मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचार सहित लागण्याचे संकेत असल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून यात मनसेने देखील महत्वाची भूमिका घेतली आहे. नुकतेच आज मनसेचा मेळावा झाला असून यात राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रातील मतदारांनी महाराष्ट्र निर्माण सेनेवर विश्वास दाखवावा, त्यांना आपण उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हे हेवा वाटावा असा महाराष्ट्र…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे. भारत देशाची संस्कृती महान आहे. या संस्कृतीचे अनेक देशांनी अनुकरण केले आहे. तसेच, भारतमातेचे पूजन व संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीयांनी आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी दि. १२ रोजी केले. यावेळी त्यांनी विजयादशमीच्या जळगावकरांना सदिच्छा दिल्या. जळगावचा राजा श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे प्रभू श्रीराम पूजन व भारत माता पूजन शनिवारी दि. १२ रोजी प्रशस्त महानगरपालिकेच्या इमारतीखाली करण्यात आले होते. कार्यक्रमात भवानी मंदिरचे महाराज महेश त्रिपाठी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसंच ध्वजाचे पूजन करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी आजीच्या घरी झोपण्यासाठी गेलेला असताना योगेश संतोष पाटील (रा. शिवकॉलनी) याने चोरलेले सहा लाख दोन हजार १४० रुपयांचे सोने तो विकायला आला, मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्याचा हा डाव फसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला बळीराम पेठेतून अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत असताना संशयित योगेश पाटील हा चोरलेले दागिने विक्रीसाठी बळीराम पेठ परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार योगेशची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरलेले दागिने सापडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हे दागिने आजीच्या घरून चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने दागिने जप्त करून…
जळगाव : प्रतिनिधी दुकानावर चहा करीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने अरविंद अमाला पांडे (४९, मूळ रा. उत्तरप्रदेश, ह.मु. जळगाव) या चहा विक्रेत्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराचा झटका आल्याने ते स्टोव्हवर पडल्याने त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना शुक्रवारी (११ ऑक्टोबर) ट्रान्सपोर्ट नगरजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले अरविंद पांडे हे सध्या जळगावात राहत होते. फिरत्या चहा दुकानावर ते व्यवसाय करीत होते. शुक्रवारी याच फिरत्या चहाच्या दुकानावर ते चहा करण्यासाठी दूध गरम करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते पेटत्या स्टोव्हवर पडले. त्यामुळे त्यांच्या मानेजवळ भाजले गेले. ही घटना लक्षात येताच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व…
जळगाव : प्रतिनिधी व्याजाने पैसे देण्यासाठी आपले स्त्रीधन गहाण ठेवण्यासाठी दिले होते. मात्र काही दिवसांपासून त्यांनी ते परत मिळविण्यासाठी संशयितांकडे तगादा लावला होता. परंतु मारेकऱ्यांनी नवाल यांचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार त्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी जावून त्यांचा निघृण खून केल्याची कबुली संशयीत मारेकऱ्यांनी पोलिसांनी दिल्यानंतर खूनाचा उलगडा झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागे असलेल्या रणछोड नगरात सुवर्णा राजेश नवाल (वय ५८) या महिलेच्या डोक्यात अवजड वस्तू डोक्यात टाकून त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोधार्थ तपासचक्रे फिरविली. यावेळी त्यांना…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथे ६ रोजी गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात ८ जण जबर भाजले गेले होते. त्या ८ जणांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले होते. यातील सागर किसन मराठे (वय ३२) या तरुणाचा शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककला पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील अनिल पुणा मराठे (मानकीवाले) यांच्या घरात गॅस गळती झाल्यानंतर भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ८ जण गंभीर भाजले गेले होते. या सर्वांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. यात सागर मराठे हा मृत्यूशी झुंज देत असताना त्यांची प्राणज्योत मालावली. मृत सागर मराठे यांच्या पश्चात आजी,…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री तीन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना वांद्रे पूर्व येथे घडली. गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक उत्तर प्रदेश आणि दुसरा हरयाणाचा आहे. वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी जंक्शन परिसरात बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. तीन तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.…
महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने मनातील आनंद वाढणार ! आजचे राशिभविष्य दि १३ ऑक्टोबर २०२४ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आणि प्रगतीशील असेल. अधिक सकारात्मक वेळ व्यतीत होईल. कसा तरी संयम ठेवा. व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. ज्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. परदेश सेवेशी संबंधित लोकांना विशेष यश आणि सन्मान मिळेल. आज तुम्हाला संपत्तीशी संबंधित कामात अधिक मेहनत घेऊन यश मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस अधिक फलदायी असेल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने मनातील आनंद वाढेल. आज तुम्ही तुमच्या शौर्य आणि शहाणपणाने तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढवाल. नवीन…
बीड : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वी दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीडमधील भगवान गडावर दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांचे जोरदार भाषण झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या राज्यातील जेवढे महापुरुष, महंत, संत होऊन गेले. त्या महंतांनी, संतानी महापुरुषांनी जात पात धर्मासाठी काम केलं नाही. शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करण्यासाठी आठरापगड जातींना घेऊन राज्य उभं केलं. ते एका जातीचं राज्य नव्हतं. संत भगवान बाबांनी अध्यात्म शिकवला. तो कोणत्या एका जातीसाठी नव्हता. सर्वांसाठी होता. आज या दसऱ्या मेळाव्याला सर्व जाती धर्माचे लोक आले आहेत. इथे आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्माचा आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज सर्वत्र विजया दशमीचा उत्साह सुरू असून दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील होमगार्डचे मानधन जवळपास दुप्पट करणार असल्याची घोषणा केली आहे. या संबंधीचा शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबर पासून राज्यातील होमगार्डला ही वाढ देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहे. यामध्ये विविध समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात येत आहे. मदरसामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या मानधानात देखील वाढ करण्यात आली आहे. यावरुन उद्धव ठाकरे गटाने भाजपवर निशाणा साधला आहे. त्यातच आता राज्यातील होमगार्डांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील…

