भुसावळ : प्रतिनिधी पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब पत्रकार असलेल्या पतीने विचारल्यानंतर त्याच्यासह चौघांनी मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री महेश नगरात घडली. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महेश नगर परिसरात पत्रकार विकास चव्हाण यांची पत्नी व संशयित गिरीश पाटील यांची पत्नी सोबत जेवायला गेल्या होत्या. त्यावर गिरीशने जुना वाद उकरून काढला. वादानंतर विकास यांनी पोलिस ठाणे गाठले. मात्र तक्रार न देताच ते परत गेले. त्यावेळी गिरीशसह अन्य तिघांनी विकास चव्हाण, त्यांचे शालक विजय मिस्तरी व त्यांच्यासोबतचे हेमंत लोहार यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहे. त्यांचा शोध सुरु आहे.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हर्षल सुधाकर सोनवणे (१७, रा. दादावाडी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२१ ऑक्टोबर) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळचा भुसावळ येथील रहिवासी असलेला हर्षल सोनवणे हा तरुण दादावाडी परिसरात मामांकडे वास्तव्यास होता. त्याची आई शिक्षिका असून वडील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. हर्षल हा शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सोमवारी हर्षल हा घरी एकटाच असताना त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गळफास घेतला.
मेष राशी न्यायालयीन प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. बांधकामात येणारे अडथळे दूर होतील. मंगल उत्सवाला जावे लागेल. वेळेचे स्वरूप लक्षात घेऊन काम करा. कामाच्या ठिकाणी संयमाने काम करा. प्रगती होईल. आज मित्र आणि कुटुंबियांच्या सल्लामसलतीने घरगुती प्रश्न सोडवले जातील. अनावश्यक प्रेम टाळा. वृषभ राशी आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. अति भावनेने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. लोक तुमच्या असहायतेचा फायदा घेऊ शकतात. छोट्या प्रवासाचे योग येतील. व्यस्तता वाढेल. कामाच्या ठिकाणी सुधारणा करून तुम्ही यशस्वी व्हाल. स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. इतरांवर अवलंबून राहू नका. मिथुन राशी आज व्यवसायात काही शुभ घटना घडू शकतात. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. अन्यथा…
चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या महिन्याभरापासून आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत महाविकास आघाडीच्या हजारो पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. आज चाळीसगाव तालुक्यात बोलबच्चन नेतृत्व असणाऱ्या उबाठा सेनेला मोठे खिंडार पाडण्यात यश मिळाले असून उबाठा सेनेचे व्हीजेएनटी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष संजय राठोड व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी भाजपाचा रुमाल गळ्यात टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती राजुभाऊ राठोड, पंचायत समिती माजी सभापती विजय भाऊ जाधव, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गोरख राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संजय…
धरणगाव : प्रतिनिधी जळगांव ग्रामीण मतदार संघात दि.२० रोजी हजारो शिवसैनिक व नागरिकांनी पाळधी येथे मतदार संघातील विविध विकास कामाने प्रभावित होऊन व विकासपुरुष मा ना गुलाबराव पाटील साहेब यांच्या वर विश्वास ठेवत आज शिरसोली,ममुराबद, भोने,अहिरे बिलवाडी,लमांजन, गारखेडा,चावळखेडा,सुभाषवाडी कुऱ्हाळदा,भागपूर ,लोणवाडी येथील नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश करीत ना.गुलाबराव पाटील यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प केला. तसेच पालधी येथील संपूर्ण मुस्लिम पंच कमिटी यांनी विधानसभेत संपुर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले यावेळेस मा सभापती कैलास चौधरी,मुकुंदराव नंनवरे संजय पाटील सर ,तालुका प्रमुख डी ओ पाटील,दीपक भदाणे जी प सदस्य गोपाळ बापू पाटील शाम कोगटा, मनोज चौधरी,रोहित कोगटा ,महानगर प्रमुख संतोष पाटील…
अमळनेर : प्रतिनिधी घरातील पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी वाजण्याच्या ७ सुमारास पटवारी कॉलनीतील ओम शांती केंद्राजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री सुनील चौधरी (४३) मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्या घरातील पाण्याची टाकी भरली की नाही, हे पाहण्यासाठी गेल्या असता, त्यांचा पाय घसरून त्या टाकीच्या पाण्यात बुडाल्या. बराच वेळ होऊनही पत्नी अजून घरात का आली नाही, म्हणून त्यांचे पती सुनील चौधरी व त्यांची कन्या शोध घेत असताना, त्यांना जयश्री टाकीत बुडालेल्या दिसल्या. त्यांनी लागलीच त्यांना बाहेर काढून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून जयश्री यांना मृत घोषित केले.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूरपेठ अंतर्गत असलेल्या ख्वाजा नगरातील पादचाऱ्याला सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे. दौलत लोढू कुंभार (५८) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौलत कुंभार हे सकाळी बाहेर गेले होते त्यांना येण्यास उशीर झाला परिवाराने त्यांचा तपास घेतला. यादरम्यान जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. अज्ञात वाहनाने धडक देऊन घटनास्थळावरून फरार झाल्याचे दिसून आले. दौलत कुंभार यांचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. दौलत कुंभार हे मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते. पश्चात…
जळगाव : प्रतिनिधी किराणा साहित्य घेऊन घरी परतत असलेल्या ललिता प्रकाश सोनवणे (४७, रा. तांबापुरा परिसर) यांना भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे या महिलेच्या दोन्ही पायांचा चुराडा होऊन ते निकामी झाले आहेत. या महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. हा अपघात रविवारी (दि. २०) दुपारी इच्छादेवी चौकात झाला. चालक व ट्रक एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती अपंग व सासू आजारी असल्याने या दोघांचा आधार असलेल्या ललिता सोनवणे या एका सुपर शॉपमध्ये कामाला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. रविवारी ललिता या किराणा साहित्य घेऊन घरी परतत असताना आकाशवाणी चौकाकडून अजिंठा चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने इच्छादेवी चौकातील…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या सात वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग सुरक्षा पथक केंद्रातर्फे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ म्हणून कारवाई केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी गावातच साजरी व्हावी याकरिता अनेक जण सुट्टया टाकून आपल्या गावी येतात. यामुळे महामार्गावर खाजगी वाहनाची वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहनचालक मद्यपान करून गाड्या चालवितात. यातून अपघात घडतात, अपघातावर नियंत्रण करतायावे याकरिता महामार्ग सुरक्षा पथक केंद्रातर्फे महामार्गावर ठिकठिकाणी तसेच साकेगाव व नशिराबाद जवळील टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहन चालक…
मेष राशी महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. विरोधकांना प्रगतीचा हेवा वाटेल. सामाजिक आदर आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात उच्च प्रस्थापित लोकांशी संपर्क साधला जाईल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये समन्वय निर्माण करावा लागेल. शेतीच्या कामात आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये गुंतलेल्या लोकांना काही मोठे यश मिळू शकते. वृषभ राशी आज उगाच धावपळ होईल. तुम्हाला काही अप्रिय बातम्या मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्ही नाराज राहाल. व्यवसायात कष्ट करून अपेक्षित यश न मिळाल्याने मन थोडे उदास राहील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कुटुंबात विनाकारण वाद होऊ शकतात. मिथुन राशी नोकरीत आज बढतीची चिन्हे आहेत. परदेश सेवेशी संबंधित…

