मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होवू लागला आहे. महायुतीला राज्यात चांगले यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचा यंदा मात्र पराभूत झाले आहे. यात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणारे काँग्रेसवर आता अनेक मतदारसंघातील महत्त्वाचे नेते गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. इतकेच नाही…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. चाळीसगाव विधानसभा मतदार संघात यंदा देखील चांगलीच चुरस रंगली होती. यात महायुतीचे उमेदवार आ.मंगेश चव्हाण व महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात चांगलीच रंगत दिसत असतांना चौथ्या फेरीत आ.चव्हाण यांनी १४ हजारांची आघाडी घेतली आहे.
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघात यंदा देखील चांगलीच चुरस रंगली होती. यात महायुतीचे उमेदवार आ.राजूमामा भोळे व महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई महाजन, अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन सोनवणे यांच्यात चांगलीच रंगत दिसत आहे. जळगाव शहर मतदार संघात तिसऱ्या फेरीत आ.राजूमामा भोळे यांना 24036 तर जयश्री महाजन 11859 यासह आश्विन सोनवणे 1508 असे चित्र दिसत आहे.
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे १४ हजार मतांनी पाचव्या फेरीत आघाडीवर असून माजी मंत्री गुलाबराव देवकर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे मात्र येत्या काही तासात जळगाव ग्रामीणचे चित्र स्पष्ट होणार आहे. या मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तगडी लढत असली तरी मनसेचे मुकुंद रोटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
जामनेर : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. जामनेर विधानसभा मतदार संघात यंदा देखील चांगलीच चुरस रंगली होती. यात महायुतीचे उमेदवार मंत्री गिरीश महाजन व महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्यात चांगलीच रंगत दिसत असतांना मंत्री महाजन 214 मतांनी पिछाडीवर आले असून दिलीप खोडपे सर आघाडी घेतली आहे.
पाचोरा : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूकीत आ. किशोर पाटील, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे यांच्यात तगडी लढत असल्याचे चित्र असून आजच्या निकालात आ.किशोर पाटील पहिल्या फेरीत ४१२५ यांना मतांची आघाडी मिळालेली आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघात यंदा विधानसभा निवडणुकीची चांगलीच चुरस रंगली होती. यात महायुतीतर्फे आ.किशोर आप्पा पाटील, ठाकरे गटाकडून वैशालीताई सूर्यवंशी तर अपक्ष उमेदवार अमोल शिंदे हे मैदानात उतरले होते. आता यात बाजी कोण मारणार हे लवकर समजणार…
अमळनेर : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. अमळनेर मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील हे ४९०० मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर आहे मात्र येत्या काही तासात अमळनेर मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे ६ हजार मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर असून माजी मंत्री गुलाबराव देवकर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे मात्र येत्या काही तासात जळगाव ग्रामीणचे चित्र स्पष्ट होणार आहे. या मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तगडी लढत असली तरी मनसेचे मुकुंद रोटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.
मेष राशी आज निपुत्रिकांना संतती प्राप्त होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील. व्यवसायात भागीदारच उपयुक्त ठरेल. कुटुंबात पैसे आणि मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. कोणाच्या बोलण्यात येऊ नका. वेषभूषा करण्यात रस असेल. वृषभ राशी आज तुरुंगातून मुक्त व्हाल. जुन्या प्रकरणात तुमचा विजय होईल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन करार होतील. बिझनेस ट्रिपला जाऊ शकता. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात मोठे पद मिळू शकते. काही महत्त्वाच्या योजनेवर काम कराल. मिथुन राशी आज कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते. त्यामुळे तुमचा प्रभाव वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल.…
चाळीसगाव : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांपूर्वी पार पडले असुन गेली दीड दोन महिने प्रत्येक उमेदवार रात्रंदिवस मेहनत घेत होता. निकाल २३ तारखेला असल्याने मधले दोन दिवस बहुतांश उमेदवारांनी घरी राहणे, वैयक्तिक फोनवर संपर्क तसेच निकालाचा आढावा घेणे, व थोडी विश्रांती घेणे याला प्राधान्य दिलेले दिसून आले. मात्र चाळीसगावाचे विद्यमान आमदार व भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण मात्र याला अपवाद ठरले असून या दोन दिवस मिळालेल्या उसंती चा उपयोग त्यांनी शेकडो किलोमीटर चा प्रवास करून आपल्या सहकाऱ्याच्या कौटुंबिक आनंदात सहभागी होत आपले वेगळेपण पुन्हा एकदा अधोरेखित केले. झालं असं की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात कार्यरत श्री.सागर शिंदे या…

