अमळनेर : प्रतिनिधी प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे २४ रोजी रात्री १० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, विजय ऊर्फ भाया साहेबराव पारधी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गावातीलच अजय पारधी हा विजयची मावस बहीण सुनीता, पती राजेंद्र आणि मुलगा भटू यांना शिवीगाळ करत होता. भटुवर प्रेमसंबंधांचे आरोप करत मारण्याची धमकी देत होता. त्याचवेळी सुवालाल पारधी, भास्कर पारधी यांनी अजय याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवीगाळ सुवालाल, विजय आणि भारस्कर पारधी यांच्यावर चाकुने वार केले. यात अजयची आई मुन्नीबाई हीदेखील जखमी झाली. विजयच्या जबाबानुसार आरोपी अजय पारधीवर भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३३३,…
Author: editor desk
मेष राशी आज साहसी काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याचे मार्गदर्शन आणि सहवास खूप उपयुक्त ठरेल. व्यवसायात नवीन करार होतील. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळा सरकारी मदतीमुळे दूर होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. आर्थिक क्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. धन आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढेल. वृषभ राशी आज लांबणीवर पडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. उच्च पदावर असलेल्या लोकांशी संपर्क साधला जाईल. राजकारणात रस वाढेल. तुमच्या नम्र वागण्याने लोक प्रभावित होतील. सामाजिक व धार्मिक कार्यात रुची वाढेल. तुमच्या शौर्याने तुमची आर्थिक स्थिती सुधाराल. मिथुन राशी आज तुम्हाला नोकरी व्यवसायात अनावश्यक अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात महायुतीला मोठे यश आले आहे त्यासाठी राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मुहूर्त ठरत आहे तर विदर्भात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची तुतारी नऊपैकी एकाही ठिकाणी वाजू शकली नाही. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे माजी मंत्री रमेश बंग, काटोलमध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यासह सर्व जागी त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. या उलट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आल्याने दादा गटाने पवार गटाला डिवचले आहे. शहर अध्यक्ष प्रशांत पवार व जिल्हा अध्यक्ष बाबा गुजर यांनी आज माजी मंत्री, विदर्भाचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासमोर जीपीओ चौक परिसरात लावलेल्या बॅनरमधून राष्ट्रवादीचा खरा वारसदार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकासाआघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपला आहे. मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आम्ही देशात कधीही झाले नाही, असे भव्य आणि मोठे सामूहिक उपोषण करणार आहोत, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “सत्ता, सत्ता असते, त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले…
जळगाव : प्रतिनिधी घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) या महिलेने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी व्यंकटेशनगरमध्ये घडली. दुपारी महिलेचे पती दीपक दाभाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती. घरात कोणीही नसताना…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत होती. याचदरम्यान त्याच भागातील राहणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धाने या मुलीला आपल्या घरात बोलवले आणि अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ नोव्हेंबरला घडली. प्रारंभी बदनामीची भीती या कुटुंबाला होती. मात्र, गुरुवारी त्यांनी यावल पोलिस ठाणे गाठले व त्या वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित वृद्धास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे संबंधित गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीस कडक शिक्षा ठोठविण्यात यावी, अशी मागणी…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा येथे निवडणूक ड्युटीवर असताना एका होम गार्डच्या बोटास गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. या होमगार्डला वर्गणी करून सावदा पोलिसांनी मदतीचा हात दिला. २० रोजी विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यात पोलिस खात्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्यूटी लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत पण ड्युटी लावण्यात आल्या. त्यात वाघोदा येथे होमगार्ड कर्मचारी सुखदेव दयाराम धनगर (मुक्ताईनगर पथक) हे ड्युटीवर असताना त्यांच्या बोटावर दरवाजा आदळून अंगठ्याच्या भाग नखापासून वेगळा होऊन गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर वाघोदा येथे प्राथमिक उपचार करून पुढील शस्त्रक्रिया कामी अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रियेसाठी सावदा…
फैजपूर : प्रतिनिधी तीस हजारांची लाच घेणारा खासगी पंटर किरण सूर्यवंशी याला भुसावळ न्यायालयाने २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपनिरीक्षक किरण सोनवणे (भुसावळ) हा अद्यापही फरार आहे. ३० हजारांची लाच घेताना २३ रोजी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदारावर अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करू नये म्हणून ५० हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार ही ३० हजारांची लाच स्वीकारताना खासगी पंटर किरण सूर्यवंशी याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते तर यातील मुख्य आरोपी उपनिरीक्षक किरण सोनवणे, हा फरार झाला आहे.…
मेष राशी आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी इच्छित यश मिळेल. तुम्हाला विशेष व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यावसायिक सहकार्यामुळे तुमच्या व्यवसायात गती येईल. तुमच्या वडिलांची तुम्हाला भक्कम साथ मिळेल. कोर्टकचेरीच्या प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाहन, नोकरी इत्यादी सुविधांचा लाभ होईल. तुम्हाला विदेश प्रवास किंवा लांबच्या प्रवासाची गरज भासू शकते. राजकारणात तुमच्या विरोधकांचा पराभव होईल. कार्यक्षेत्र आणि समाजात तुमची धैर्याची प्रशंसा केली जाईल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असा असणार आहे. राजकारणात तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले मतभेद दूर होतील. नोकरी शोधण्याची वणवण थांबेल. व्यापारात नवीन प्रयोग फायदेशीर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक, विक्रमी महाविजय नोंदवत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने महाराष्ट्रातील सत्ता दणदणीत बहुमताने पुन्हा हस्तगत केली असून, सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधीदेखील होऊ घातला आहे. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आहे. थेट बँक खात्यात महिना १५०० रुपयांची ओवाळणी जमा करणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महाविकास आघाडीचा सारा खेळ खल्लास केल्याचे स्पष्ट चित्र आहे. या निवडणुकीत महिलांच्या मतदानात ७ टक्के वाढ झाली आणि हे बहिणींच्या मतांचे दान थेट महायुतीच्या पदरात पडले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे हा नारा देत महायुतीने दिलेली हिंदू…

