मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले असून उद्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. काल आम्ही प्रत्येक मतदारसंघ निहाय आढावा घेतला. त्यानुसार आम्ही किमान 160 जागा जिंकत असल्याचे लक्षात आले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘सर्व्हेची ऐसी की तैसी’ असे म्हणत संजय राऊत यांनी एक्झिट पोल मधील केलेले सर्व दावे फेटाळले आहेत. ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येत असतात. आमच्या सोबत समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, डाव्या विचारसरणीचे पक्ष आहेत. काही अपक्ष…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी चोपडा रस्त्यावरील एका दुकानात गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याचे समजताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री पवन देसले यांनी आपल्या पथकासह कार्यवाही केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक श्री पवन देसले, पोकाँ/1912 सुमीत बावीस्कर, पोकाँ/372/ चंदन पाटील, पोहेकाँ/1995 समाधान भागवत असे सरकारी वाहन नं MH19CZ8561 ने विधानसभा निवडणुक 2024 चे अनुशंगाने दिनांक १९ नोव्हेबर रोजी पेट्रोलींग करत असतांना, आम्ही धरणगाव शहरातुन चोपडा रोडने जात असतांना आम्हास चोपड़ा रोडवरील यश कोल्डीक्स दुकानात काऊंटरवर गर्दी दिसली. तेव्हा आम्ही गाडी थांबवुन पोलीस निरीक्षस सो यांचेसोबत आम्ही सर्व स्टाफने तेथे चेक केले असता आम्हास काऊंटरजवळ एक 35 लीटरचा काळ्या रंगाचा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापुर्वीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे. उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा युतीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आम्ही त्यांच्या सोबत जाणे पसंत करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. त्यातच सर्वच मीडिया माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती असो किंवा महाआघाडी सत्तेसाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील राजमालती नगरातील बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान, मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात राहणाऱ्या राजू पटेल यांच्या कुलूप बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. घरातून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग आओक्यात आणली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आग…
जळगाव : प्रतिनिधी राजमालती नगरातील सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६) या तरुणाचा खून झाल्यानंतर तब्बल २७ तासांनी गुरुवारी त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाले. या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या दिवशीही तणाव होता. पोलिस व आमदार सुरेश भोळे यांनी समजूत घातल्यानंतर दुपारी दीड वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत सिद्धार्थ माणिक वानखेडे याचा बुधवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी नातेवाइकांनी शवविच्छेदन कक्षात मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला.…
यावल : प्रतिनिधी येथील फॉरेस्ट नाक्याजवळ पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या गैरसमजातून ठेकेदाराच्या चारचाकी वाहनाच्या तोडफोड प्रकरणात शेखर पाटील हे मारेकऱ्यांचे लक्ष असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त असे की, सावखेडा सिम तालुका यावल येथील कमलाकर तुळशीराम पाटील हे आपल्या चारचाकी वाहनाने घरी जात असतांना फॉरेस्ट नाक्याजवळ अचानक पाच ते सहा गुंडांनी ते एका राजकीय पक्षाचे शेखर पाटील असल्याचे समजून हल्ला करून कमलाकर पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण करीत त्यांच्या चारचाकी वाहनाची लोखंडी रॉडने तोडफोड केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये एकाने ही व्यक्ती शेखर पाटील नाही, असे म्हटल्यावर पाटील यांना सोडून ते मारहाण करणारे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक हल्ल्याच्या आणि बिबटे जाळ्यात अडकल्याच्या घटना घडत असतानाही पुन्हा बिबट्याचे दर्शन होत आहे. तालुक्यातील तांबोळे शिवारात कापूस वेचणी सुरू असतानाच बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बचावासाठी धाव घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळे येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात काही महिला कापूस वेचणी करीत होत्या. शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी हे देखील होते. १८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (१८) ही भावासह विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असता असता त्याचवेळी तिला बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या शिरसोली मतदान केंद्रावर चित्रीकरण (व्हिडीओ शूटिंग) केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील मतदान केंद्र क्र. ३०९ येथे व्हिडीओ शूटिंग करणे देवेंद्र विष्णू पाटील (वय २४, रा. शिरसोली प्र.बो.) या तरुणाला महागात पडले आहे. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी पोलिसांकडे लेखी अहवाल सादर केला असून त्यानुसार हवालदार अभिजित सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून राजकीय अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल वाघ करीत आहेत
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ते १० फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. यावेळी राज्य मंडळाच्या…
मेष राशी सामाजिक कार्यात संयमाने वागा. विरोधी पक्ष तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत विशेष काळजी घ्यावी. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याकडे कल कमी राहील. तुमची आर्थिक स्थिती चिंताजनक राहील. व्यवसायात वेळेवर काम करा. आर्थिक बाबतीत सामान्य सुधारणा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही मजबूत कामात अचानक अडथळे येऊ शकतात. नोकरी सोडू शकता. कामाच्या ठिकाणी खूप धावपळ केल्याने तुम्हाला थकवा येईल. व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. राजकारणात खोटे आरोप करून पदावरून दूर केले जाऊ शकते. एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. मिथुन राशी अध्यात्मिक कार्यात रुची राहील. व्यवसायात…

