Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेरडे येथील विनोद इंदल पवार (३६) याने राहत्या घरात गळफास घेतल्याचा प्रकार १० रोजी उघडकीस आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विनोद पवार यांनी आत्महत्या का केली, त्यामागचे कारण समजू शकले नाही. दुसऱ्या घटनेत टाकळी प्र. दे. येथे शरद बिमा गायकवाड (३०) या तरुणाने घराच्या मागील खोलीतल्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना १० रोजी घडली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निघृण खून केल्याची घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी, रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुवर्णा नवाल पतीसह रणछोड नगरात राहत होत्या. त्यांचे पती हे दाणा बाजारात धान्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजेपूर्वी सुवर्णा नवाल घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. रात्री ८.३० वाजता त्यांचे पती घरी आल्यानंतर हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसीतील पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला पुण्यातील सीबीआय पथकाने मंगळवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रमण वामन पवार (वय-५८, रा. बळीराम पेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शनिपेठ भागातील सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या कामगार पुरवठा करणाऱ्या फर्मचे लेखापरीक्षण करण्याबाबत पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावली होती. लेखापरीक्षण अहवाल देण्याबाबत लाचेची मागणी करण्यात आली होती.

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रासमोरील रस्त्यावर भरधाव कारने जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांतीलाल ऊर्फ कान्हा रमेश राठोड (वय २४) आणि रवींद्र किसन चव्हाण (वय ३०, दोन्ही रा. विटनेर तांडा, ता. जळगाव) अशी मयतांची नावे आहेत. कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे. गुरुवारी सायंकाळी दोघे जण दुचाकीने (एमएच १९ ईएल ३११) शिरसोलीकडून जळगावकडे…

Read More

फैजपूर : प्रतिनिधी मागील भांडणावरून दगडफेक आणि हाणामारी होऊन त्यात १४ जण जखमी झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही चाकूहल्ला झाला. यात सहा जणांना अटक आणि ५०-६० जणांवर दंगलीसह दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना बामणोद, ता. यावल येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हेकॉ. विकास सोनवणे असे या जखमी पोलिसाचे नाव आहे. बामणोद गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. दगडफेक आणि हाणामारी होत असल्याची माहिती मिळताच पोलिस विकास सोनवणे हे घटनास्थळी पोहचले. जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली तर एकाने त्यांच्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वार चुकवला…

Read More

गृहिणींना आजचा दिवस त्रासाचा जाणार ! आजचे राशीभविष्य दि ११ ऑक्टोबर २०२४ मेष राशी आजचा तुमचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुमचे चांगले विचार सोसायटीत नवीन ओळख निर्माण करून देण्यात उपयोगी ठरतील. आज तुम्ही घरात डेकोरेशनचं काम करू शकता. कंत्राटदारांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभाचा आहे. वातावरणातील बदलामुळे तुमच्यातील अस्वस्थपणा वाढेल. भरपूर पाणी प्या. आज तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये बदल करा. एखादं काम करण्याची नवी पद्धत शोधल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. वृषभ राशी आजचा दिवस उत्तम राहणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही त्रस्त असाल. कुटुंबासोबत बाहेर सिनेमा पाहायला जाण्याची शक्यता आहे. मित्रांच्या बर्थडे पार्टीला जाऊ शकता. इतर मित्रांसोबत एन्जॉय करण्याची संधी मिळेल. नवीन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला आहे. याप्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश उर्फ मंगलदास अंबादास कोळी वय-४० रा. हरीविठ्ठल नगर जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरीविठ्ठल नगर परिसरातील एका भागात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास महिला ही आपल्या मुलांसह झोपलेली असताना संशयित आरोपी मंगेश उर्फ मंगलदास कोळी हा महिलेच्या घरात घुसला. त्यानंतर महिलेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. तसेच घरातून जात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असतांना राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विक्रमी 80 निर्णय घेतलेत. यात सरकारने नॉन क्रिमिलेयरची मर्यादा 8 लाखांवरून 15 लाख केली असून, लेवा पाटील समाज महामंडळ, संत गोरोबा कुंभार महामंडळ व कोळी समाज महामंडळाचा प्रस्तावही हातावेगळा केला आहे. विशेषतः पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठीही सरकारने 2 स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने विविध घटकांशी संबंधित 80 निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून नुकताच दोन दिवसावर दसरा मेळावा येवून ठेपला आहे यंदा दसरा मेळावा अनेक ठिकाणी होत असल्याने राज्यात मोठी चर्चा सुरु झाली असून नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, महाविकास आघाडीची सत्ता आली तर ते तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देतील, असे त्यांच्याकडून लिहून घ्या. असा आव्हान महायुतीमधील नेते देत होते. महायुती सरकारने नुकताच 15 जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस केली. त्यामध्ये मराठा समाजा नसल्याने मनोज जरांगेंनी यांनी संताप व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, येवल्याचा डुप्लिकेट नेता आता कुठे गेला? आता ओबीसी नेते कुठे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे उद्योगपती रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव आज दि.१० राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला. ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज (दि.१०) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या…

Read More