Author: editor desk

भडगाव : प्रतिनिधी शहरात लग्न समारंभासाठी चाळीसगाव येथून आलेल्या महिलेचे ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २२ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथे पार पडलेल्या लग्न समारंभासाठी माया पाटील (४६) या आल्या होत्या. त्यांच्या पर्समधील ६७ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हवालदार विजय जाधव करीत आहेत.

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यात काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी चोपडा पोलिसांनी तपास करीत धरणगाव तालुक्यातील एकास अटक करीत त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील अंजाळा येथील रहिवासी यादवराव बाबूलाल पाटील यांची दुचाकी चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारातून चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत चोपडा पोलिसांनी पवन प्रेमचंद पाटील (२८, रा. आव्हाने, ता. धरणगाव) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तालुक्यातून चोरीस गेलेल्या दुचाकींचा तपास करताना संबंधित आरोपी हा शहरात एका हॉटेलवर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक…

Read More

धुळे : प्रतिनिधी तालुक्यातील विश्वनाथ गावातील यात्रोत्सवात बैलगाडीचा रथ ओढताना अचानक रथ उलटून खाली कोसळला. रथाच्या चाकात गावातील २१ वर्षीय तरुण मयूर नरेंद्र पाटील आल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी सोनगीर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ गावातील यात्रोत्सवात पांरपरिक प्रथेनुसार बैलगाडीद्वारे तगतराव ओढण्याची परंपरा आहे. यात्रोत्सवात तगतरावाचे दुशेर तुटल्याने बैले बिथरले गेले होते, तर तगतराव शाळेच्या भिंतीवर पडल्याने काही मुले जखमी झाले होते. यामध्ये मयूर नरेंद्र पाटील (वय २१, रा. विश्वनाथ, ता.जि. धुळे) हा तरुणदेखील गंभीर अवस्थेत जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्यास येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रकाश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून एका महिलेच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साहित्याची तोडफोड करीत आग लावून घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी राजमलती नगरात घडला. २७ नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाजेमा परवीन राजू पटेल (४६) या महिलेचे घर बंद असताना सहा ते सात जणांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तोडफोड करत काही घर जाळण्याचा प्रयत्न केला. याविषयी महिलेच्या फिर्यादीवरून सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रामचंद्र शिखरे करीत आहेत.

Read More

मेष राशी सामाजिक कार्यात वर्तनात संयम ठेवून वागा. विरोधी पक्ष तुम्हाला कमी लेखायचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावधगिरी बाळगा. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही तुम्हाला योग्य परिणाम मिळणार नाहीत. आज प्रेमसंबंधात असलेल्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. जेणेकरून परस्पर आनंद आणि सहकार्य राहील. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल वृषभ राशी आज कार्यक्षेत्रात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. काळानुसार परिस्थिती अनुकूल होईल. धर्मादाय कार्यात तुमची आवड वाढेल. अधिक आनंद आणि प्रगती देणारी परिस्थिती पाहून तुमच्या विरोधकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटेल. पती-पत्नीमध्ये सर्वाधिक आनंद आणि सहकार्य राहील. मिथुन राशी राजकीय पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक क्षेत्रात नवीन जनसंपर्काचा फायदा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. राजूमामा आता सुरेश दामू भोळे यांचा विजय हा महायुतीच्या संघटनाचा आणि जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादाचा असल्याचे दिसून आले आहे. पुढील काळात पाठपुरावा करून प्रलंबित कामे पूर्ण केले जातील, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारासाठी कुठल्याही बड्या नेत्याची सभा झाली नाही. तसेच कुठलीही मोठी रॅली काढण्यात आली नाही. कुठल्याही सेलिब्रेटीचा रोड शो आयोजित झाला नाही. तरीही आ.राजूमामा भोळे यांनी केवळ दहा वर्षात केलेल्या विकास कामांना समोर ठेवून जनतेकडे मते मागितली. मी ५० टक्के कामे पूर्ण केली असून २५ टक्के कामांचे भूमिपूजन झाले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे तर महायुतीला मोठं यश मिळालं आहे. २८८ जागांपैकी २३९ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय झाला आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निश्चित झालं आहे. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तर भुजबळांचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. ‘ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं’, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. यासह मागासवर्गीय आणि ओबीसींसाठी काम केल्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय, असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभेची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. या निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.२८) संशय व्यक्त केला आहे. या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत, असे पटोले यांनी यावेळी सांगितले. पटोले म्हणाले की, 7.87 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. 76 लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत, याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. महाराष्ट्रात 5 लाखांहून अधिक मत आली, मग ती आली कुठून? असा सवालही त्यांनी केला. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला. निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आज जळगाव जिल्ह्यात सर्वत्र बालविवाह निर्मूलन शपथ घेण्यात आली तसेच जिल्हा महिला बालविकास विभाग युनिसेफ एस.बी.सी. – 3 व आधार फाउंडेशन ,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुक्यात दादासाहेब आर.जी.झांबरे या विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री. तुषार प्रधान सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोबतच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पवन पाटील सर यांनी चाईल्ड लाईन 1098 या नंबर बाबत जनजागृती केली पर्यवेक्षिका अधिकारी मीनाक्षी कोळी मॅडम यांनी बालविवाह निर्मूलन शपथ घेतली व युनिसेफ एस.बी.सी. – 3 जिल्हा प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे यांनी बालविवाह निर्मूलन याबाबत…

Read More

भडगाव : प्रतिनिधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी जाऊन आदळल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. बापू सोमनाथ जगताप (५७) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील मेन्स पार्लरचे संचालक बापू सोमनाथ जगताप हे मोटरसायकलने व त्यांचे दोन सुपुत्र मुन्ना जगताप व विकी जगताप हे दुसऱ्या दुचाकीने नगरदेवळा येथे आयोजित नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी जात होते. कजगाव-भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराच्या पुढे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह दोन ट्रॉली रस्त्यात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. समोरून पडणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे तसेच ट्रॅक्टरला दर्शक अथवा रेडियम नसल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली दिसून आली नाही. त्यामुळे बापू जगताप यांची दुचाकी ट्रॉलीवर जाऊन आदळली. या…

Read More