मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असतांना नुकतेच राज्याच्या एक्झिट पोलची आकडेवारी सर्वच संस्थांनी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होत नसले तरी देखील भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी सत्ता स्थापनेची तयारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजयाची शक्यता असणाऱ्या भाजपच्या बंडखोर आमदारांशी संपर्क साधला जात आहे. अशा विजयी झालेल्या आमदारांवर पक्षांतर्गत झालेली कारवाई देखील मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आता संपली असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार? याविषयी अंदाज लावले जात आहेत.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटजवळ राजकीय वादातून सिद्धार्थ वानखेडे (वय ३६) या तरुणाचा खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ निर्माण होऊन एक जमाव राजमालतीनगरात चालून आला. जमावातील महिला, पुरुषांसह लहान मुलांनी एका घरावर हल्ला चढवत वाहनांचे नुकसान केले. घरावर दगडफेक केली. हा संपूर्ण प्रकार घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. या प्रकारानंतर राजमालतीनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे गेट परिसरात राजमालतीनगर आहे. येथे दीपक माने हे पत्नी, मुलगा, सुना व नातवंडांसह वास्तव्यास आहेत. सुरत रेल्वे गेटजवळ राजकीय वादातून सिद्धार्थ वानखेडे या तरुणाचा खून झाल्यानंतर महिला-पुरुषांचा…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात मतदानावेळी राडा झाल्याच्या घटनाने दिवसभर वातावरण तापलेले होतेच. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरही वातावरण निवळलेलं नाही. नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनावरच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, ईव्हीएम घेऊन जाणारी कारवर हल्ला करत तोडफोड केली आह. नागपूर मध्य मतदारसंघातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते साडेसात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. दरम्यान, दुपारी बीडमध्ये ईव्हीएम फोडल्याची धक्कादायक घटनाही घडली होती. नागपुरात अत्यंत गंभीर घटनेत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर हल्ला करून त्या वाहनाची मोडतोड करण्यात आली आहे. नागपूर मध्य विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी सात ते…
यावल : प्रतिनिधी अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या मतदान प्रचारास अखेर गालबोट लागल्याची घटना घडली. रावेर- यावल विधानसभेच्या मतदानापूर्वी रात्री अज्ञात हल्लेखोराकडून यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणाऱ्या शेती व ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला काहींनी गैरसमजीतीतून मारहाण करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा सिम येथील कमलाकर तुळशीराम पाटील (वय ४७) हे २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यावल शहरापासून काही अतंरावर असलेल्या फॉरेस्ट नाका, विरावली रोड मार्गाने चारचाकी (एमएच १२, एमएम ९९००) ने आपल्या घरी जात होत्या. ते तंबाखू खाण्यासाठी फॉरेस्ट नाक्याजवळ थांबले असता…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अनवर्दे – बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले तथा शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील रहिवासी व या निवडणुकीत बीएलओ असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) यांचा निवडणूक काम आटोपून बभळाज येथील राहत्या घरी दुचाकीने जात असताना गलंगीजवळ २० रोजी रात्रीी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनवर्दे बुधगांव येथील लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच ठिकाणी ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ होते. तेथून निवडणुकीचे काम आटोपून ते आपल्या शिरपूर तालुक्यातील मूळ गाव बभळाज येथे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना चोपडा…
जळगाव : प्रतिनिधी डाव्या साईडने ओव्हरटेक करणाऱ्या टॅकरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात वरणगाव येथील आयुध निर्माणी येथील वाहनाचा अपघात झाला. यामध्ये धडक देणाऱ्या वाहनातील चालक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री दहा सव्वा दहा वाजेच्या सुमारा शिवकॉलनी स्टॉपजवळ घडली. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील आयुध निर्माणी येथील (एमएच- १९, एम ९४५३) क्रमांकाचे वाहन मंगळवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास धुळ्याकडून जळगावला येत होते. शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळ वाहना पुढे चालणाऱ्या (जीजे ०६, बीव्ही- १४६१) – क्रमांकाच्या केमिकलच्या टँकरला मागून येणारे वाहन डाव्या बाजूने ओव्हरटेक करीत…
मेष राशी आज नोकरीत बढती होईल किंवा तुम्हाला बढतीची चांगली बातमी मिळेल. अध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लक्षणीय यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. सुरक्षिततेच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना विशेष यश मिळेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल वृषभ राशी आज नोकरीचा शोध पूर्ण होईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सासरच्या लोकांच्या मदतीने दूर होतील. कार्यक्षेत्रात नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. दूरदेशी प्रवासाचे योग येतील मिथुन राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. व्यवसायात वेळेवर काम करा. प्रगतीसह लाभ होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही शुभ घटना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बी. जे. मार्केट येथे एका कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीवरून धाड टाकून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, सोबत मतदान यादी, मोबाईल नंबरदेखील सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तक्रारदार विकी भास्कर कोळी (वय ३२) हे नवीन बी. जे. मार्केट येथून जात असताना त्यांना रेडक्रॉस सोसायटीजवळ मार्केटमध्ये काही घोळका दिसला.…
भुसावळ : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांच्या टोळीस जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आशयाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत. राजू सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी या पाच जणांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुरुवातीला सात जणांविरुद्ध प्रशासनाने पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार सातपैकी पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी राजू सूर्यवंशीसह ७ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविले होते. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस, बाजारपेठ आणि वरणगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगर काठोडा येथे बहिणीच्या विवाह सोहळ्याच्या दिवशीच भावाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना डोंगरकठोरा, ता. यावल येथे रविवारी घडली. यामुळे आनंदाच्या वातावरणात अचानक शोककळा पसरली. यामुळे गावच सुन्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश भगत (वय ३६) असे या तरुणाचे नाव आहे. राकेश यांनी वयाच्या अवघ्या १०-१२व्या वर्षी वडताल (गुजरात) येथे स्वामीनारायण संप्रदायाचा स्वीकार केला होता, रविवार, दि. १७ रोजी बहीण नम्रता हिचे रविवारी लग्न असल्याने राकेश हे डोंगर कठोरा येथे आले होते. स्वामीनारायण मंदिरात ते थांबले होते. रविवार रोजी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. राकेश भगत यांच्या निधनामुळे…

