आता विरोधकांनी टीका केली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याला इतिहासाचे विकृतीकरण म्हटले आहे. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढल्याबद्दल कोणत्याही इतिहासकारांमध्ये मतभेद नसल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. इतिहासाच्या कुठल्याही पानावर लिहिलेले नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टीळकांनी शोधून काढली,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीकास्त्र साधत असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला अडकवण्यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख यांच्याकडून भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्हात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात देशमुख यांनी फडणवीसांवर…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच नागपुरात एका भरधाव वेगाने आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक देत दोन जणांना गंभीर जखमी केले. यात इतर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नागपुरातील हिट अँड रन घटनेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पोलिसांनी आतापर्यंत या घटनेचा तपास कसा सुरु आहे, याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ तारखेला रात्री अपघात झाला. यानंतर अर्जुन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदार संघातील नागरिकांना आला आहे. तालुक्यातील म्हसावद येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता म्हसावदसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे. म्हसावदसह परिसरातील रुग्णांचे शासकीय रूग्णालया अभावी मोठी गैरसोय होत होती. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शब्द दिला होता की, म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येईल. त्यानुसार गुलाबभाऊंनी आपला शब्द पाळला असून म्हसावद येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 3452.14 लक्ष रुपये एवढ्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळवून आणली आहे. म्हसावद येथील ३० खाटांचे ग्रामीण…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी शरद पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर नलिन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नवीन महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देताना निरीक्षक भास्करराव काळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांचे सह माजी आमदार बी.एस.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर, अँड रवींद्र पाटील, वैद्यकीय आघाडीचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन वसंतराव पाटील,माजी आमदार अरुण पाटील, एजाज मलिक, वाल्मीक पाटील, वंदना चौधरी हे यावेळी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील यांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यात जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राज्यात आगामी काळात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जून्या वादाच्या कारणावरुन आकाश केशव पवार (रा. समता नगर) याने तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास समता नगरता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात सुलोचना रविंद्र माळी (वय ६८) या वास्तव्यास आहे. जून्या वादाच्या कारणावरुन संशयित आकाश केशव पवार याने सुलोचना माळी यांचा मुलगा मुकेश याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. लाकडी दांडका मुकेशच्या डोक्यात टाकल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याप्रसंगी सुलोचना माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी विषारी औषध प्राशन केलेल्या शरद भागवत धिवर (वय ४७, रा. हरिविठ्ठल नगर) यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना रविवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता मृत्यू झाल. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरीविठ्ठल नगरात शरद धिवर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दि. २४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी त्यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यांना नातेवाईकांनी तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव, धुळे जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातून दुचाकी चोरणारा दीपक सुमाऱ्या बारेला (२९, रा. कर्जाणा, ता. चोपडा) हा गावात आल्याची माहिती मिळताच त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) पत्रकार परिषदेमध्ये दिली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी संदीप पाटील आणि प्रवीण मांडोळे हे पेट्रोलिंग करत असताना दीपक बारेला हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची त्यांना माहिती मिळाली. याविषयी त्यांनी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळविले. त्यांनी वरील दोघांसह नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, गोरख बागूल, राहुल बैसाणे, प्रमोद ठाकूर यांना…

Read More

चोपडा : प्रतिनिधी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये कार्यरत चोपडा येथील जवान अरुण दिलीप बडगुजर (वय ४२, रा. साई बाबा कॉलनी) हे सोमवारी त्रिपुरा येथे चकमकीत लढताना शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांपासून १०५ बीएसएफ बटालियन (सीटी /जीडी) मध्ये कार्यरत होते. ते चार महिन्यांनी निवृत्त होणार होते. सोमवारी दुपारच्या सुमारास भारत-बांगलादेश सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले, अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली. ही वार्ता सायंकाळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Read More