मेष राशी आनंदाचा, लाभाचा आणि प्रगतीचा दिवस असेल. चालू असलेल्या कामात अडचण येऊ शकते. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे भान ठेवावे लागेल. राग टाळा. सर्वांशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवा. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. वृषभ राशी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सामान्य चढ-उतार होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. नोकरदारांना लाभ आणि प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात उत्पन्नाच्या नवीन स्रोतांचा फायदा होण्याची शक्यता आहे. मिथुन राशी तुम्हाला आळस आणि सुस्ती टाळावी लागेल. तुम्हाला तुमच्या कामावर चपळतेने आणि उर्जेने पूर्ण लक्ष केंद्रित करावे…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे उद्घाटन आज स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भोणे गावातील जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल रूम व भोजन कक्षाचे आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गावून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांचा मुख्याध्यापक दिलीप कुंभार उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी सत्कार केला. यावेळी तालुक्यातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले दिलीप कुंभार यांचा सत्कार गुलाबराव पाटील यांनी केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डी. ओ. पाटील, मोती अप्पा पाटील, रोटवदचे…
जळगाव : प्रतिनिधी येथील ए.टी. झांबरे विद्यालयात डॉ. होमी भाभा संस्था मुंबईतर्फे आंतरविद्यालय विज्ञान प्रतिकृती स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले. डॉ. होमी भाभा संस्था, मुंबई यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये जळगाव शहरातील विद्यालयांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अतिशय सुंदर अशा विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या. यावेळेला आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. केसीई सोसायटीचे सहसचिव ऍड. प्रवीणचंद्र सोनार, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, सुनील कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. अस्मा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर आ. राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी बूथ प्रमुख व शिवदूत हे शिवसेनेचे खरे शिलेदार असून कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात मी आणि माझा परिवार आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. संपर्क कधीही कमी पडू दिला नाही. आता तुमची साथ हवी आहे. सर्वसामन्य कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी श्रीमंती असून शिवसेनेचे कार्यकर्ते हे थकणारे , विकणारे व झुकणारे नसून लढणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले. धरणगाव तालुका शिवसेनेचा बूथ प्रमुख, शिवदूत आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पाळधी येथिल सुगोकी लॉन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेणार आहे. या बैठकीमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असून, त्याला या बैठकीनंतर हिरवा कंदील मिळेल असा दावा केला जात आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील महिन्यात केव्हाही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागलेत. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक येत्या 27 व 28…
अकोला : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पक्षाने रावेर विधानसभा मतदारसंघात शमिभा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शमिभा या ट्रान्सजेंडर असून, लेवा पाटील आहेत. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यांच्यात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीने शनिवारी एका ट्विटद्वारे आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत वंचितने उमेदवाराच्या नावासह त्याच्या जातीचाही उल्लेख केला…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या निवडणूक चिन्हा बाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय सुरू आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या, नसता विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या संदर्भात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी शरद पवार गट करत आहे. मात्र, तत्पूर्वी…
चाळीसगाव : प्रतिनिधी वन अधिकारी असल्याचे सांगत वन रक्षक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील चौधरीवाडा भागातील निखिल सुरेश पगारे (३०) या तरुणाची रुग्णवाहिका चालक नामदेव वाघ याच्याशी ओळख झाली. वाघ याने नितीन पगारे हा वन विभागात आरएफओ असल्याचे सांगत वन विभागात वन रक्षक म्हणून नोकरी लावून देण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली. उद्यापर्यंत दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले त्याप्रमाणे सुरेश पगारे यांनी या दोघांना दि.१७ सप्टेंबर रोजी १ लाख रुपये दिले. निखिल पगारे याने हा प्रकार पोलिस…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा पोलिसांनी लासूर -हातेड रस्त्यावर दोन जणांकडून सात गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतूस जप्त केले आहे. या दोघांना पोलिसांनी दि. २० रोजी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, उमर्टी (मध्य प्रदेश) कडून दुचाकीवर येणाऱ्या मनोज राजेंद्र खांडेलकर (२४) रा.जुळेवाडी कराड ( सातारा), सागर सरणम रनसौरे (२४) रा.धायरी पुणे यांची चौकशी केली. त्यांच्या जवळ सात गावठी बनावटीचे कट्टे. दहा जिवंत काडतूस मिळून आले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राकेश पाटील, रावसाहेब पाटील, शशी पारधी, चेतन महाजन यांनी दि. २० रोजी दुपारी १२: ३० वाजे दरम्यान हातेड – लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ सापळा लावून ही कारवाई केली. दोन्ही…
जळगाव : प्रतिनिधी उसनवार दिलेले दोन लाख रुपये लवकर परत कर, असे बोलल्याच्या कारणावरून दिनेश मांगीलाल ओझा (२५, रा. प्रजापत नगर) यांना तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री प्रजापत नगरात घडली. याप्रकरणी गुरुवारी (१९ सप्टेंबर) तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केटरिंग व्यावसायिक दिनेश ओझा यांनी उस्मानिया पार्कमधील एकाला उसनवारीने दोन लाख रुपये दिले आहे. बुधवारी ओझा यांनी लाख रुपये मला लवकर परत कर, असे सांगितले. त्यावरून तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी दिनेश ओझा यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध…

