Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील राजस्थान मार्बल व वांजोळा रोड फाट्याजवळ असलेल्या टेंट हाउसच्या गोडाऊनला अचानक भीषण आग लागल्याने गोडाऊनमधील डीजे, मंडप, खुर्चा आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग विझवण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब दाखल झाला, आग विझवण्याचे काम रात्री साडेआठ वाजेपर्यंत चालले. या घटनेबाबत उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. आग लागल्याची वार्ता पसरताच, भुसावळ पालिकेचे तीन अग्निशमन बंब याशिवाय यावल पालिकेचा व ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचा अग्निशमन बंब तसेच खासगी पाण्याचे टैंकरही…

Read More

रावेर : प्रतिनिधी गावातील विजेच्या खांबावरील सर्व्हिस बॉक्सला अचानक आग लागल्याची घटना २६ रोजी घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील बहुतेक गावांत वीजचोरीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणकडून कोटिंग केलेली केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या भागात वीज चोरीसाठी आकडे टाकले आहेत, अशा भागातही केबल टाकण्याचे काम सुरू आहे. विवरे बुद्रुक येथे महिनाभरापासून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. २६ रोजी आझाद नगर भागात केबल टाकण्यात आली. त्यातच केबल टाकल्यावर २४ तासांच्या आतच पोलवरून लावलेल्या सर्व्हिस बॉक्समधील वायर जळाल्याने धूर निघू लागला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही…

Read More

कजगाव : प्रतिनिधी शेतातील सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. ही घटना कनाशी, ता. भडगाव येथे मंगळवारी सकाळी घडली. दुर्दैव म्हणजे या बालकाचा ३० रोजी वाढदिवस साजरा होणार होता; त्या आधीच त्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन महेंद्र महाले असे या मृत बालकाचे नाव आहे. कजगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कनाशी येथील रहिवासी, तसेच पाचोरा बस आगारात चालक महेंद्र महाले यांचा हर्षवर्धन मुलगा होता. तो कनाशी जि. प. शाळेत तिसरीत शिकत होता. हर्षवर्धन हा सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता. गणवेश घालून घराच्या ओट्यापर्यंत पोहोचला. त्यावेळी शेतात असलेली सायकल…

Read More

पारोळा : प्रतिनिधी अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. हिरालाल देवीदास पाटील (४३, रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) आणि प्रवीण विश्वास पाटील (४५, रा. पोलिस वसाहत, बसस्थानकाजवळ, पारोळा) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७ नोव्हेंबर रोजी दुचाकीने पारोळ्याहून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांच्या दुचाकीची धडक होऊन त्यावरील चालक ठार झाला. याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तक्रारदाराची अटक टाळण्यासाठी संशयित दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे ३० हजाराची मागणी…

Read More

मेष राशी आज कामातील अडचणी कमी होतील. सहकाऱ्यांकडून सहकार्याची वागणूक मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात लोकांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रात लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. आज नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. पण मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगा. याबाबत घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशी कार्यक्षेत्रात नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. अन्यथा कार्यक्षेत्रात तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पातील अडथळे मित्रांच्या मदतीने दूर होतील. आज कुटुंबात मोठा खर्च होऊ शकतो. व्यवसायात समर्पण आणि परिश्रम उत्पन्नाचे कारण ठरतील. जुनी कर्जे फेडण्यात यश मिळेल. मिथुन राशी आज कामात खूप व्यस्त रहाल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुककीचा निकाल जाहीर झाला असून यात महायुतीला 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इतक्या जास्त जागा येण्याचा ना भाजपला अंदाज होता, ना एवढा दारूण पराभव होईल या महाविकास अंदाज होता. अनेक एजन्सीने केलेल्या सर्व्हेंमध्ये देखील अटीतटीची लढत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले होते. त्यामुळे यंदाचा विधानसभेचा निकाल हा सर्वांसाठीच धक्कादायक आहे. महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ काढली होती. आता ‘ईव्हीएम छोडो’ यात्रा काँग्रेसकडून काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निकालानंतर शिवसेना…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंटच्या टँकरने महामार्गालगतच्या दुकानास जबर धडक दिली. या दुर्घटनेत टँकरचालक फुलचंद (२६, चिलुला, जि. बाराबंकी) हा जागीच ठार झाला, तर पादचारी शकील नबी बागवान (३४, एरंडोल) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमळनेर नाक्यानजीक असलेल्या गतिरोधकाजवळ चालकाचे वेगावर नियंत्रण न राहिल्याने मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. यादरम्यान, अमळनेर नाका परिसरात महामार्गावरील पथदीप बंद असल्याने याठिकाणी याआधीही अनेक अपघात झाले आहेत. सिमेंट घेऊन जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा (एमएच १५ जेसी १९९५) गतिरोधकावर ताबा सुटल्याने तो आसारीच्या दुकानात घुसला. त्यात चालक हा जागीच ठार झाला. शकील व आई दोघे रात्री परगावावरून आल्यावर रस्त्याने चालत असताना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक करून त्यांच्याकडून एकूण चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शाह (२६, रा. मास्टर कॉलनी) याला रामानंदनगर पोलिसांनी आकाशवाणी चौकातून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, मू, जे. महाविद्यालय परिसरातून अफसर अहमद शेख मुनीर (रा. अलमास कॉलनी) यांची दुचाकी १८ नोव्हेंबर रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना ही दुचाकी शोएब हबीब शहा याने चोरी केल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश ऊर्फ प्रबुद्ध गुलाब सपकाळे (२१, हुडको), गौरव समाधान सोनवणे (२१, गॅलेक्सी कॉलनी) व लीलाधर देविदास कोळी (३५, रा. हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे २५ लाख २० हजारांचे नुकसान झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली. या प्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश महेशलाल कुकरेजा (वय ३०) यांचे सिंधी कॉलनीत श्री आनंद ड्रेस मटेरियल नावाचे कापड दुकान आहे. रात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.

Read More