Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात बदलापुरात अत्याचाराच्या घटनेने राज्य हादरले होते त्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. सांगण्यात येत आहे की, अक्षय याने पोलिसांची रिल्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांवरच गोळीबार केला. याचदरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याला गोळी देखील लागली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षयला गोळी लागली, आणि त्याचा मृत्यू झाला… असा दावा देखील केला जात आहे. अक्षय शिंदे हा बदलापूर येथील शाळेत सफाई कर्मचारी होता. अक्षय याच्यावर शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले. तेव्हा पासून अक्षय शिंदे हा पोलिसांच्या ताब्यात होता. पण सोमवारी अक्षय याला कारागृहातून रिमांडसाठी पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना जवळपास संध्याकाळी 6 च्या…

Read More

मेष राशी राजकारणाशी संबंधित लोकांना अतिरिक्त जनसमर्थन मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मैत्री वाढेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. एखाद्या शुभ उत्सवाला जावे लागेल. लग्नाचा विचार तयार होईल. पाहुण्यांच्या आगमनाने प्रसन्न वातावरण निर्माण होईल. मेहनतीमुळे नवीन रूपरेषा तयार होईल. फुकटचा वाद घालणं टाळा. वृषभ राशी दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. नवीन उद्योगांबाबत अधिक व्यस्तता राहील. सत्तेत असलेल्या व्यक्तीशी जवळीक निर्माण होईल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. काही जुन्या कोर्ट केसेसमधून दिलासा मिळेल. सामाजिक कार्यात तुमची आवड, समर्पण आणि प्रामाणिकपणाने लोकांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशी शेअर लॉटरी इत्यादींमधून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था दसरा- दिवाळीच्या तोंडावर शहरातील खाद्य तेल बाजारात पुन्हा तेजी निर्माण झाली आहेत. केंद्र सरकारने कच्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सोयाबीन, सूर्यफूल, पाम तेलाचे भाव लिटरमागे २१ रुपयांनी वधारल्याचे खाद्यतेल विक्रेत्यांनी सांगितले. करडी, शेंगदाणा आणि सरकी तेलही प्रतिलिटर दहा रुपयांनी महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणीसह हॉटेलचालकांना मोठा दिलासा मिळाला होता, जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे तेल बाजारात तेजी येते. सध्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज सर्वत्र धनगर समाजाचे आंदोलन सुरु झाले असून या आंदोलन दरम्यान भाजपचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कि, धनगर समाजाने शेळ्यामेंढ्या राखणे बंद केले तर महाराष्ट्रातील लोकांवर कुत्र्याचे मटण खाण्याची वेळ येईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीतून (एसटी) आरक्षणाची मागणी केली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात या समाजाने सोममवारी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बोलताना पडळकर यांनी उपरोक्त विधान केले. पडळकर म्हणाले, धनगर समाज 8-10 महिने शेळ्या-मेंढ्या घेऊन घराबाहेर राहतो. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या दर्जाचे मांस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरु असून आज सोमवारी त्यांच्या उपोषणाला सातवा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावली असतांना नुकतेच स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या आंदोलनाच्या 7 व्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या प्रकृतीस काही अपाय झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळके ता.जळगाव येथे जिल्हा दुध संघाचे सदस्य रमेश जगन्नाथ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी विठ्ठलमंदीरात जळगाव येथील तारांगण हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल पाटील यांच्या मार्फत जळके तसेच परिसरातील गावांतील लहान बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी एकुण १८३ बालकांची नोंद करून बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना गोळ्या -औषधे देण्यात आली , याठिकाणी तीन बालकांना त्वचेसंबधी समस्या असल्याचे आढळले त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. या तपासणी शिबिराला डॉ.राहुल पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी अमोल पाटील, गोपाल दांडगे व औषध विभागासाठी राहुल महाजन,सागर पाटील यांचा सहभाग होता तर त्यांना गावातील डॉ.प्रकाश परदेशी, डॉ.दिपक…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आत्महत्या केल्याची घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात वरिष्ठ सहायक तथा प्रभारी अधीक्षक म्हणून कार्यरत एका ५४ वर्षीय व्यक्तीने शहरालगत असलेल्या छत्री तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. याच वेळी त्यांच्या ८० वर्षीय आईनेही आत्महत्या केली असावी. कारण दोघांचेही मृतदेह रविवार, २२ सप्टेंबरला छत्री तलावातून काढण्यात आले. त्यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज राजापेठ पोलिसांनी वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मनोहरराव लोणारकर (५४) आणि लक्ष्मीबाई मनोहरराव लोणारकर (८०, दोघेही रा. महारुद्र अपार्टमेंट, दस्तूरनगर, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मण हे विद्यापीठातील गोपनीय विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पत्नी मुलांसह माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना कैलास इंदल राठोड (३४, रा. सुप्रीम कॉलनी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे कैलास राठोड हे पत्नी, आई, मुलगी व दोन मुलांसह सुप्रीम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना ते घरी एकटेच होते. त्यावेळी रविवारी सकाळी कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरवाजा अर्धा उघडा असल्याने शेजारच्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी जवळच राहणाऱ्या तरुणाच्या काकांच्या घरी माहिती दिली. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उमर फारुख कलीम अहमद (२०, गाँसे आझम नगर मालेगाव, जि. नाशिक) व मोहम्मद शोएब मोहम्मद इलियास (२३, गौसे आझम नगर) अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुबशीर खान मेहमूद खान यांचे किराणा दुकान असून ते घाटरोड, छाजेड ऑईल मिल परिसर चाळीसगाव येथे राहतात. त्यांच्या मालकीची दुचाकी १३ रोजी रात्री ११ ते दि. १४ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरुन चोरट्याने चोरून नेल्या. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन केले. अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या…

Read More

यावल : प्रतिनिधी शहरातील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या महिलेस अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातीत साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या मागे गाडगेनगर वस्तीत राहणाऱ्या निर्मलाबाई शंकर वडर (५६) या २२ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आपल्या घरात असताना त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना नरेंद्र शिंदे व नातेवाईकांनी तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच बिघडली. येथून जळगाव येथे नेताना रस्त्यातच त्यांचा मूत्यू झाला. या घटनेची खबर मयत महिलेचा मुलगा रवींद्र वडर (३०) यांनी यावल पोलिस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास…

Read More