अमळनेर : प्रतिनिधी धारदार शस्त्राने एका ३५ वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची घटना अमळनेरातील गांधलीपुरा भागात मेहतर कॉलनीजवळ रविवारी उघडकीस आली. शीतल जय घोगले (३५) असे या मृत महिलेचे नाव आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या खून प्रकरणात शीतल हिची नणंद मंगला परशुराम घोगले व करण मोहन गटायडे (३५) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पारोबाई परशुराम घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल घोगले या सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाहेर गेल्या होत्या. मंगला ही १० ते १५ मिनिटांत परत आली; तर शीतल बराचवेळ होऊनही परत आली नव्हती. कुटुंबीयांनी शोध घेतला…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी ग्रामीण भागातील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास करायची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. ग्रामसेवक हा विकासाचा केंद्रबिंदू असून गावातील ग्रामस्थांच्या सर्वाधिक विश्वासाचा माणूस म्हणून ग्रामसेवकाची ओळख असल्याने गावच्या विकासाचा खरा हिरो हा ग्रामसेवक असतो असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, जिल्हा ग्रामीण…
मेष राशी आजच्या दिवशी एखादं नवीन काम हाती घ्याल. तुम्हाला एखादा दूरचा प्रवास करावा लागेल. घरात पूजाअर्चा आयोजित कराल. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कुणाकडूनही पैसा उदार घेऊ नका. कारण या व्यवहारात तुम्ही फसण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून काही वाद असतील तर वडिलांशी चर्चा करूनच निर्णय घ्या. कुणालाही विचार करूनच आश्वासन द्या. कारण ते पूर्ण करण्यात समस्या निर्माण होईल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास राहणार आहे. तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादी नवीन योजना आखाल. तुमच्या आजूबाजूला वाद, झगडा झाला तर तुम्ही शांत राहा. तुमच्या आईच्या तब्येतीत चढउतार होईल. असं झाल्यास आईच्या टेस्ट करून घ्या. पैशाच्या खर्चावरून तुम्हाला काही दिवस…
जळगाव : प्रतिनिधी येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला. कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले. शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती. प्रसंगी भाजपाच्या महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता विक्रम भाई, जयेश भावसार, स्मिता वैद उपस्थित होतें. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवाना भांडी वाटप करण्यात आली. सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरदार सुरु केली असून नुकतेच बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती-मविआकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत तक्रवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. गेली अनेक दिवस सुप्रिया सुळे यांचे…
जळगाव : प्रतिनिधी तुम्ही दोन्ही बाप लेक जास्त मातले आहे, असे म्हणत प्रौढाच्या अंगावर रिक्षा घेवून जात त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच शहरात कुठेही दिसले तर तुम्हाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना दि. २० रोजी कोंबडी बाजार परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात दगडू सिताराम पाटील हे प्रौढ वास्तव्यास असून ते हमाली काम करतात. ते दि २० सप्टेंबर रोजी काम शोधण्यासाठी दाणाबाजारात गेले होते. सायंकाळपर्यंत त्यांना काम न मिळाल्याने ते कोंबडी बाजार परिसरात उभे होते. त्यावेळी सागर रमेश बेहरे हा त्याची (एमएच १९, व्ही ८८०५) क्रमांकाची…
जळगाव : प्रतिनिधी पती कामावर व पत्नी त्यांच्या मामाकडे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख १५ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरातील वनविकास कॉलनीतील रहिवासी तुषार राजूभाई कसुरे (वय ३३) हे वास्तव्यास आहे. दि. २० रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी मामाकडे श्राद्धच्या कार्यक्रमासाठी गेल्या. त्यांचे घर बंद असल्याची संधी…
जळगाव : प्रतिनिधी बारमध्ये दगडफेक करीत गल्ल्यातून पाच लाख ७० हजार रुपये लुटून नेल्याप्रकरणी रोकड घेवून पसार झालेल्या सचिन अभयसिंह चव्हाण (२६, रा. शंकर आप्पानगर, पिंप्राळा) व अक्षय नारायण राठोड (२२, रा. यश नगर, पिंप्राळा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून ताब्यात घेतले. या संदर्भात शनिवारी (२१) सप्टेंबर) संध्याकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महामार्गावर एन. एन. वाईन अॅण्ड बार या ठिकाणी रविवारी रात्री सचिन चव्हाण, राकेश जाधव, भोला उर्फ सुगर भोई, अक्षय उर्फ गंप्या राठोड यांनी पाच बियरची मागणी केली. मॅनेजरने पैशांची मागणी केली असता दगडफेक करीत गल्ल्यातून पाच…
जळगाव : प्रतिनिधी घरी कोणीही नसताना रजित कमलाकर सोनवणे (४९, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी घरात कोणीही नसताना सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रवीण जगदाळे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा, ता. जळगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर शुक्रवार दि. २० रोजी १५२ गोण्या उतरवत असताना छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाचे गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने तपासणी सुरु केली आहे. त्यानुसार शुक्रवारी जळगाव जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नांद्रा, ता. जळगाव येथे…

