Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशी कल्पना पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच अंमलात आणली गेली आहे. अजित पवार यांच्या एनसीपीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये राज्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. कालही महायुतीच्या वतीने जाहीरनामा प्रतिद्ध करण्यात आला होता. त्या व्यतिरीक्त पक्षाच्या वतीने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवार यांनी बारामतीसाठी आपला स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मोठ्या घोषणा लाडकी बहीण  योजना 1500 रुपयांवरून 2100 रुपये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव शहर मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसर या भागात सकाळी जोरदार प्रचार केला. प्रचारामध्ये अनेक नागरिक स्वतःहून सहभागी झाले होते. अनेक लाडके बहिणींनी आ. भोळे यांना ओवाळून विजयासाठी सदिच्छा दिल्या. आ. राजूमामा भोळे यांना प्रचारामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता मिळत आहे. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी आमदार राजूमामा भोळे यांनी हरिओम नगर परिसरातून साईबाबा मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यानंतर माजी नगरसेविका कांचनताई सोनवणे यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. स्वामीनारायण मंदिर, वाणी मंगल कार्यालयमार्गे डॉ. व्ही. आर. तावडे यांच्या घरी आ. भोळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या 37 विधानसभा मतदारसंघातून 40 जणांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांचा सहभाग आहे. यांनी आपल्या पक्षाची असणारी पक्ष शिस्त न पाळल्याबद्दल आणि पक्षातून हकालपट्टी केली आहे. असे परिपत्रक महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी काढले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना नेत्यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या हाकालपट्टीमध्ये सावंतवाडीतून विशाल परब, श्रीगोंदामध्ये सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधून सुनील बंडगर, अमरावतीतून जगदीश गुप्ता, साकोली मतदारसंघातून सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील वार्ड क्रमांक 03 गौतम नगर येथील असंख्य भीमसैनिकांचा शिवसेना शिंदे गटात ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश झाला असून अनिल आनंदा सोनवणे यांनी हा प्रवेश सोहळा पार पाडण्यात महत्वाचे योगदान केले. या वेळी प्रवेश करणाऱ्या मध्ये रवींद्र मोरे ,अनिल सोनवणे, विजय गायकवाड, महेंद्र मोरे, रुपेश सोनवणे, अजय मोरे, रोहित सोनवणे, अजय सोनवणे, सुनील साळुंखे, स्वप्नील सोनवणे, संजू गायकवाड, ऋषिकेश मोरे, राहुल खैरनार, विशाल सोनवणे, सुनील सोनवणे ,राजू सोनवणे , सुरेश सोनवणे, यशवन्त गजरे, दीपक गजरे, राहुल पवार ,अभिजित सोनवणे,अनिल साळुंखे, सागर सोनवणे, किरण सोनवणे, सागर सोनवणे, रोहित सोनवणे, खुशाल सोनवणे, दीपक सोनवणे, समाधान गजरे, गुलाब…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काकूसोबत अंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या दीपीका चंपालाल बरडे (बारेला) (वय १०, मूळ रा. मध्यप्रदेश, ह. मु. बाभूळगाव, ता. धरणगाव) या तरुणीचा पाय घसरुन ती नदीपात्रात बुडाली होती. मंगळवारी रामेश्वर येथे त्या तरुणीचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील चंपालाल बरडे हे मजूरी कामासाठी धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे. त्यांच्या शेजारी त्यांची वहिणी अवणी बारेला राहतात. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चंपालाल यांची मुलगी दिपीका बरडे ही काकूसह त्यांची मुलगी सिंधू व शेजारील मुलगी रिधू बारेला यांच्यासोबत नदीवर अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी केली जात आहे. या नाकाबंदीमध्ये तहसील कार्यालयाच्या परिसरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन वाहनांमधून २ लाख २३ हजारांची रोकड तर बहीणाबाई चौकात ८५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेची आचारसंहीत लागू झाल्यानंतर पोलिस दल अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातंर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळकी सकाळच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड, राजू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालय परिसरातून जात असलेल्या सफेद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फटाक्यांमुळे घराला आग लागून मुलांचे शाळेचे प्रमाणपत्र, ५५ हजार रुपये रोख, मोबाइलसह अन्य वस्तू जळून खाक झाल्याची घटना शनी पेठेतील चंदनवाडीत ३१ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहा वाजता घडली. पाच दिवसानंतर शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनी पेठेतील रामदेव मंदिराच्या मागे चंदनवाडीत पुनमसिंग सुरेशसिंग राजपूत (वय ४५) हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त गल्लीत फटाके फोडले जात असताना त्यामुळे घराला आग लागली. यात फायबरचे कुलर, लोखंडी कपाट, मोबाइल, ५५ हजार रुपये रोख, सात ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके यासह मुलगा जयसिंग याचे इयत्ता पहिली ते ११ वी पर्यंतचे शाळेचे सर्व प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील पाच रायफल चोरीच्या घटनेतील तिघांना भुसावळ न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लीलाधर ऊर्फ नीलेश बळीराम थाटे यांच्यासह निखिल कडू थाटे आणि तुषार विश्वनाथ पाटील अशी तिघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव आयुध निर्माणीमध्ये तयार होणाऱ्या काडतूसांच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन एके-४७ व दोन ५.५६ अशा पाच रायफलींची दि. २१ रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी दोन एके ४७ रायफल आणि एक अन्य रायफलबेवारस अवस्थेत जाडगाव रेल्वे रुळावर आढळून आल्या होत्या. दरम्यान संशयित आरोपी लीलाधार थाटे यास ४ नोव्हेंबर रोजी एटीएस पथकाने उर्वरित दोन रायफलसह…

Read More

मेष : आजचा दिवस आव्‍हानात्‍मक असेल; पण तुम्‍ही आपल्या योग्यतेने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असाल. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी काही चर्चा कराल. आर्थिक बाबतीत कोणाशी सौम्य मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामे मंद असू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रकृतीची काळजी घ्‍या. वृषभ : आज काळ थोडा अनुकूल राहील. तुम्ही तुमच्या विशेष कौशल्यांच्‍या जोरावर यश मिळवाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेतील, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक अडचणी येतील. कुटुंबातील सदस्‍यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. प्रकृतीच्‍या तक्रारी जाणवतील. मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक होऊन तुमची कामे पूर्ण केल्‍यास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या 60 जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला. गुलाबराव…

Read More